शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षे वयाचा एक तरुण रॅपर जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:22 IST

नेपाळच्या पंतप्रधानपदी आरूढ होणारे बालेन्द्र शाह हा व्यक्तीचा नव्हे, एका पिढीचा विजय आहे. भ्रष्टाचारी व्यवस्था, जुनाट नेत्यांना ही सणसणीत चपराक आहे!

रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला -

नेपाळमध्ये बालेन्द्र शाह पंतप्रधानपदी आरूढ होण्याची औपचारिकताच काय ती बाकी आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मिळालेला प्रचंड जनादेश हा केवळ एका नेत्याचा विजय नाही, तर तो एका पिढीचा विजय आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेला, दशकांपासून खुर्च्यांना चिकटून बसलेल्या नेत्यांना आणि तरुणाईची स्वप्ने वारंवार पायदळी तुडवणाऱ्या राजकारणाला मिळालेले हे उत्तर आहे. हा निकाल नेपाळपुरता मर्यादित नाही, तर त्याचे पडसाद आसपासच्या देशांमध्येही उमटणे अपरिहार्य आहे. रॅपर ते महापौर आणि आता पंतप्रधानपदाच्या उंबरठ्यावर, हा बालेन्द्र शाह यांचा प्रवास ही एक अनोखी जीवनगाथा आहे. या ३५ वर्षीय नेत्याने महापौरपदाच्या कारकिर्दीत काठमांडूत रस्ते, स्वच्छता आणि अतिक्रमणासारख्या प्रश्नांवर जी कार्यक्षमता दाखवली, ती पाहून नेपाळी जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला; परंतु, महापालिका चालवणे आणि देश चालवणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे पुढील पाच वर्षे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेची असतील.

नेपाळमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये तत्कालीन के. पी. शर्मा ओली सरकारने समाजमाध्यमांवर बंदी लादली. त्याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली. किमान सत्तर जणांना प्राण गमवावे लागले. अखेर ओली यांना पायउतार व्हावे लागले. या घटनाक्रमाने एक महत्त्वाचा संदेश दिला, की सरकार इंटरनेट बंद करू शकते; पण, तरुणांचा आवाज बंद करू शकत नाही! तरुण वर्ग शाह यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी ओली यांना त्यांच्याच मतदारसंघात चार पट मतांनी पराभूत केले.

आता शाह यांना जनतेच्या प्रचंड अपेक्षांवर खरे उतरावे लागेल. त्यांच्या पक्षाने पुढील पाच वर्षांत बारा लाख रोजगार निर्माण करण्याचे आणि दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. हे खूप महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. नेपाळ हा भूपरिवेष्टित देश. अर्थव्यवस्था मर्यादित. लाखो नेपाळी तरुण खाडी देशांत, मलेशियात आणि युरोपात कामाच्या शोधात जातात. हे स्थलांतर थांबवायचे असेल, तर देशांतर्गत संधी निर्माण कराव्या लागतील; परंतु जुनी नोकरशाही, जुनी न्यायव्यवस्था आणि जुन्या पक्षांचे अवशेष सहजासहजी बाजूला सरकणार नाहीत. व्यवस्था बदलणे हे निवडणूक जिंकण्यापेक्षा कितीतरी पटींनी कठीण असते, हा अनुभव यापूर्वीही अनेक नेत्यांनी घेतला आहे. 

शाह सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास नेपाळची वाटचाल कोणत्या दिशेने होईल? अभ्यासक या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीलंकेचे उदाहरण समोर ठेवतात. गोटाबाया राजपक्षे यांनाही मोठा जनादेश मिळाला होता; पण, आर्थिक संकटात जनता राष्ट्राध्यक्ष भवनातच घुसली! नेपाळमध्येही भ्रमनिरास झाल्यास तरुण पिढी पुन्हा रस्त्यावर येऊ शकते. तो संताप अधिक तीव्र असेल; कारण अपेक्षा जास्त होत्या. शिवाय, अपयशाच्या सावटाखाली माओवादी विचारसरणीचे पुनरुज्जीवन किंवा कट्टर राष्ट्रवादाचा उदय होण्याची भीती आहे. 

भू-राजनैतिक दृष्टिकोनातून नेपाळला भारत आणि चीनमध्ये समतोल साधावा लागतो. शाह यांनी भारत-नेपाळ शांती व मैत्री करारांवर पुनर्विचाराचे संकेत दिले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक निकालानंतर लगेच शाह यांच्याशी दूरध्वनीद्वारा संपर्क साधून सहकार्याची इच्छा व्यक्त केली. हा सकारात्मक पुढाकार आहे; परंतु, भारताला हे लक्षात ठेवावे लागेल, की स्वाभिमानी, स्थिर आणि समृद्ध नेपाळच दीर्घकालीन भारतीय हितासाठी अनुकूल ठरेल. नेपाळच्या अंतर्गत दुर्बलतेचा फायदा उचलण्यासाठी चीन नेहमी टपलेलाच असतो. त्यामुळे भारताने नेपाळसोबत व्यावहारिक आणि समानतेच्या आधारावर संबंध ठेवणे आवश्यक आहे.

बांगलादेशात २०२४ मध्ये तरुणाईने शेख हसीना यांचे सरकार उलथवले होते. लोकशाही मार्गाने व्यवस्था बदलता येते, हा विश्वास नेपाळ आणि बांगलादेशांतील घटनाक्रमांनी तरुणाईच्या मनात निर्माण केला आहे. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या शेजारी देशांमध्येही बेरोजगारी, महागाई, शिक्षण व्यवस्थेतील दोष या मुद्द्यांवर असंतोष धुमसत आहे. त्या देशांतील तरुणांना नेपाळचे उदाहरण  प्रेरित करू शकते. या सगळ्या घडामोडींमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे समाजमाध्यमे! सीमा बंद करता येतात; पण, इंटरनेट बंद करणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे. बातम्या काही तासांतच संपूर्ण जगात पोहोचतात. त्यामुळे कोणत्याही सरकारला आता जनतेपासून लपता येत नाही. नेपाळच्या तरुण पिढीने प्रस्थापितांना नाकारून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. ती वाया घालवल्यास, तरुणाईचा लोकशाहीवरील विश्वास डळमळेल.  रॅपर ते पंतप्रधान असा प्रवास करणारे बालेन्द्र शाह यांची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. ते यशस्वी झाल्यास, आशेचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो; परंतु, अपयशी ठरल्यास, ती एका पिढीची शोकांतिका ठरेल!     ravi.tale@lokmat.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Young Rapper Becomes Prime Minister: Nepal's Political Earthquake

Web Summary : Nepal's election of a young rapper as Prime Minister signals a generational shift. His success hinges on fulfilling ambitious promises of job creation and economic growth. Failure could lead to instability, echoing Sri Lanka's crisis, and renewed social unrest. Balancing relations with India and China is crucial for Nepal's stability.
टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधान