विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:23 AM2017-10-24T00:23:05+5:302017-10-24T00:23:30+5:30

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला.

Vikramaditya did not leave your weight | विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला. विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.
‘राजा! तुझ्यासारख्या राजांना कोणी बोललं तर त्यास किती महत्व द्यायचं, याचं तारतम्य नसतं. सुखाने विश्रांती घ्यायची सोडून तू नको ते कष्ट कशाला उपसत बसला आहेस ? वारसाहक्कानं थोरल्या बंधूस गादी मिळाल्यामुळे तू चिडून राजवाडा सोडलास आणि नवं राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नवनिर्माणाचा ध्यास घेतलास. पण तुला सांगू? नुसती स्वप्नं पाहून नवनिर्माण होत नसतं. त्यासाठी लवकर उठायला हवं. पण, तुझ्यासाठी तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस! खबरे हाताशी बाळगले म्हणून बखर लिहिली जाईलच असे नाही. राजा, प्रजेला नमस्कार लागतो, तसा चमत्कारही लागतो. तूझे तर दर्शनच दुर्लभ! तुझे राजगृह कसले, गुहाच ती. कायम बंद. दरबारी दाराशीच ताटकळून निघून जातात. नुसते फतवे काढून नवनिर्माण कसं होणार? कोणतंही सैन्य भावनेवर नव्हे, तर पोटावर चालतं. किती दिवस तू नुसतंच खळ्ळखट्याकऽऽऽ करत राहाणार?
तो बघ, न बोलता सगळं करून निघतो. कोणाला थांगपत्ता लागू देत नाही. राज्यकारभार करावा तर त्यानेच. तुझी टाळीही म्हणे त्याने बेमालुमपणे टाळली. तू फक्त बोलतोस आणि पुन्हा आपल्या गुहेत शिरतोस. आणखी किती लढाया हरणार आहेस? किमान तहात जिंकला असतास तरी, सैन्यांची आशा जिंवत राहिली असती.
पण तू तेही केलं नाहीस. आपले सरदारच बिभीषण निघाले म्हणून आता कसला शोक करतोस? आजकाल दाम हाच राम!
वेताळाच्या या भडिमाराने संतप्त झालेला राजा उद्गारला-‘यापुढे फक्त गालावर टाळी!’
...अशा तºहेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला!

Web Title: Vikramaditya did not leave your weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.