शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 08:19 IST

स्वाइन फ्लू, कोरोना, झिका.. अशा एकामागोमाग येणाऱ्या साथी मानवी आरोग्याची परीक्षा घेतात. व्यायाम, प्रतिकारशक्तीअभावी आपण त्यांचे सोपे सावज बनतो.. 

- डॉ. अमोल अन्नदातेलेखक आरोग्य व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक

गेल्या अनेक वर्षांपासून स्वाइन फ्लूपासून कोरोनापर्यंत व आता आताच्या झिका, चंदीपुरा अशा अनेक विषाणूंच्या साथी सुरूच आहेत. अनेक संसर्गजन्य आजार  अधून-मधून थोड्या फार फरकाने प्रत्येकाला होत असतात. पण, साथ पसरते तेव्हा तसे नसते. मानव जातीने आजवर प्लेग, फ्लू , कॉलरा, कोरोना अशा जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम केलेल्या महासाथी अनुभवल्या. मानवी जिवाला असलेला धोका लक्षात घेता, या साथींची तुलना महायुद्धाशीच होऊ शकते. पण, हे युद्ध फक्त रुग्णालयातच लढले जात असल्याने त्याची तीव्रता कोणच्याही लक्षात येत नाही. 

युद्धात जसा देश बेचिराख होऊ शकतो, तसा साथीतही होऊ शकतो. आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आठवण निघाली, तर अंगावर काटा येतो. कोरोना साथीत प्रत्येक व्यक्तीची जवळची तीन, तरी माणसे दगावल्याचे एका क्षणात सहज आठवेल. पण, तरीही कोरोनाच्या साथीत आपण जे शिकलो ते सगळे स्मशान वैराग्यच ठरले. वेगाने मानवतेवर आदळणाऱ्या साथी पाहता साथींचे शास्त्र हे फक्त डॉक्टरच नव्हे, तर सर्वसामान्य लोक व धोरण आखणाऱ्या, राबवणाऱ्या प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे.

साथ कुठलीही असो, त्याची काही वैशिष्ट्ये असतात. साथ न सांगता कधी येत नाही. ती धोक्याची घंटा आधी वाजवते. भारतात कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच चीन व इतर अनेक देशांत ती हाहाकार माजवत असल्याचे अख्खे विश्व पाहत होते. साथीत सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट असते, कमी वेळेत खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होऊन अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येणे.

भारतात साथींमध्ये आधीच मोडकळीला आलेली सार्वजनिक व्यवस्था अजून अधिक ताणली जाणे ही सर्वात मोठी समस्या असते. साथी टाळण्याचे उपाय हे अत्यंत साधे व आरोग्याच्या साध्या नियमांशी निगडीत असतात. साथी कमी होतात, पण पूर्णतः कधीही संपत नाहीत. गरज सरो वैद्य मरो, या वृत्तीप्रमाणे साथीची दाहकता कमी झाली की, सर्व यंत्रणा परत उपाययोजनांच्या बाबतीत सुस्त होते. १९६८ साली साधा सर्दी-खोकला, म्हणजे फ्लूची साथ येऊन प्रत्येकाला तो होऊन गेला, पण आजही जगभरात सात लाख लोक साध्या फ्लूमुळे मृत्युमुखी पडतात. यात भारतातही ५ वर्षांखाली व ६५ वर्षांपुढे अनेक जणांचा फ्लूमुळे मृत्यू होतो. फ्लू टाळणारी उत्तम लस उपलब्ध असूनही कोणी पैसे खर्च करून ही लस घेत नाही व सार्वजनिक आरोग्य सेवेत ही लस मोफत मिळणे दिवास्वप्नच आहे. कोरोनाची साथ वेगळी होती, कारण विषाणूबद्दल व उपाययोजना, उपचारांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फ्लू, न्युमोनिया, अशा अनेक साथी आहेत. ज्यांच्या उपाययोजना वर्षानुवर्षे माहीत आहेत व सिद्ध झाल्या आहेत.

२०२४ मधील उन्हाळा हा गेल्या कित्येक वर्षांतील तापमानाचा उच्चांक गाठणारा ठरला. पावसाळा आधीसारखा राहिलेला नसून, कमी वेळेत ढगफुटीसदृश पाऊस पडतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते. हवामानातील हे सगळे बदल विषाणूंना त्यांच्यात संक्रमण घडवून नव्या साथीच्या रूपात येण्यास पोषक आहेत.

जीवनशैलीतील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व आहारातील बदल हे साथी आल्यावर जीवितहानी वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच भारताविषयी एक निरीक्षण नोंदवले की, भारतातील ५० टक्के लोक दिवसाच्या किमान हालचालींची गरज पूर्ण करत नाहीत. व्यायाम, हालचालींचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात व त्यातून साथींमधले सोपे सावज निर्माण होतात. भारतीय आहारात कर्बोदकांचे प्रमाण जास्त व प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. तसेच, भाज्या, फळे यांचा दर्जा घसरल्याने मायक्रोन्युट्रीयंट्सचे प्रमाण कमी असते. अधिक साखर व मीठ असलेल्या साठवलेल्या आहाराचे (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक चौकात असलेली परदेशी फास्ट फूड आउटलेट्स हे लठ्ठपणा, मधुमेह , उच्च रक्तदाबाची ब्रॅंड ॲम्बेसिडर आहेत. हे सगळे आजार प्रतिकारशक्तीचा बळी घेणारे आहेत. वाघ जेव्हा हरणाच्या कळपाची शिकार करतो, तेव्हा त्यातील कमकुवत मागे राहून शिकार होतात. साथीमध्ये शिकार होणारे, असे कमकुवत प्रतिकारशक्ती व सहआजार असलेले असतात. नियमित येणाऱ्या साथी ही मानवाच्या आरोग्याची वार्षिक परीक्षा असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आरोग्याची मूलभूत तत्त्वे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे.    dramolaannadate@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्य