शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ खेद वाटून उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:49 IST

मिलिंद कुलकर्णी खान्देशातील सर्वच रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोज अपघात होत आहेत. माणसे जिवानीशी जात आहे. कितीतरी जायबंदी ...

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील सर्वच रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोज अपघात होत आहेत. माणसे जिवानीशी जात आहे. कितीतरी जायबंदी होत आहे. परंतु, रस्तेदुरुस्तीसंबंधी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर प्रचंड उदासीनता आणि वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे, हे संतापजनक आहे.उदासिनतेची दोन उदाहरणे याठिकाणी नमूद करायला हवी. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्ते दुरुस्तीच्या कामांची गती वाढवा, असे आदेश दिले. अशा किती बैठका होतात आणि त्यात सूचना दिल्या जातात. पण रस्ता का दुरुस्त होत नाही, अडचणी काय आहेत, हे कधी जनतेपुढे येत नाही. राष्टÑीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महापालिका-पालिका यांच्यावर रस्त्यांची जबाबदारी असताना कोणताही विभाग वस्तुस्थिती मांडत नाही. उपचारापुरता शासकीय बैठका होतात आणि त्यात सूचना केल्या जातात. त्याचे पुढे काय होते, हे त्या परमेश्वराला ठाऊक.खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावात महामार्गाच्या साईडपट्टया दुरुस्तीचा शुभारंभ केला. महापालिकेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आता रस्ते होतील. कामाला वेग येईल. यापूर्वी काम संथ होते, अपघात होत होते, याबद्दल खेद वाटतो, असे खासदारांनी नमूद केले. यापुढे महामार्गावर अपघात झाला तर संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. हा तोंडदेखला खेद वाटून आणि गंभीर इशारा देऊन काही साधणार आहे का? खासदारांना खेद वाटल्यानंतर आठवडाभरात रोज अपघात झाले आणि किमान एकाचा बळी तरी गेला. किती जायबंदी झाले, त्याची मोजदाद नाही.तिकडे केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते कामाविषयी संवेदनशील असल्याचे दाखवत काही आदेश, सूचना केल्याचे दिसले. जळगाव ते औरंगाबाद रस्त्याचे काम आठवडाभरात सुरु होईल, असे त्यांनी सांगितले आणि ठेकेदाराला तंबी दिली. पण कुठे काम सुरु झाले? कुठे गती आली हे काही लोकांपर्यंत आले नाही. एक कंत्राटदार पळाला म्हणून आता १५० कि.मी.चे काम तीन कंत्राटदारांमध्ये विभागून देण्यात आले. आता पुन्हा त्यांना नवी मुदत दिली गेली असणार, म्हणजे पुन्हा प्रतीक्षा कायम आहे.कंत्राटदारांकडून खंडणी आणि कमिशन मागणाºया सर्वपक्षीय खासदार, आमदारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशदेखील नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सीबीआय, ईडी आणि केंद्रीय दक्षता आयोगाला त्यांनी पत्र लिहून कारवाईचे आदेश दिले आहेत. पुराव्यासह पोलीस स्टेशनला तक्रार करा, असे आवाहन नागरिकांनाही त्यांनी केले आहे.गडकरी यांची भूमिका धाडसी आणि स्वागतार्ह आहे. परंतु, हा प्रकार नवा आहे का? अशा किती तक्रारी झाल्यावर कारवाई झालेली आहे? आणि नागरिकांना तक्रारीचे धाडस कसे होेणार? वैयक्तीक अन्यायाची तक्रार नोंदविली जात नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेतील एका घटकाविरुध्द नागरिकाने तक्रार करणे कसे शक्य आहे?गडकरी यांचा उद्देश चांगला असला तरी हे प्रत्यक्षात येणार आहे काय? दहा वर्षांपूर्वी फागणे ते चिखलीपर्यंतच्या महामार्गाचे काम करणाºया एल अँड टी कंपनीला का पळून जावे लागले? कोणत्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदार पळाला, हे जगजाहीर आहे, मग त्यांच्यावर कारवाई होणार काय? जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार ऋत्वीक कन्स्ट्रक्शनने काम का सोडले, त्याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर मिळत नाहीच.रस्ते बांधकामाचे सरकारचे नियोजन चुकले आहे, कामे वेगवेगळ्या कामांमुळे लांबली आहेत आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. जळगावचा विचार केला तर चारही दिशांनी रस्त्याची कामे सुरु असल्याने अपघात, वाहतुकीची कोंडी याचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. औरंगाबाद, भुसावळ, धुळे, चाळीसगाव अशा चारही रस्त्यांची अवस्था बिकट आहे.हे झाले महामार्गाचे. आता राज्य मार्ग, शहरातील रस्ते यांची अवस्था तर वर्णनापलिकडे आहे. दुरुस्ती, डागडुजीसारखे उपचार केले जातात, तेवढ्या खर्चात तर नवीन रस्ता तयार होईल. पण कुणाचा पायपोस कुणात नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे. भाजपच्या मंडळींनी भूमिपूजन केले होते, तरी पाच वर्षे कामे मार्गी लागली नाहीत. आता राज्यात नवे सरकार येत असल्याने भाजपवाले हात वर करायला मोकळे होतील. नवे सरकार आले तरी फार काही बदल होईल, असे काही वाटत नाही. त्यांना समजून घ्यायला पुन्हा वर्ष-दोन वर्षे लागतील. नागरिकांच्या नशिबी आहेच, खड्डे आणि धूळ.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव