शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वट वट सावित्रीची कथा

By संदीप प्रधान | Updated: July 6, 2018 02:35 IST

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का?

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? त्यावर ऋषीवर उल्हासदादा आपल्या लालेलाल दाढीवरून हात फिरवत व दोन्ही हात हवेत झाडत टाळी देत हास्यचित्कार करीत बोलले की, शिवसेना नावाच्या वट वट सावित्रीने आपल्या पातिव्रत्याची अशीच घोर परीक्षा दिली आहे. तुंबई नामे नगरीवर उद्धवोठाकरी नामे राजा राज्य करीत होता. त्याची कन्या शिवसेना ही लहानपणी अत्यंत व्रात्य, उत्पाती, राडेबाज होती. अशा कन्येशी कुणी विवाह करणार नाही या विवंचनेतून उद्धवोठाकरी राजाने महत्प्रयासाने आपल्या कन्येची शांती केली. या धार्मिक विधीत त्याला अनिलकुमार देसाई, डॉ. नीलम गोºहेताई आदी दरबारी सहकाऱ्यांनी साथ दिली. शिवसेना विवाहयोग्य झाली तेव्हा उद्धवोठाकरी राजाने तिला तिचा वर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. शिवसेना कधी बारामती नगरीचे राजे शरदबाबू भानामतीकर यांना डोळा घालायची तर कधी नागपूरकर देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा गालगुच्चा घ्यायची. धर्मशास्त्रानुसार जो पिता विवाहयोग्य कन्येचे कन्यादान करीत नाही त्याला निंदनीय मानले गेले आहे. मात्र आपली कन्या वट वट सावित्री काय गुण उधळेल, या चिंतेनी धर्मशास्त्र धाब्यावर बसवून उद्धवोठाकरी राजाने तिला स्वातंत्र्य बहाल केले. मध्यंतरीच्या पंधरा वर्षांत शिवसेना वणवण फिरली. पण तिला वर काही मिळाला नाही. शिवसेनेची ही वणवण न पाहून खाद्यमहर्षी नितीनभाऊ गडबडकरी यांनी उद्धवोठाकरी राजाला ‘मातोश्री’ महाली फोन केले. मात्र खाद्यमहर्षींचे फोन उद्धवोठाकरी राजाचे अमात्य मिलिंद नार्वेकर राँगनंबरवाले यांनी घेतले व हॅलो हॅलो करून ठेवून दिले. अखेरीस बरीच डोळे मारामार केल्यावर या वट वट सावित्रीला वर लाभला. त्याला घेऊन ती तुंबई नगरीत आली तेव्हा उद्धवोठाकरी हे देवर्षी संजय राऊतमुनींसोबत बसले होते. मिशीला पिळ देत मुनीवर म्हणाले की, हा विवाह फार काळ टिकणार नाही. या वराच्या गळ्याला अल्पावधीत नख लागेल व कुणी लावले नाही तर मीच लावेन. शिवसेना विवाहाकरिता आता घायकुतीला आली होती. तिने आपल्या पित्याला कन्यादान करण्याची गळ घातली. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. देशोदेशीचे राजे-महाराजे हजर राहिले. पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठल्या. अत्तराचे कारंजे थुईथुई नाचले. शिवसेना आपल्या पतीला अल्पायुषी ठरवण्याकरिता रोजच त्याचा छळ करू लागली. रोजच घर सोडून पळून जाण्याचे इशारे देऊ लागली. वट वट सावित्रीचा हा व्याप असह्य होऊन एक दिवस तिचा पती जंगलात लाकडं फोडायला गेला. पतीच्या मागं हात धुवून लागलेली ही सावित्री मागं मागं गेली. पतीला ढगात पोहोचवण्याकरिता तिनं ‘नाणार व्रत’ केलं होतं. त्यामुळं जो भेटेल त्याला ती जाणार...जाणार... सांगत सुटली होती. ईव्हीएमवर स्वार यमराज समोर उभे राहताच सावित्रीचा पारा चढला. अरे, यमा तू याचे प्राण सोबत न्यायला आलायस की, याच्या कुडीत प्राण फुंकायला आलायस, अशी दमदाटी तिनं केली. भयभीत यमानं सावित्रीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती बोलली की, पुढील सात निवडणुकीत पतीविना १५१ आमदारांनी माझी कूस उजू दे...(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण