शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आपली मुलं कोणत्या माध्यमात शिकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:51 IST

मातृभाषेतील शिक्षणाच्या बाजूने समाजाला उभे करणे हे कितीही आव्हानात्मक असले तरी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- डॉ. वीणा सानेकरमातृभाषेतील शिक्षणाच्या बाजूने समाजाला उभे करणे हे कितीही आव्हानात्मक असले तरी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीप्रेमी पालक महासंमेलन हा असाच एक सकारात्मक प्रयत्न आहे. मराठी शाळा हा मराठीच्या अस्तित्वाचा कणा आहे या धारणेतून मराठी अभ्यास केंद्राने सहयोगी शाळा व सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून हे महासंमेलन सुरू केले.गेल्या वर्षी मुंबईतील मध्य उपनगरात सायन येथे पहिले महासंमेलन झाले आणि या वर्षी गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी संमेलनाचे भव्य आयोजन केले गेले आहे. ८ तारखेला मराठी शाळा जागर फेरीपासून संमेलनाची सुरुवात होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाचे उद्घाटन करतील. तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे असतील. गेल्या वर्षीच्या संमेलनात ‘शिक्षणाच्या माध्यमाबाबत आई म्हणून माझी भूमिका’ या विषयावर मत मांडणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुर्वे यांची उपस्थिती या पालक संमेलनास आहे.मातृभाषेतून शिकून विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केलेल्या यशवंतांशी संवाद हे या संमेलनातले महत्त्वाचे सत्र आहे. तसेच मराठी शाळांमध्ये महानगरापासून ग्रामीण भागापर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षणातले विविध प्रयोग करणाºया शिक्षकांचे प्रयोग सर्वदूर पोहोचणे, त्यांची चर्चा होणे, मराठी शाळांच्या सक्षमीकरणाकरता नावीन्यपूर्ण उपायांचा शोध घेणे गरजेचे आहे. संमेलनाच्या दुसºया दिवशी या विषयावरील सत्रात बेळगाव, नांदेड, कराड येथील मराठी शाळांकरता मूलभूत काम करणारे अर्जुन कोळी, शिवाजी आंबुलगेकर, गोविंद पाटील यांसारखे शिक्षक सहभागी होत आहेत. या सत्रात ग्राममंगलच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी शिक्षणाची पायवाट घालून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सहभागी होत आहेत. कोणत्या भाषेत आपल्या मुलांना शिकवायचे याचा अधिकार आईला असतो का? किंवा महाराष्ट्रात घराघरातील मातांचा शिक्षणाचे माध्यम म्हणून मायबोलीवर विश्वास आहे का? याविषयी अंनिस कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर आयुर्वेदतज्ज्ञ चंदा बिराजदार आणि सई तांबे या आई म्हणून आपली भूमिका मांडणार आहेत.राजकीय पक्षांच्या मराठी शाळांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेत यापुढील काळात पुरेशी स्पष्टता येणे गरजेचे आहे. या संमेलनात या मुद्द्याला काही तरी टोक येईल आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी केवळ पोकळ आश्वासने देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. संमेलनात मुंबईच्या महापौरांची उपस्थिती, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचा अध्यक्षीय समारोप, लेखक व उद्योजक मंदार भारदे यांची समारोप सत्रातील उपस्थिती, कौशल इनामदार यांचा ‘लाभले आम्हांस भाग्य’ हा कार्यक्रम, विविध वृत्तवाहिन्यांवरील निवेदकांचे सूत्रसंचालन, पालक व शिक्षकांसाठी स्पर्धा होणारआहेत.महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे स्टॉल आणि वीस प्रकाशकांचे स्टॉल्स ही तर पर्वणीच ठरावी. एकूणात मराठी अभ्यास केंद्र व नूतन विद्यामंदिर, दहा सहयोगी संस्था आणि दहा सहयोगी शाळा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले हे मराठीप्रेमी पालक संमेलन शिक्षणक्षेत्रात एक नवे वारे घेऊन आले आहे. मराठी शाळा आम्हाला हव्या आहेत की नाहीत, या प्रश्नाबाबत कायमच संभ्रमात असणारा मराठी भाषिक समाज या संमेलनाला किती हजेरी लावतो यावर संमेलनाचे यश अवलंबून आहे.( लेखिका शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Studentविद्यार्थी