शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

सर्मपणात जगा!

By admin | Updated: June 30, 2014 08:55 IST

रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.

अध्यात्म
 
श्री मुनी तरुणसागरजी
 
रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.
लक्षात ठेवा सुख-दु:ख स्थायी नाहीत. स्थायी-चिरंतन तर आनंद आहे. जो साधनेने मिळत असतो. वासनेने नव्हे उपासनेने लाभतो.
***
परिवर्तन नित्य आहे. विश्‍वातील प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे. सूर्य दिवसातून तीन रूप धारण करतो.
विना परिवर्तनाने जीवन ठप्प होऊन जाते. साचलेले पाणी सुकून जाते. तव्यावर चपाती जळून जाते, पान गळून पडते.
समाज पांगळा होऊन जातो. राष्ट्र भ्रष्टाचारात बुडून जाते. आणि संत साधनेपासून भ्रष्ट होऊन गृहस्थासारखा होऊन जातो. 
ह्यास्तव चालत राहा, वाहात राहा, थांबू नका, साचू नका. थोडा विश्राम, पुन्हा सावधान.
हेच सत्य होय. विश्राम सावधान.
***
दु:ख कोणाच्या जीवनात येत नाही? गरीब असो वा श्रीमंत, संत असो वा संसारी, छोटा असो वा मोठा, सर्वांच्या जीवनात दु:ख येतच असते.
जीवनात सर्वांना दु:खाचा सामना करावा लागतो. फरक इतकाच की कोणी दु:खाला निपटून टाकतो, तर दु:ख कोणाला निपटून टाकते.
आपण माझे म्हणणे ऐकाल तर माझे निवेदन असेल : दु:खात रडू नका, सुखात झोपू नका.
अर्थ इतकाच दु:खात घाबरू, नका सुखात शेफारून जाऊ नका.
***
दोन बैल आहेत. दोघांपुढे चारा टाकला जातो. त्यातील एक बैल असा असतो, जो आपल्या समोर टाकलेला चारा खात नाही, तर दुसर्‍या बैला समोरचा चारा खाऊ लागतो. स्वत: समोरच्या चार्‍यावर पाय ठेवतो आणि दुसर्‍या बैलास शिंगाने मारू लागतो.
काही माणसे अशीही असतात जे इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात आणि संपत्ती हडप करू इच्छितात.
माझे म्हणणे असे : तुम्ही मनुष्य आहात गुरे-ढोरे नव्हे, आपला चारा खा, दुसर्‍याचा दुसर्‍याला खाऊ द्या.
***
जगायचे तर जागावे लागेल. केवळ अंथरुणातून उठणे म्हणजे जागणे नव्हे. जगण्याचे तात्पर्य : जागृतीचे सजगतेचे जीवन होय. आंतर्दृष्टी.. विवेकाचे नेत्र उघडणे होय. 
क्रोध, पाप, अपराध आणि नशा-धुंदी बेशुद्धीची परिणती होय. जग म्हणते माणूस दारू पिऊन बेहोश होतो. परंतु, भगवान महावीर एक नवीन मुद्दा मांडतात. ते म्हणतात, दारू पिऊन माणूस बेहोश होत नाही, तर बेहोश माणूसच दारू पितो.