शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:08 IST

M.S. Dhoni: ‘धोनी... फिनिशेस ऑफ इन स्टाइल!’ हे वाक्य कुणीही भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरू शकत नाही. त्यानं तो षटकार मारला आणि २०११ च्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हॉल ऑफ फेमचा सन्मान आयसीसीने धोनीच्या नावानं केला आणि पुन्हा एकदा ते जुने क्षण आठवलेच.

- अनन्या भारद्वाज (मुक्त पत्रकार)‘धोनी... फिनिशेस ऑफ इन स्टाइल!’ हे वाक्य कुणीही भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरू शकत नाही. त्यानं तो षटकार मारला आणि २०११ च्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हॉल ऑफ फेमचा सन्मान आयसीसीने धोनीच्या नावानं केला आणि पुन्हा एकदा ते जुने क्षण आठवलेच. टी- टे्वण्टी विश्वचषक, एकदिवशीय विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी देशासाठी जिंकून आणणारा एकमेव कप्तान ही धोनीची ओळख; पण हे चषक आणि त्यानं केलेल्या धावा, यष्टीमागे घेतलेले बळी यापलीकडे त्याची ओळख आहे. लहान शहरातल्या रांगड्या मुलांचा प्रतिनिधी होता- तो ‘लिजंड’ झाला.

नुकतंच आयपीएलमध्ये त्याच्या संघाचा पालापाचोळा झाला; पण कोण काय म्हणतं याची फिकिर तो करत नाही. त्यानं सांगितलंही की, ‘खराब कामगिरीने खचून जाऊन जर खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेऊ लागले तर अनेकांनी वयाच्या २२ व्या वर्षीच निवृत्ती घेतली असती!’ 

तो ना पराभवात खचून गेलेला दिसतो ना त्यानं कधी विजयाचा आक्रमक आनंद साजरा केला. यायचं, खेळायचं कप जिंकायचा आणि शांतपणे घरी निघून जायचं याहून जास्त काहीच येत नसल्यासारखा तो खेळला. 

‘इतका ‘पॉझिटिव्ह’ तू कायम कसा राहतोस?’ -असं त्याला एकदा मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तर तो हसून म्हणाला, ‘तुम्ही लोक फार विचार करता, ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा हे पाहत बसता. मी तसं काही करत नाही. माझं गणित सोपं आहे. मला तहान लागली आहे. माझी तहान भागण्यापुरतं घोटभर पाणी ग्लासमध्ये आहे, ते मी पिऊन टाकतो. तो अर्धा भरला होता की रिकामा, मला काय करायचंय? माझी आताची गरज भागली विषय संपला. त्यामुळे पुढचा नी मागचा विचार करत बसण्यापेक्षा तहान लागल्यावर करायची कृती काय?- तर पाणी प्यावं. इतकं सोपं असतं आयुष्य. तुम्ही कशाला कॉम्प्लिकेटेड करता?‘ उगीच का म्हणतात, थाला फॉर अ रिझन! 

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ