शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

‘बॅड बँक’ म्हणजे नक्की काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 04:40 IST

थकीत कर्जे किंवा अनुत्पादित कर्जे ही बँकांची मोठी डोकेदुखी! त्या कचाट्यातून त्यांची मान सोडवण्यासाठीची ही कल्पना तशी जुनीच आहे!

प्रा. नंदकुमार काकिर्डे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

पूर्वार्ध - केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना नजिकच्या काळात ‘बॅड बँके’ची (ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी - एआरसीची ) स्थापना केली जाईल, असे जाहीर करून त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचे भांडवल दिले. त्यानंतर देशात या संकल्पनेची चर्चा सुरू झाली. खरं तर ही काही नवीन कल्पना नाही. आपल्याकडे २००२ मध्येच सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड रिएन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट ॲक्ट ( सरफेसी ॲक्ट ) हा कायदा करण्यात आला. त्यानुसार अनेक ‘एआरसी’ज् देशात अस्तित्वात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ‘बॅड बँके’ची संकल्पना काय, त्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याचा थोडा धांडोळा घेऊ.

भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून बँकिंग क्षेत्र अस्तित्वात आहे. त्यात खासगी, सहकारी व सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या बँका मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व बँकांचा एकूण कारभार, व्यवसाय प्रचंड मोठा आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेवींबरोबरच उद्योग, व्यापार व अन्य विविध वर्गांना, क्षेत्रांना कोट्यवधी रुपयांची कर्जे या बँका देतात. सर्वसामान्यांनी काबाडकष्ट करून बचत, ठेवींद्वारे या बँकांकडे विश्वासाने पैसा सोपवलेला असतो. केंद्र सरकारच्या मालकीचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये असले तरी तो पैसा अखेर जनतेचाच असतो.

या सर्व बँकांचीच एकूण आर्थिक कामगिरी, कार्यक्षमता, नफा-तोटा, कर्जवाटप, त्यांची वसुली व बँकांची थकीत कर्जे किंवा अनुत्पादित कर्जे ( ज्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् - एनपीए म्हणतात), बुडीत कर्जदारांची नावे, यादी, त्यांचे पळून जाणे याची माहिती किंवा आकडेवारी पाहिली किंवा ऐकली तरी सर्वसामान्य माणसाचे डोके गरगरायला लागते. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात देशभरात कोरोनाने थैमान घातले. त्यापोटी लादल्या गेलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व व्यापार, उद्योग, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले गेले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूलतेचा परिणाम बँकांच्या कामगिरीवर तसेच कार्यक्षमतेवर झाला. सर्व बँकांच्या थकीत कर्जामध्ये प्रचंड वाढ झाली व त्यामुळे अनुत्पादक, थकीत कर्जांचा डोंगर वाढत राहिला.

केंद्र सरकारसमोर ‘एनपीए’ निस्तरण्यासाठी ‘बॅड बँके’ची स्थापना करावी, असा प्रस्ताव विचाराधीन होता. ही ‘बॅड बँक’ म्हणजे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) होय. या ‘बॅड बँके’च्या निर्मितीतून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा ताळेबंद सुधारला जावा, अशी कल्पना आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांची अनुत्पादित, थकीत कर्जे (मालमत्ता) या ‘एआरसी’ला विकायची, त्यांच्याकडे पूर्ण वर्ग करावयाची व त्या बॅड बँकेने थकीत कर्जाच्या मालमत्ता बाजारात विकण्याचे बाळंतपण, कर्ज वसुलीची कार्यवाही कार्यक्षमतेने करावयाची अशी ही कल्पना आहे. दरवर्षी मार्चअखेरीस सर्व बँकांना त्यांच्या थकीत, अनुत्पादक कर्जांसाठीची तरतूद ढोबळ नफ्यातून वजावट करून करावी लागते.

अनेक वेळा ही कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) करावी लागतात; मात्र त्यामुळे कर्जवसुली थांबत नाही. ती कारवाई पुढे सुरू ठेवावी लागते; मात्र थकीत कर्जामुळे बँकांची आर्थिक गाडी बिघडते व कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. ही तोट्याची गाडी थांबवावी म्हणून केंद्र सरकारने सर्व थकीत किंवा अनुत्पादक कर्जे वेगळी काढून ती या ‘बॅड बँके’कडे पुस्तकी किमतीला वर्ग (कमी बाजार मूल्य लक्षात घ्यायचे नाही) करावयाची. म्हणजे या सर्व मालमत्तांची जबाबदारी ‘बॅड बँके’ने घ्यायची व मालमत्ता विक्रीतून कर्जफेड करून घ्यायची, अशी ही कल्पना! बँकांनी जनतेकडून ठेवी घ्याव्यात, योग्य कर्जदारांना कर्जे द्यावीत व अगदी अखेरच्या रुपयापर्यंत त्याची योग्य, वाजवी व्याजदराची, मूळ कर्जाची परतफेड होते किंवा कसे, याकडे लक्ष देऊन कार्यक्षम बँकिंग व्यवसाय करावा. या सर्व बँका बँकिंग नियमन कायद्यानुसार व रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करीत असतात. त्यामुळे कर्जे देणे, त्याची वसुली करून छोट्या मोठ्या व्यापारी, व्यावसायिक यांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी सतत ठेवली पाहिजे. बँकांच्या ताळेबंदामधून ही थकीत कर्जे काढून टाकली व त्यांच्या वसुलीची स्वतंत्र, कार्यक्षम यंत्रणा उभारली तर यावर चांगला मार्ग निघू शकेल, अशी ही चांगली कल्पना निश्चित आहे. मात्र या ‘बॅड बँके’चे यश अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्याबद्दलची चर्चा उद्या या लेखाच्या उत्तरार्धात करू!nandkumar.kakirde@gmail.com

टॅग्स :bankबँक