शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:04 IST

आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते.

अधिक कदम, संस्थापक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

१९९७ पासून मी जम्मू-काश्मीरमध्ये राहतो आहे. सीमाभागातील समुदायांमध्ये  एकमेकांप्रतीच्या विश्वासाची पुनर्बांधणी करणं आणि मैत्रीचं बीज रोवणं हे काम मी इथे करत आलो आहे. दुःखातून दिलासा मिळवण्याचा आणि दुरावलेली मनं सांधण्याचा हा प्रवास आहे.

पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला काश्मिरींसाठी अत्यंत धक्कादायक होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. भारतीयांनी फक्त प्रत्युत्तराचीच नाही तर न्यायाचीही मागणी केली. भारत सरकारने सीमेपलीकडील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी तातडीने पावलं उचलली आणि शत्रूराष्ट्राला ठोस प्रत्युत्तर दिलं. ते देतानाच प्रारंभी भारत सरकारने त्यांच्या लष्करी यंत्रणांना धक्का लावला नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातही पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाला. या काळात मी स्वतः पूंछ, राजौरी, उरी, अखनूरसारख्या सीमावर्ती गावांमध्ये होतो. या गावांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार झाला. आमच्या संस्थेतील काही मुली याच परिसरातील आहेत. त्यांची गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. काहींनी नातेवाईक गमावले, काहींची घरं आता नाहीशी झाली आहेत. आजूबाजूला युद्धाचं एवढं गर्द सावट असतानाही आमच्या सर्व बालगृहांतील हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध अशा सर्व जातिधर्माच्या मुली आपापल्या श्रद्धेनुसार एकत्र प्रार्थना करीत होत्या. त्यांना पाहून वाटलं, हीच आपल्या भारतीय असण्याची खरी ओळख आहे. 

भारत हा केवळ एक शक्तिशाली देश नाही. नैतिकता, मानवता आणि सहिष्णुता हा भारताचा श्वास आहे, हे पहलगामनंतर, प्रामुख्याने सीमाभागात तणाव उसळलेला असताना जगाला दाखवून देणं आवश्यक होतं. ते दाखवण्यासाठी भारतभरातून प्रयत्न झाले जे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी काय करायचं? सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनात कडवटपणा नव्हे, तर बंधुत्वाची भावना जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काश्मिरी हे भारताचेच नागरिक आहेत आणि ते आपला अविभाज्य भाग आहेत हे आपण भारतीय म्हणून सदैव लक्षात ठेवायला हवं. घडलेल्या घटनांमुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल दोष, रोष किंवा अविश्वास बाळगणं हे आपल्या देशाच्या शांततेला धक्का पोहोचवणारं ठरेल. 

पाकिस्तानसारखे देश आपल्यामध्येच भेदाच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने पहलगाम आणि त्यानंतरच्या घटना घडल्या. हे केवळ हल्ले नाहीत तर आपल्यात फूट पाडण्याच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय रणनीतीचा तो एक भाग होता याचा विसर आपल्याला पडून चालणार नाही. भारताला युद्धसदृश परिस्थितीमध्ये खेचून काश्मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा हेतू होता. तिसऱ्या देशांची मध्यस्थी होऊन शस्त्रसंधी जाहीर झाली आणि काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय न ठेवता जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला यश आलं. कलम ३७० रद्द झाल्यानंतर भारत आता पीओकेच्या दिशेने वाटचाल करेल ही भीती पाकिस्तानला आहे. पण, भारताची भूमिका स्पष्ट आणि शांततेची राहिली तर दहशतीचा अंत होईल. विश्वास वाढीला लागेल. 

या काळात आम्ही लेहहून कारगिल, झोजीलापासून गुरेझ, कुपवाऱ्यापासून अनंतनाग, पूंछपासून राजौरी आणि अखनूर ते आर. एस. पुरा असा सतत प्रवास करीत होतो. संघर्षकाळात समाजात भीती नको तर विश्वास असावा असं आम्हाला वाटत होतं. सीमाभाग अशांत होता तेव्हा आम्ही आमच्या देशाच्या अंतःकरणात शांततेचा संवाद रुजवत होतो. 

पहलगाममधील भ्याड हल्ल्याला हेच सर्वांत योग्य उत्तर आहे. घृणेच्या बदल्यात प्रेम आणि दहशतीच्या बदल्यात उदंड मानवता!  आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत.  खरी स्थिरता ही बंदुका आणि तोफांमधून नाही तर आपुलकीतून निर्माण होते.     adhik@borderlessworldfoundation.org

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर