शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वाकडी ते राईनपाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 12:12 IST

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून ...

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून दोन कुमारवयीन मुलांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्याची चित्रफित बनवून स्वत:ची मर्दुमकी गाजविण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावात आठवडे बाजारात भविष्य सांगणाऱ्या मंगळवेढा (जि.सोलापूर) येथील पाच जणांना मुलांना पळवून नेणाºया टोळीचे सदस्य समजून ३ ते ५ हजार लोकांच्या जमावाने ठेचून मारण्याचे राक्षसी कृत्य केले. मुले पळवून नेण्याची अफवा सध्या खान्देशसह संपूर्ण देशभर पसरली आहे. समाजमाध्यमांमुळे या अफवेचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. मास हिस्टेरिया असे त्याला म्हटले जाते. कोणतीही खातरजमा न करता, विवेक, भान न वापरता समूहाची मानसिकता प्रभावी ठरुन अशी राक्षसी कृत्ये घडू लागली तर हाहाकार माजेल. विशेष म्हणजे, या घटना ग्रामीण भागात सर्वाधिक घडत आहे. पाचोरा, म्हसावद, घोटाणे, भादली बुद्रूक, सुभाष वाडी अशा गावांमध्ये केवळ गैरसमजापोटी हे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘समाजमाध्यम दिन’ साजरा करण्यात आला. या संपर्काच्यादृष्टीने प्रभावी असलेल्या माध्यमाचे उपयोग, चांगल्या बाजूंवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु अफवा पसरविण्यात, चुकीच्या गोष्टी प्रसारीत करण्यासाठी या माध्यमांचा दुरुपयोग होत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये एकविसाव्या शतकात अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. भुताटकी, डाकीण असे प्रकार सर्रास घडतात. ज्योतिषावर गाढ विश्वास असतो. त्यातूनच मुले पळविणारी टोळी, किडन्या काढून विकणारी टोळी अशी अफवा पसरली तर भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांचा त्यावर पटकन विश्वास बसतो. समूह मानसिकतेच्या प्रभावात मग असे राक्षसी क्रौर्य घडून येते. माणूस माणसाचा जीव घेण्यापर्यंत बेभान होऊ शकतो हे खरोखर भयंकर कृत्य आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर खेडोपाडी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज, पाणी पोहोचविण्यात यश मिळाले. भौतिक सुविधा दिल्या गेल्या. परंतु ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ ही भावना पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत अडकून राहिली. आमच्या मन आणि हृदयात ती पोहोचली नाही. शहाणपण, समंजसपणा आला नाही. प्रबोधनाच्या निव्वळ गप्पा झाल्या; पण माणसे अद्यापही जातपात, अंधश्रध्दा, प्रांतभेद या जोखडात अडकून पडली आहेत. मानसिकदृष्टया सक्षमीकरणाची नितांत गरज अशा घटनांमधून आवर्जून दिसून येते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJalgaonजळगाव