शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

(अ) सत्याचे प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:12 IST

पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी...

- - नंदकिशोर पाटीलपुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सत्याच्या प्रयोगात महात्मा गांधींनाही मागे टाकले, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना या ‘सत्याच्या प्रयोगा’विषयी भलतीच उत्सुकता लागून राहिली. हे प्रयोग आहेत तरी, काय? या उत्सुकतेपोटी त्यांनी पुस्तक मागवून घेतले. गांधीजींच्या आत्मकथनातून प्रेरणा घेत त्यांनीही मग आत्मकथन लिखाणाचा घाट घातला. आपणही आपल्या आयुष्यातील काही ‘प्रयोग’ शब्दबद्ध केले तर आपलाही नावलौकिक होईल, ही त्यामागची भावना. आत्मचरित्राशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही, म्हणून या मंडळींनी चांगली ऐसपैस ‘बैठक’ मारली. पण गरिबीतील दिवस, शाळेतील हुशारी, घराण्याचा वारसा, सामाजिक कार्याचे बाळकडू इत्यादी मजकुराने प्रस्तावनेची आठ-दहा पाने खरडल्यानंतर मूळ विषयावर घोडे अडले. सुरुवात नेमकी कुठून करावी? हे काही त्यांना सूचेना. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही!’ अशा एखाद्या दमदार ‘लोकमान्य’ वाक्याने आत्मकथनाची सुरुवात झाली पाहिजे, या आग्रहामुळे आत्मकथन प्रस्तावनेच्या पुढे काही सरकेना. अनेकदा खाडाखोड, डोकेफोड केल्यानंतर ‘मंत्रिपदाची शपथ घेताना मला माझे जुने दिवस आठवले...’ अशी सुरुवात एका महोदयांनी केली. पण जुने दिवस म्हणजे नेमके कोणते? आपला भूतकाळ तर राडेबाजी, खंडणीखोरी, दलाली, फसवाफसवी आणि दंगेखोरी अशा अजामीनपात्र घडामोडींनी भरलेला! आज आपण पदावर आहोत म्हणून हा ‘इतिहास’ लोकांच्या विसराळी पडला म्हणून काय झाले? उद्या आपले हे आत्मकथन वाचून कोणी खोलात शिरले तर उगीच पंचाईत व्हायला नको म्हणून त्यांनी त्या वाक्यावर फुली मारली आणि गदिमांच्या गीतातील ‘बंदीवान आहे जगती...’ या भुतकाळाशी साजेशा ओळीने सुरुवात करून टाकली!एका शिक्षणमहर्र्षींनी तर ‘शाळेची घंटा वाजायला उशीर, सर्वांत अगोदर मी वर्गात हजर असे!’ अशी सुरुवात केली. ते वाचून त्यांच्या सौभाग्यवतींना हसू आवरेना. बंटीचे बाबा फेकाफेकीत मास्टर आहेत, हे ठाऊक होते. पण या वाक्यावर तर त्यांना ज्ञानपीठच मिळायला हवे. कारण, यांनीच तर शाळेची घंटा चोरून लोहाराला विकली होती अन् त्या पैशातून आम्ही दोघांनी चोरून सिनेमा पाहिला होता! नमनालाच पत्नीकडून असा अपशकुन झाल्यामुळे त्यांनी ते वाक्य बदलून ‘शिक्षणाने माणूस मोठा होतो’ अशी सुरुवात केली. पण ‘बाबा तुमची डिग्री बोगस आहे’, अशी बंटीनं आठवण करून देताच त्यांनी तेही वाक्य खोडले अन् ‘शहाणपणासाठी शिक्षणाची गरज नाही!’ अशी वास्तवदर्शी सुरुवात करून पत्नी अन् मुलगा दोघांचीही दाद मिळवली!सावकारीच्या पैशातून दुस-यांचा सातबारा स्वत:च्या नावे केलेल्या समाजसेवी नेत्याने लिहिले, ‘...अखेर वडिलोपार्जित पडिक जमिनीला कष्टाची फळं लागली!’तर अतिक्रमणं आणि अवैध बांधकामात नावलौकिक मिळविलेल्या रिअल इस्टेटीच्या धंद्यातील एका दातृत्ववान नेत्याने आपल्या आत्मकथनाला नाव दिले, ‘कष्टाचे इमले!’(ता.क. लवकरच या आत्मकथांचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे म्हणे!)

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र