शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जादूटोणाविरोधी कायद्याबाबतचा संभ्रम कधी दूर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:49 IST

जादूटोणाविरोधी कायदा धर्मनिरपेक्ष आहे, तो हिंदुविरोधी नाही. या कायद्यान्वये दाखल झालेल्या पहिल्या शंभरपैकी वीस गुन्हे इतर धर्मीयांविरुद्ध दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. समाजातील अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी अनेक संत, समाजसुधारकांनी अटोकाट प्रयत्न केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी सलग अठरा वर्षे प्रयत्न केले. २०१३मध्ये महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. या कायद्याला नऊ वर्षे पूर्ण झाली असून, दीड हजारांहून अधिक गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदू धर्मीयांसाठी वापरला जातो, असा काही जणांचा आरोप आहे, पण हा कायदा सर्वांना लागू आहे. सर्वांत पहिला गुन्हाच एका इतर धर्मीय भोंदूबाबाच्या विरोधात नांदेड येथे दाखल झालेला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी  वीस घटनांमध्ये इतर समाजाच्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.दोष सिद्ध झाल्यास सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवास, शिवाय पाच ते पन्नास हजार रुपयांच्या शिक्षेचीही यात तरतूद आहे. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे इत्यादि अमानुष कारणांमुळे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्राने देशाला अनेक कायदे दिले आहेत, तसाच हा कायदाही देशासाठी पथदर्शक आहे. अनेक राज्यांतून अशा कायद्याची मागणी होत आहे, परंतु त्याआधी राज्यातच त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. विविध कारणांमुळे अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. बदनामी होईल, अशा भीतीमुळे बरेच पीडित तक्रार करण्याचे टाळतात. पोलिसांकडूनही काही वेळा योग्य ती मदत मिळत नाही. कारण त्यांच्यातही या कायद्याबाबत संभ्रम आहे. यासाठी पोलिस ते पोलिस पाटील आणि नागरिकांचेही नियमित प्रशिक्षण शिबिर होणे आवश्यक आहे. हे प्रबोधन  ज्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयांतून होऊ शकते, त्याचप्रमाणे, भाषणे, कीर्तन, प्रवचन, मनोरंजनाची साधने यातूनही होऊ शकतं. कायद्याबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार, प्रसार करत आहे. मात्र, मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहेत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमच करीत आली आहे. नागरिकांनीही त्याला बळ दिले पाहिजे. - कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र