शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लोक काय काहीही म्हणतात !

By सचिन जवळकोटे | Updated: March 3, 2019 06:33 IST

लगाव बत्ती

सचिन जवळकोटे

  थोरले काका बारामतीकरांनी परवा थेट सांगून टाकलं, ‘माढ्याची बारामती करू, असं मी कधीच बोललो नव्हतो !’ हे ऐकताच दोन्ही जिल्ह्यातील भोळ्या-भाबड्या जनतेचे डोळे खाडकन् उघडले गेले. गेली दहा वर्षे पाहिलेलं ‘स्वप्न’ एका क्षणात ‘भ्रम’ कॅटेगिरीत मोडलं गेलं. खरंतर ‘मी असं म्हणालो नव्हतो,’ हे वाक्य थोरल्या काकांच्या तोंडून आम्ही पामरांनी लहानपणापासून ऐकलेलं; मात्र ज्यांनी मोठ्या विश्वासानं निवडून दिलेलं, त्यांच्यावरच हे डायलॉग ऐकण्याची वेळ आली. अरेरेऽऽ. असो. या भ्रमनिराशेच्या वेदनेतून काही नेत्यांना पत्रं लिहिलीयंत, त्याचाच हा गोषवारा.

प्रिय थोरले काका,  आपल्या पुनर्गमनामुळे आम्ही आनंदीत झालोत की गोंधळलो आहोत, हेच नेमकं लक्षात येईनासं झालंय. ‘माझं मत.. भावी पंतप्रधानाला मत,’ असं ज्या शिवारात दहा वर्षांपूर्वी मोठ्या कौतुकानं सांगितलं गेलं होतं, तिथंच आता ‘माढा.. बारामतीकरांना पाडा!’ अशा पोस्ट मोबाईलवर गराऽऽ गराऽऽ फिरताहेत. विशेष म्हणजे, यात तुमचेच काही शिलेदार मोठ्या त्वेषानं उतरलेत म्हणे. गेली पन्नास वर्षे आपण अजिंक्य राहिलात. आपला पराभव करणं म्हणजे आजपावेतो स्वप्नातीत गोष्ट समजत होतो; मात्र माढ्याच्या रणांगणात ज्या पद्धतीचे मेसेज लोकांमधूनच फिरू लागलेत, ते पाहता नव्या चमत्काराचे किंवा विक्रमाचे धनी होण्याची लोकांनाच घाई लागली की काय, अशी भीती वाटू लागलीय.    यावेळीही आपल्यासोबत पहिल्या फळीतले सारेच नेते आहेत; मात्र लोकांना घड्याळ्यापर्यंत पोहोचविणारी प्रत्यक्ष मैदानातली यंत्रणा अकस्मातपणे का बिथरलीय, हेच कुणाच्या नीट लक्षात येईनासं झालंय. साताºयात प्रभाकर लोधवडेकरांना अन् सोलापुरात विजयदादा अकलूजकरांना झुलवत ठेवून शेवटच्या क्षणी तुम्ही खासदारकीवर हक्क सांगितलात, हेच कदाचित इथल्या लोकांना न आवडलेलं. राजानं राजासारखं रहावं. स्वत:च्या साम्राज्यातलंच सिंहासन सांभाळावं. एकनिष्ठ सरदारांच्या मनसबदारीवर अधिकार गाजवावा; मात्र हक्क दाखवू नये.. असं म्हणे लोक म्हणतोहेत... पण जाऊ द्या सोडा; लोक काय काहीही बोलतात !  ता.क. : ‘विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार,’ असं तुम्ही अकलूजमध्ये म्हणालात, तेव्हा तिथल्या चाणाक्ष पत्रकारांनीही तत्काळ याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं.. कारण  परत पुढल्या वर्षी कुणाच्या कानावर हे वाक्य पडू नये म्हणजे मिळविली; ‘असं मी म्हणालोच नव्हतो !’

प्रिय राजन मालक,  मोहोळमधल्या एका लग्नात म्हणे तुम्हाला शेटफळचे ‘मनोहरभाऊ’ दिसले. नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन आपुलकीनं चौकशी केलीत, तेव्हा त्यांनी रागारागात तुमचा हात झटकला. ‘माझ्याशी बोलत जाऊ नका म्हणून एकदाच सांगितलं होतं ना !’ असंही त्यांनी सुनावलं. हा सारा प्रकार शेकडो व-हाड्यांनी याचि देही याचि डोळा पाहिला. खरंतर, असा प्रसंग यापूर्वीही कैकवेळा घडलेला; मात्र लोकांसमक्ष प्रथमच. असो. शत्रुला मित्र बनविण्याची तुमची हातोटी मात्र बारामतीकरांच्या पावलावर पाऊल टाकण्याजोगी. जाता-जाता अजून एक आठवलं ‘बाळराजें’नीही तुमचं हे कसब अवगत करायला हरकत नाही; पण ‘लक्ष्मणरावां’चं काय करायचं हो? कारण पूर्वीचा मित्र नंतर शत्रू बनणं राजकारणात नेहमीच धोकादायक. 

होली बिडरीऽऽ महाराज !प्रिय महाराज,सध्या गौडगावचा मठ जगाच्या नकाशावर आलाय की काय महाराऽऽज. ‘भगवा नेता’ म्हणून योगी आदित्यानंतर आता तुमचाच नंबर लागणार दिसतोय. कधी नव्हे ते दोन्ही देशमुखही तुमच्यासोबत देवेंद्रपंतांना भेटायला आलेले. भलेही ‘सुभाषबापूं’ची इच्छा असू दे..नसू दे; परंतु ‘दक्षिण’मध्ये ‘तम तम मंदीं’ना दुखवून चालणार नाही, हे ओळखण्यात बापू चाणाक्ष; मात्र तुम्ही तर म्हणे त्यांच्यापेक्षाही हुशार. केवळ सोलापूरवरच विसंबून न राहता थेट कर्नाटकातून दिल्लीशी लिंक लावली. डायरेक्ट येडीयुरप्पाच? यप्पोऽऽ बक्कळ भारी...पूर्वी इंडीच्या पाटलांसाठी मदतीला धावणारे देवेगौडा आठवले. असो. आजपर्यंत लोकांना आशीर्वाद देणारे हात आता मतदारांसमोर जोडले जाऊ नयेत, असंही काही लोकांना वाटू लागलंय. ही इच्छा केवळ तुमच्या हितचिंतकांचीच की ‘हात’वाल्या कार्यकर्त्यांचीही, हे एकदा ‘वालेंच्या प्रकाशआण्णां’ना विचारायला हवं. होली बिडरी महाराजऽऽ तुम्ही जास्त विचार करू नका. तेवढं टेलरकडं शिवायला टाकलेला नेहरू शर्ट कधी घालणार, तेवढं सांगा.( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवार