शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जन्मस्थळावरून आत्ता भांडून काय होणार आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 07:47 IST

देवाच्या नावानं भांडणारी धर्मपीठे, संघटना जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय करतात, हा प्रश्न एकदा या आखाडाधारी महंतांना खडसावून विचारला पाहिजे!

अनेक दशके वादग्रस्त राहिलेला आणि जनमानस ढवळून काढलेला राममंदिर - बाबरी मशीद मुद्दा न्यायालयीन निर्णयाने मिटतो तोच देशात ‘मथुरा, काशी बाकी हैं’चा नारा निनादू लागला. जोडीला तुमचा लाऊडस्पीकर तर आमची हनुमान चालीसा, ज्ञानव्यापी मशीद की शिवलिंग आदी धार्मिक कट्टरतावादाची चढती कमान दिसू लागली. काल-परवापर्यंत या कलहामागे आंतरधर्मीय अस्मितांची किनार होती. पण, आज धार्मिक अस्मितांची प्रतीके भक्कम करण्याचा हा खेळ इतका विकोपाला गेला आहे की हनुमान जन्मस्थळावरून हिंदू धर्मपीठांतच वाद सुरू झाला आहे. 

वाल्मीकी रामायणाच्या आधारे जगद्गुरू शंकराचार्यांनी मान्यता दिल्यानुसार हनुमानाचे जन्मस्थळ कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधा ट्रस्टने केला. याला नाशिकजवळच्या अंजनेरीचे ग्रामस्थ आणि इतर आखाड्यातील साधू - संत - महंतांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अंजनेरी हनुमान जन्मस्थळाचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित कथित धर्मसभेत जमलेल्या संत - महंतांतील पुढारी  हमरीतुमरी - हातघाईवर आल्याचे सर्वांनी पाहिले.  हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘काॅंग्रेसवाले - भाजपवाले’ या राजकीय पातळीवर पोहोचली.

भारतात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालत असतात, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. पण, धर्ममार्तंडांआडून राजकारण करणाऱ्यांना शेवटी धर्ममार्तंडच अडचणीत आणत असतात हे वास्तवदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. एका बाजूला जगाला मन:शांतीचे उपदेशामृत पाजत अध्यात्माची महती गायची आणि स्वतः मात्र अशांतीचा मार्ग अवलंबायचा! यावरून या तथाकथित धर्मगुरूंना आपलाच ‘डोलारा’ सांभाळता येत नाही, हेच अधोरेखित होते. या सर्व घडामोडी, दावे - प्रतिदावे, धर्मपीठांवरील वर्चस्वाच्या लढाईचे वर्णन देव झाले उदंड आणि भक्तांना चढला भक्तीचा गंड,  देव देव्हाऱ्यात आणि भक्त उन्मादात, असेच करावे लागेल.

श्रद्धाळू भक्त मनातल्या आस्थेपायी देवस्थानात येतो, काही काळ थांबतो, मनोभावे प्रार्थना करतो, यथाशक्ती देणगी देतो आणि सुखा-समाधानाच्या आशेने घरी परततो. मात्र, त्यांच्या या स्वाभाविक आणि आस्थेच्या छोट्या कृतीतून देवस्थान नावाचा भला थोरला  डोलारा उभा राहिला. दुसरीकडे देवतांबरोबरच धार्मिक गुरू - बाबा - आचार्य यांचीही संख्या व प्रस्थ झपाट्याने वाढून बलाढ्य आणि धनाढ्य धार्मिक संस्थाने निर्माण झाली. खेदाची बाब म्हणजे या धार्मिक संस्थानांना जनाधार आणि राजाश्रयदेखील मिळत आहे. नेतृत्वाने जनतेला वळण लावणे गरजेचे आहे. पण, आज नेतृत्वच जनतेच्या वळणाने जाण्यात धन्यता मानत आहे. 

आज देशापुढे अगणित समस्या आहेत. त्या नजरेआड करून धर्मज्वर जागता ठेवण्यात आपण वेळ दडवतो आहोत. सामाजिक विज्ञानाचा एक सिद्धान्त आहे की, जसजसा एखादा समाज शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगत होत जातो तसतशी तेथील जनता आधुनिक विचारांची होत जाते. पण, आपला समाज या विज्ञानाला अपवाद ठरतो आहे. देवाच्या नावानं भांडणारी धर्मपीठे, संघटना जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय करीत असतात? म्हणूनच कदाचित एका द्रष्ट्या विचारवंताने असा रोखठोक सवाल उपस्थित केला होता की, ‘कुठे असतात ही धर्मपीठे? आणि एरवी हे धर्मगुरू काय करीत असतात?’ - आज हा प्रश्न कधी नव्हे इतका महत्त्वाचा ठरतो आहे! - बाळकृष्ण शिंदे, पुणे