शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:31 IST

देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे.

२०१९ च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी लागले असून त्याचे नियोजनदेखील सुरू झाले आहे. देशातील एकूण वातावरण लक्षात घेता ‘विकास’ विरुद्ध ‘जुमला’ असा सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे. हे दोन मुद्दे घेऊनच दोन्ही बाजू निवडणुकांमध्ये उतरतील, असे अंदाज लावण्यात येत आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.कपिल सिब्बल यांनी नागपुरात झालेल्या एका गटचर्चेत अचंबित करणारे वक्तव्य केले. आगामी निवडणुकांत जो पक्ष जास्त पैसे खर्च करेल तोच जिंकेल, असा दावा त्यांनी केला. त्यांचे हे शब्द ‘बिटविन द लाईन्स’ राजकीय वास्तवाची माहिती देणारे निश्चितच आहेत. तसे पाहिले तर निवडणुका आणि लक्ष्मीदर्शन हे एक समीकरणच तयार झाले आहे. निवडणुका या निष्पक्ष, निर्भय व मोकळ्या वातावरणात होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून ‘साम, दाम, दंड, भेद’चा वापर करण्यात येतो. निवडणूक आयोगाचे यासंदर्भात प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. २०१४ च्या निवडणुकांपासून ‘सोशल मीडिया’चे प्रस्थ जास्त प्रमाणात वाढले आहे. विशेषत: त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी ‘सोशल मीडिया’वरून प्रचारावर जास्त जोर दिला. एखादी गोष्ट हवी तशी फिरवायची व थेट लोकांच्या खिशापर्यंत पोहोचवायची असा ‘ट्रेन्ड’च सुरू झाला आहे. ‘फेक न्यूज’चे प्रमाण यातून वाढले अन् सत्य-असत्य नेमके काय या विचारात मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तंत्रज्ञान क्रांतीमुळे देशाची लोकशाही पूर्णपणे बदलली आहे हे निश्चित आहे. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांच्या ‘आयटी सेल’कडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. एका पक्षाने तर देशात ठिकठिकाणी ‘आयटी’तील तज्ज्ञ मंडळींची भरतीदेखील सुरू केली आहे. साहजिकच यासाठी निधी लागणार हे निश्चित आहे. ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण ठेवणारी किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर बारीक लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात मतदारांना भेटून ‘विशेष’ सेवा करणे, यापेक्षा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून थेट त्यांच्या भावनांना साद घालणे सोपी बाब आहे. निवडणुकांच्या अगोदर वातावरणनिर्मिती करण्यासाठी नियोजन करत असलेल्या राजकीय पक्षांना याची चांगल्याने जाण आहे. त्यामुळे यावर जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची पक्षांची तयारी आहे. अशा स्थितीत निवडणुकांदरम्यान विकास, जनतेचे प्रश्न व भविष्यातील ‘ब्ल्यूप्रिंट’ यांना किती महत्त्व राहील, हा कळीचा प्रश्नच आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९