शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विराटने आगे आकर खेलना था यार!

By यदू जोशी | Updated: May 29, 2018 06:57 IST

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच.

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच. सरपंचांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांची परिस्थिती तीच. अंथरुणातून उठत नाही तर जी गाºहाणी सुरू होतात ती पुन्हा अंथरुणात जाईपर्यंत... (नेत्यांच्या बायका त्यांना काय म्हणत असतील कोण जाणे!) आडव्याउभ्याने फाडायची वेळ आली की लोकांना परत राजकारणीच दिसतात. नेतेही बिच्चारे पुढच्या पंचवार्षिकसाठी काय काय बोल सहन करत असतात. मोदींनी एक निर्णय घेतला रे घेतला की त्याचे विरोध-समर्थन करणारे सोशल मीडियातून फिरू लागतात. आपल्या देशात सल्ल्यांची वर्षातील ३६५ दिवस दुकाने थाटून बसणाऱ्यांची कमतरता नाही. सचिन असो की विराट कुणी आऊट झाले की यांचं दुकान लगेच सुरू, ‘अरे यार! उसने सामने आकर खेलना चाहीए था.’ आता ताशी दीडशे किलोमीटरच्या स्पीडने बॉल कानफटापासून जाताना तुम्ही स्वत: खेळून बघितलाय का कधी? पण नाही सल्ला देण्याचं त्यांचं पेटेंट आहे नं भौ! घरासमोरची फरशी लावण्यापासून देश विकासाच्या बड्या योजनांपर्यंत सगळं काही नेत्यांनीच कसं करावं यासाठीचा सल्लारूपी माल त्यांच्याकडे तयार असतो. घरचा महिन्याकाठचा हिशेब नीट सांभाळता येणार नाही पण मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा हिशेब विचारायला चटकन तयार. बायकोनं चार वस्तू बाजारातून आणायला सांगितल्या तर त्यातलीही एक विसरतील पण तीन वर्षांपूर्वी कोडाइकॅनलमध्ये परकीय गुंतवणुकीसंदर्भातील एका सेमिनारमध्ये बोलताना मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण मात्र बरोब्बर ठेवतील. नियमानुसार असलेल्या वर्षभरातील एकूणएक सुट्या घेतील पण वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाºया मोदींना प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारतील. घरातील निवडणुकीत बायकोचंही मत मिळणार नाही, असे लोक कर्नाटकात कुणाचं काय चुकलं हे सांगत सुटतील. देशाची काँग्रेस सांभाळणाºया राहुल गांधींची हालत तर फारच खराब... निवडणुकीत साºया गावात ज्याला सगळ्यात कमी मतं पडली असा माणूसही राहुलबाबांची चेष्टा करू शकतो अन् काँग्रेस कशी चालवायची हेही फुशारकीनं सांगतो. गांधी-आंबेडकर-सावरकर यांच्याबाबत मुक्तचिंतन करणाºयांनी त्यांचे साहित्य वा जीवनप्रवास किती अभ्यासलंय हे विचारण्याची सोय नसते. हातची कामं सोडून सल्ले वाटणं सुरू असतं.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना ‘बच्चा’ म्हणत त्यांची खेचली होती. त्याला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री जे काही म्हणाले ते जागोजागी तयार झालेल्या सल्लागारांनी लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के सामाजिक, राजकीय प्रश्न सुटू शकतील. मुख्यमंत्री म्हणाले होते, रामदासभाई! तुमचा पगार किती अन् तुम्ही बोलता किती...? आता मुख्यमंत्री-रामदासभार्इंचा वाद सोडा पण आपल्या पगाराइतकंच (म्हणजे आपल्या लायकीइतकं) बोलण्याचं पथ्य सगळ्यांनी पाळलं तर पुरोगामी महाराष्ट्राचं भलंच होईल पण वास्तविकता ही आहे की जो उठला तो आपल्या पगारापेक्षा जास्तच बोलत सुटतो. पगार (कुवत) चपराश्याचा अन् बोलणं आयएएसचं ही खरी अडचण आहे. सल्ल्याचं बोट धरून मोकाट फिरणाºयांनी समजूतदारपणाचं बोट धरलं तर किती बरं होईल?- यदु जोशी