शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्रभाऊंचा मेसेज जीव वाचवतो तेव्हा...

By राजा माने | Updated: April 2, 2018 00:16 IST

आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी यावेळी कुठलीही असाईन्मेंट न देता केवळ इंद्रदेवांचा एक खलिता देवेंद्रभाऊंना देण्याची जबाबदारी सोपविली. बंद खलिता हाती पडल्यानंतर त्यात नक्की कोणता संदेश असेल, याविषयीची त्याची उत्सुकता ताणली गेली.

आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी यावेळी कुठलीही असाईन्मेंट न देता केवळ इंद्रदेवांचा एक खलिता देवेंद्रभाऊंना देण्याची जबाबदारी सोपविली. बंद खलिता हाती पडल्यानंतर त्यात नक्की कोणता संदेश असेल, याविषयीची त्याची उत्सुकता ताणली गेली. मुंबापुरीतील ‘वर्षा’ महालाकडे तो निघाला असतानाच, नारदांचा फोन त्याला आला. तो फोन म्हणजे खलित्यात काय दडले आहे, हे जाणण्याची संधी, म्हणूनच त्याने नारदांचा फोन घेतला आणि बोलू लागला...यमके : प्रणाम... गुरुदेव! देवेंद्रभाऊंच्या खलित्यात काय दडले आहे?नारद : तूच अंदाज बांधून मला सांग.यमके : मंत्रिमंडळ विस्ताराचा ‘मुहूर्त पेपर’ फोडण्याविषयी असेल, निलंग्याच्या संभाजीराजांना दिलेल्या क्लीन चिटबद्दल असेल किंवा मग, ‘मातोश्री मनोमिलनाबद्दल’ असेल...नारद : शिळ्या बातम्या सांगण्याची तुझी सवय काही जाणार नाही. आता तुला एक ‘क्लू’ देतो... ‘सोलापूर’!यमके : आलं लक्षात! २०१४ सालानंतर मराठी भूमीत बळीराजाच्या आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढल्याचे शरदराव बोलले, तेच ना?नारद : परत चुकतो आहेस शिष्या...यमके : (हातातील मोबाईलने डोके खाजवत) हं... साखरेचा भाव २८०० रुपये आणि शेतातल्या ऊसतोडणीपासून साखर पोत्यात भरेपर्यंतचा खर्च ३२०० रुपये या गणिताबद्दलच ना!नारद : अरे, मनमोहनसिंगांनी केलेल्या ७१ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून ते थेट देवेंद्रभाऊ-सुभाषबापूंनी मराठी भूमीत गाजविलेल्या डिजिटल कर्जमाफीपर्यंतचे सर्व विषय आता जुने झाले आहेत, हे तुला कळत कसे नाही?यमके : मग, आता देवेंद्रभाऊंनी असे काय केले आहे की, ज्यामुळे त्यांना इंद्रदरबारात पाचारण न करता फक्त खलिताच पाठविला जातोय?नारद : अरे, रेशीमबाग आणि खुद्द सरसंघचालक सोशल मीडियाबद्दल नाराजी व्यक्त करतात. ‘मी, मला आणि माझे’ या आत्मकेंद्री मनोवृत्तीत सोशल मीडिया माणसाला गुरफटून टाकतो, असे ते सांगत असताना देवेंद्रभाऊ मात्र वॉर रूम, महामित्र आणि डिजिटल विश्वाशी असलेले आपले नाते घट्ट करताना दिसतात. तेही त्याच्या वापराने लोकहित कसे साधले जाते, हे आपल्या कृतीने सिद्ध करतात...यमके : महागुरू...मला अजूनही आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे, ते समजेना. कृपया, या खलित्यात काय दडले आहे, ते सांगा.नारद : ऐक शिष्या... सरत्या सप्ताहात सोलापूर नगरीतून एका पीडित महिलेने पोटगी मिळण्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळल्याचा ‘एसएमएस’ देवेंद्रभाऊंना पाठविला होता. त्यात आपल्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास उद्या सकाळी आपण आत्महत्या करणार असल्याचे त्या भगिनीने नमूद केले होते. मेसेज पाहताच संवेदनशील देवेंद्रभाऊ अस्वस्थ झाले. तातडीने त्यांनी आपला दरबार गतिमान केला. त्या भगिनीकडे दूत पाठविले. तिची समजूत काढून पोटगी मिळवून देण्याचे अभिवचन दिले. अखेर तिने आत्महत्येचा निर्णय रद्द केला. तिचा जीव वाचविला म्हणून इंद्रदेवांनी देवेंद्रभाऊंचे अभिनंदन करणारा खलिता पाठविला आहे.यमके : बळीराजाला तशी संधी ते कधी देणार? 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण