शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:15 AM

सुरुवातीला देशात मागणी इतकेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र, सध्या साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल सुरू आहे. साखरेचेच नाही तर अन्य कृषी मालाचेही सरकारचे अंदाज चुकतात. परिणामी, दर कमी-जास्त होऊन त्याचा फटका शेतकरी आणि ग्राहकाला बसतो.

- चंद्रकांत कित्तुरेदेशात यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. २५१ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. तो आता २९० लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. केवळ साखरच नव्हे, तर देशातील सर्वच कृषी उत्पादनांच्या बाबतीत हे कमी-अधिक प्रमाणात घडत आहे. सरकारने काढलेले अंदाज चुकतात. परिणामी, दरात चढ-उतार होतात. तात्पुरते उपाय योजून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करते. अंदाज का चुकतात याबाबत काहीतरी कारणमीमांसा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. तूर, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे यासारख्या पिकांबाबतचे गेल्या दोन वर्षांचे अनुभव हेच सांगतात. बाजारात मागणीपेक्षा जादा पुरवठा झाला की, किमती कमी होतात आणि कमी झाला की त्या वाढतात. अन्नधान्याच्या बाबतीतही बाजाराचा हाच न्याय आहे. त्यामुळे मागणी इतकाच पुरवठा होईल, असे नियोजन झाले तर कृषी उत्पादनाच्या किमती स्थिर राहू शकतात. पण आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती ही कोणत्याही कृषी उत्पादनाचे किती उत्पादन घ्यावे, याबाबत नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी नाही. यामुळेच ही परिस्थिती उद्भवते. पीक मुबलक आले की, दर कोसळतात. उत्पादन खर्चही निघत नाही. परिणामी, शेतकºयांना तोटा सहन करावा लागतो. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी आणखी कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागले की, तो आत्महत्येचा मार्ग अनुसरतो. हे आपल्या देशातील वर्षानुवर्षाचे विदारक सत्य आहे. यावर मार्ग काढण्याच्या घोषणा, उपाय वेगवेगळ््या सरकारने केल्या. परंतु, परिणाम फारसे उत्साहवर्धक नाहीत.सुरुवातीला २०१७-१८ या हंगामातील साखरेचे उत्पादन २५१ लाख टन होईल असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने वर्तविला होता. केंद्र सरकारची असा अंदाज वर्तविणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे ‘इस्मा’चा अंदाजच सरकारही गृहीत धरते. जानेवारीत सुधारित अंदाज वर्तविताना तो २६१ लाख टनांवर नेण्यात आला. आता उद्या, बुधवारी पुन्हा ‘इस्मा’कडून सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन २४५ लाख टन होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात २०३ लाख टन उत्पादन झाले. यामुळे साखरेला पर्यायाने उसालाही चांगला भाव दिला गेला. परिणामी, ऊस लागवडीखालील क्षेत्रात चांगली वाढ झाली. त्यातच यंदा पाऊसमान चांगले झाले; त्यामुळे उसाची वाढ जोमाने होऊन साखरेचा उताराही वाढला आहे. परिणामी, साखरेच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे.‘इस्मा’बरोबरच विविध राज्यांतील साखर आयुक्तालये किंवा ऊस आयुक्तालयांनी साखर कारखान्यांकडून घेतलेली ऊस नोंदीची आकडेवारी आणि कृषी विभागाची आकडेवारी पाहून हा अंदाज सरकार वर्तवते, पण यात अचूकता नाही. याला वेगवेगळी कारणे आहेत. आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदा साखर आकडा २९० लाख टनांवर जाणार आहे. साखरेसह सर्वच शेतमालांचे किती उत्पादन होईल, याचे अचूक अंदाज बांधणारी यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकारांनी विकसित करायला हवी. विकसित देशात जर अशी यंत्रणा असेल, तर ती आपल्याकडे का असू नये? ती असेल तर शेतमालांच्या किमती स्थिर ठेवण्यासही मदतकारक ठरू शकेल. नाही तर वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवावा आणि नेमके कडक ऊन पडावे अशी स्थिती असते. तशीच ती शेतमालाच्या उत्पादनाबाबतही राहील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEconomyअर्थव्यवस्थाagricultureशेती