शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मध्य पूर्वेतील भडक्याने संपूर्ण जग होरपळेल

By विजय दर्डा | Updated: January 6, 2020 06:42 IST

अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे.

- विजय दर्डाअमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे. इराणच्या दृष्टीने ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापत असे असा एक बहाद्दर जनरल त्यांनी गमावला आहे... आणि जगाच्या दृष्टीने पाहिले तर ज्यात बरेच काही जळून खाक होऊ शकते अशी आग लावणारी ही घटना आहे. इराण ही घटना सहजपणे पचवू शकणार नाही, हे नक्कीच. म्हणूनच इराणने अमेरिकेचा सूड उगविण्याची धमकी दिली आहे!इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स या सैन्यदलांमध्ये प्रतिष्ठित ‘कुद््स फोर्स’ या प्रतिष्ठित विशेष विभागाचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनाई यांच्या थेट आदेशावरून काम करायचे आणि इराणमध्ये ते खमेनाई यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली मानले जायचे. म्हणून सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणने त्यांना ‘अमर शहिदा’चा दर्जा देऊन तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्याचबरोबर अमेरिकेने सुलेमानी यांच्या हत्येची किंमत मोजायला तयार राहावे, असा इशाराही इराणने दिला. जगात इराणचे प्रभुत्व वाढविण्यात सुलेमानी यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सीरिया, येमेन व इराकमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. ‘इस्लामिक स्टेट’ला नामोहरम करण्यासाठी सुलेमानी यांनी इराक आणि सीरियामध्ये कुर्द सशस्त्र दले व शिया बंडखोरांची एकजूट केली आणि त्यांना प्रशिक्षणही दिले.

देशभर उठाव होऊनही सीरियाच्या बशर अल असद सरकारला पाय घट्ट रोवून खुर्चीवर कायम राहण्यातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. हिजबुल्लाह व हमास यासारख्या शिया बंडखोरांच्या सशस्त्र संघटनांनाही त्यांनीच बळकटी दिली होती. अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण पूर्ण ताकदीनिशी ताठपणे उभे राहू शकले तेही बव्हंशी सुलेमानी यांच्यामुळेच. अमेरिकेचे नुकसान करण्याच्या प्रत्येक रणनीतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच सुलेमानी अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले व त्यांचा काटा काढण्याचे प्रयत्न अमेरिका निरंतर करत राहिली. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखालील ‘कुद््स फोर्स’ला अमेरिकेने २५ आॅक्टोबर २००७ रोजीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लागू केले. मात्र हे निर्बंध निष्प्रभ करण्यातही सुलेमानी यांनी हरतºहेचे उपाय केले, असे मानले जाते. यामुळे अमेरिकेची तळपायाची आग मस्तकात गेली होती. दुसरीकडे काहीही करून सुलेमानी यांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल व सौदी अरबस्तानकडून अमेरिकेवर वाढता दबाव येत होता. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज टिष्ट्वट केला यावरूनच सुलेमानींचे या जगात न राहणे अमेरिकेसाठी किती बहुमोल होते याची कल्पना यावी.आता पुढे काय होईल, हा मोठा प्रश्न आहे. काहीही करून इराण सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगवणार हे नक्की. त्यासाठी इराणकडून अमेरिका, सौदी अरबस्तान व इस्रायलच्या आस्थापनांवर हल्ले होणार हेही स्पष्ट आहे. अजूनही इराकमध्ये अमेरिकेचे पाच हजारांचे सैन्य तैनात आहे. प्रतिहल्ल्याची पूर्ण कल्पना असल्याने आपल्या सैनिकी तळांची सुरक्षा आधीच मजबूत केली आहे. इराणकडून काही आक्रमक आगळीक होताना दिसली तर अमेरिका आणखी सैन्य आणू शकेल. शिवाय संभाव्य धोके टाळण्यासाठी अमेरिका हवाई हल्लेही करू शकेल. तसे झाले तर इराण उघडपणे युद्धात उतरेल, कारण त्यात रशिया पाठीशी उभी राहील, याची इराणला खात्री आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूला ‘हत्या’ म्हणून रशियाने तिची निंदा केली आहे. चीनही इराणच्या बाजूने असल्याचे दिसत असले तरी चीन कदाचित रशियाप्रमाणे या रणांगणात उघडपणे उतरणार नाही.
खरोखर युद्ध किवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा खनिज तेलाच्या किमतींवर थेट परिणाम होईल हे निश्चित. तसे संकेत मिळालेही आहेत. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या अखत्यारीतील सागरी मार्गांनी जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर इराणने हल्ले केले तर तेलाच्या बाजारपेठेत आगडोंब उसळणे स्वाभाविक आहे. तसे झाले तर संपूर्ण जगाला त्याची झळ लागेल. खासकरून भारतावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. आधीच नाजूक परिस्थिती असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर तेलाच्या चढ्या किमतींचा नवा बोजा पडला तर विकासदराला आणखी घसरण लागेल. आपल्या परिसरातील देशांची अवस्थाही याहून वेगळी नसेल. जगातील अनेक देश या भडक्याने होरपळून निघतील. म्हणून मध्य पूर्वेच्या या देशांमध्ये शांतता नांदणे गरजेचे आहे. पण तसे होण्याची लक्षणे दिसत नाहीत. मध्य पूर्व आशिया हा जगाचा असा शापित भाग आहे की जेथे तेलाच्या रूपाने अमाप संपत्ती आहे, पण नशिबी रक्तपात लिहिलेला आहे. त्या देशांच्या नशिबी शांतता नाही. तेथे शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर जगातील सर्वच देशांनी एकत्र बसून विचार करायला हवा.(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)