शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आपण झालोय ‘हायब्रीड ह्यूमन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 06:08 IST

Hybrid Humans: माणसांचा वर्तमान आणि भविष्यकाळ हळूहळू हायब्रीड जगण्याकडे जातो आहे. याची सुरुवात डिजिटल प्लॅटफॉर्म्स आल्यावरच झाली होती; पण महामारीनंतर खऱ्या अर्थाने आपले आयुष्य हायब्रीड व्हायला सुरुवात झाली आहे. आपण एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो असं आपल्याला वाटतं.

- मुक्ता चैतन्य(समाज माध्यमाच्या अभ्यासक)muktaachaitanya@gmail.comमाणसांचा वर्तमान आणि भविष्यकाळ हळूहळू हायब्रीड जगण्याकडे जातो आहे. याची सुरुवात डिजिटल प्लॅटफॉर्म्स आल्यावरच झाली होती; पण महामारीनंतर खऱ्या अर्थाने आपले आयुष्य हायब्रीड व्हायला सुरुवात झाली आहे. आपण एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो असं आपल्याला वाटतं. एक प्रत्यक्ष आणि एक व्हर्च्युअल; पण प्रत्यक्षात आपण एकच आयुष्य दोन स्तरांवर जगत असतो. प्रत्यक्ष जग आणि आभासी जग मिळून आपलं एक जग निर्माण झालेलं आहे, ज्याला हायब्रीड जगणं म्हणता येईल. आपलं भवितव्य हायब्रीड म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी यांच्या मिलाफातूनच तयार होत जाणार आहे. आताही आपण शॉपिंगपासून शाळेपर्यंत जवळपास सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आणि आभासी अशा कॉम्बिनेशनमध्येच करतोय. जरी शाळा सुरू झाल्या तरीही काही प्रमाणात आभासी शिक्षणाचा भाग मुलांच्या आयुष्यात असणारच आहे. तो पूर्णपणे कधीही डिलिट होणार नाही. तेच शॉपिंग, बँकिंग किंवा इतर कुठल्याही क्षेत्रासंदर्भात आहे. नवी रेसिपी करायची तर आता आपण चटकन पुस्तकं न शोधता यूट्यूबवर शोधाशोध करतो, एखादी नवी फॅशन फॉलो करायची तर मॅगझिन्सपेक्षा आपण इन्स्टाचा वापर करतो. आपण गोष्टी पूर्णपणे ऑनलाइनही करणार नाही आणि ऑफलाइनही करणार नाही. आपण भाजी, किराणा आणायला प्रत्यक्ष जातो आणि पैसे  ऑनलाइन देतो.  हॉटेलचं बुकिंग ऑनलाइन करतो आणि मग प्रत्यक्ष तिथे जातो.  हे असं हायब्रीड जगणं यापुढे वाढत जाणार आहे. महामारीने त्याचा वेग वाढविला आहे. प्रत्यक्ष उठून कामाच्या ठिकाणी गेले नाही तरीही कामे होऊ शकतात हे आपल्याला वर्कफॉर्म होमने सिद्ध करून दाखविलं आहे.  हा सुद्धा हायब्रीड जगण्याचाच एक प्रकार आहे. अशा अगणित गोष्टी आपण करतो आहोत, भविष्यात करणार आहोत. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटीसारखं तंत्रज्ञान ज्या गतीने विकसित होतंय, ते बघता थोड्याच दिवसांत आपले आपल्याच सारखे दिसणारे व्हर्च्युअल अवतार किंवा होलोग्राम घेऊन आपण जगायला लागू, यात शंकाच नाही. म्हणजे आभासी जगासाठी आपल्यासारखाच दिसणारा आपला अवतार किंवा त्रिमिती होलोग्राम आणि प्रत्यक्ष जगासाठी आपण... स्वतः हे भविष्य फार दूर नाही. 

टॅग्स :scienceविज्ञान