शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

म्हादईचे नष्टचक्र कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 20:17 IST

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने अद्याप संपूर्णत: सोडून दिलेला नाही. ही टांगती तलवार गोव्यावर कायम राहणार आहे.

- राजू नायकम्हादई नदीच्या कळसा आणि भंडुरा या उपनद्यांचे पाणी वळविण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित ठेवण्यात आले असले तरी गोव्यावरचे संकट अजून संपूर्णत: दूर झालेले नाही अशी शंका गोव्यात व्यक्त होते, ती चुकीची नाही. गोवा या प्रश्नावर गेली २५ वर्षे लढत आहे. केंद्राने या संदर्भात नेमलेल्या जल लवादाच्या निर्णयाला दोन्ही राज्यांनी आव्हान दिले आहे. परंतु तो मुद्दा प्रलंबित असता, केंद्राने राजकीय दबावाखाली कर्नाटकला पाणी वळविण्यास मंजुरी देऊन टाकली. त्यामुळे केंद्र सरकार गोव्यासारख्या छोटय़ा राज्याला कितीसे खिजगणतीत घेईल, असा प्रश्न उपस्थित होतो.म्हादई नदी कर्नाटकातून पश्चिम घाटातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या भीमगड अभयारण्यात उगम पावून गोव्यात येते. या नदीचे पाणी कर्नाटकला हुबळी-धारवाडचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथील मलप्रभा जलाशयात वळवायचे आहे. बागलकोट, गदग, धारवाड व बेळगावला पाणीपुरवठा करण्यासाठी ७.५६ टीएमसी पाणी वळविण्याची ही मूळ योजना. त्यासाठी कर्नाटकला तीन बंधारे उभारावे लागतील; हा मार्ग ४९९.१३ हेक्टर वनजमिनीतून जातो व त्यासाठी ४०६.६ हेक्टर वन क्षेत्रावर संक्रांत ओढवणार आहे. जल लवादाने कर्नाटकला ३.९० टीएमसी पाणी वळविण्यास मान्यता दिल्यानंतर गोवा व कर्नाटकने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत; परंतु त्या दरम्यान गेल्या महिन्यात कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकांत राजकीय फायदा मिळविण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने पाणी वळविण्यास मान्यता देऊन टाकली.हा प्रकल्प भीमगड अभयारण्यात मोडतो व म्हादई अभयारण्याला अत्यंत निकट आहे. परंतु आम्ही कायद्याचे रक्षण करू म्हणणा-या कर्नाटकने गेल्या १५ वर्षात या भागात बरीच मोठी बांधकामे करून टाकली असून न्यायालयाच्या आदेशांकडेही सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम असा की गोव्यात येणा-या नदीचा प्रवाह सध्या खूपच कमी झालेला आहे.गोवा राज्याचा सत्तरी तालुका या नदीवर बव्हंशी अवलंबून आहे. पाणी वळविले गेल्यास या भागातील शेती, कुळागरे व मत्स्यजीवनही धोक्यात येणार आहे. शिवाय खारे पाणी आत येऊन आणखी विध्वंस होण्याची भीती आहे. पर्यावरणाचा समतोल ढळेल, तो वेगळा!पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला पाणी वळविण्यासंदर्भात पत्र देताना गोव्याकडे साधी विचारणाही केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. आंदोलन सुरू झाले आहे आणि लोक नव्या मुख्यमंत्र्यांना अत्यंत ‘कमकुवत नेता’ संबोधू लागले आहेत. ‘‘म्हादाईचा ओघ आटत चालला आहे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमाही पातळ होत चालली आहे,’’ अशी टिप्पणी एक सामाजिक कार्यकर्ते आयरीश रॉड्रिग्स यांनी केली. कार्यकत्र्यानी म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्याची भूमिका ठामपणे मांडावी, केंद्रापुढे लोटांगण घालू नये.दुर्दैवाने, राजकीय कारणासाठी कर्नाटकच्या दबावापुढे नमते घेणारे केंद्र चिमुकल्या गोव्याला वाटाण्याच्या अक्षता लावेल, अशी भीती येथे व्यक्त होते. केंद्राने उपनद्यांचे पाणी वळविण्यासंदर्भात पत्र मागे घेतले असले तरी हे संकट संपूर्णत: दूर झालेले नाही. कर्नाटक बेदरकारीने बांधकाम पुढे रेटेल व पाणी वळविण्यास सुरुवात करेल, अशीच सध्याची स्थिती आहे. गेले दोन दिवस कर्नाटकात त्यासाठी आंदोलनही सुरू झालेले आहे. गोव्याचा प्रभाव केंद्रात पडत नाही. गोव्याचे भाजपा नेतेही हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :goaगोवाriverनदी