शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

जैवविविधता म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:37 AM

औरंगाबादेत एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे?

औरंगाबादेत एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे? दिल्लीत एवढे प्रदूषण असतानाही तो मिळतोच की. वेळ आलीच तर आॅक्सिजनच्या टाक्या विकत घेऊन आम्ही ती गरज भागवू; पण कोट्यवधींचा खर्च या सरोवराच्या पर्यटनातूनच उभा करू... महापौरांना असेच वाटत असेल, तर बिघडले कुठे?औरंगाबादेत जैवविविधतेने संपन्न असलेले सलीम अली सरोवर लवकरच शहरातील आकर्षक पर्यटन केंद्र होणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी फौजफाट्यासह दोन दिवसांपूर्वी या सरोवराची पाहणी केली. सरोवराच्या सौंदर्यीकरणावर पालिकेकडून दीड कोटी रुपये खर्चूनही ते खुले करता आले नाही, ही सल त्यांना बोचत असावी कदाचित. त्यामुळेच औरंगाबाद खंडपीठाने या सरोवराचे दरवाजे दोन वर्षांपूर्वी बंद केले असले तरी लवकरच ते खुले करू, अशी घोषणा महापौरांनी करून टाकली. ते चुकले कसे म्हणता येईल? जैवविविधता म्हणजे काय रे भाऊ? या सरोवरात १६ प्रकारची झाडे, ११ प्रकारची काटेरी झुडपे, आठ प्रकारच्या वेली, ३२ प्रकारच्या औषधी वनस्पती, १० प्रकारची शेवाळे, १२ प्रकारच्या जलवनौषधी, १०२ प्रकारचे कीटक, नऊ प्रकारचे मासे, आठ प्रकारच्या सापांसह १५ प्रकारचे सरपटणारे प्राणी, पाच प्रकारचे उभयचर प्राणी, सात प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारची फुलपाखरे आढळतात, तसेच तब्बल ८२ प्रकारचे देशी-विदेशी पक्षीही दिसतात. जलपर्णीमुळे कीटक, जलचर प्राण्यांचे येथे वास्तव्य असते. तेच या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. म्हणून काय हे सरोवर कायमचे बंद ठेवायचे? पर्यटनातून भरपूर पैसा मिळू शकतो, एवढेच आम्हाला ठाऊक. २०१४ साली जुलै महिन्यात महापालिकेने उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल करून हे सरोवर खुले केले. जैवविविधता समितीची परवानगी न घेताच परवानगी घेतल्याचा दावा केला. सरोवराच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले. एवढा खटाटोप केल्यानंतर न्यायालयाचा आदेश म्हणून हे सरोवर बंद कसे ठेवायचे? एवढ्यावरच काय आम्ही हार मानायची? सलीम अली सरोवर म्हणजे पक्ष्यांसाठी नंदनवन आहे, कबूल. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदेशी पक्षी येत असतात, हेही कबूल. येथे नागरिकांचा वावर वाढल्यास हे परदेशी पाहुणे येणार नाहीत, असे सलीम अली सरोवर समितीचे म्हणणे आहे. या समितीला फक्त पक्ष्यांचे आणि निसर्गाचेच कल्याण दिसते. आम्हा माणसांचे आणि आमच्या पोटापाण्याचे काय? १६१० ते १६१६ या सहा वर्षांच्या कालावधीत मलिक अंबरने या ओसाड शहरात पाणीपुरवठ्याची योजना राबविली. खाम नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून अंबरी तलाव उभारला. पुढे पक्षिमित्र सलीम अली यांनी या तलावाला भेट दिली आणि सलीम अली तलाव म्हणून तो ओळखला जाऊ लागला. असा हा ऐतिहासिक व शहरात एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे? आॅक्सिजन काय, कसाही मिळेल. दिल्लीत एवढे प्रदूषण असतानाही तो मिळतोच की. मग आम्हीच का चिंता करायची. वेळ आलीच तर आॅक्सिजनच्या टाक्या विकत घेऊन आम्ही ती गरज भागवू; पण कोट्यवधींचा खर्च या सरोवराच्या पर्यटनातूनच उभा करू... महापौरांना असेच वाटत असेल, तर बिघडले कुठे?