शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2019: दिशाहीन अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 01:47 IST

एक लाख कोटी खर्च करून श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याऐवजी मुंबईसारख्या शहरात जिथे दरदिवशी ८० ते ८५ लाख लोक प्रवास करीत असतात ती उपनगरी रेल्वे अधिक सक्षम करत, तिचे आधुनिकीकरण करत प्रवास सुसह्य करणे आवश्यक आहे.

- भालचंद्र मुणगेकर(ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ)अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत तीनशेहून अधिक जागा जिंकून सत्तेत आलेल्या भाजप नेतृत्वातील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प. या बजेटमधून सरकारची पुढील ५ वर्षांची एकूण दिशा स्पष्ट होईल, असा सगळ्यांचा अंदाज होता. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सव्वादोन तास भाषण करून मांडलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने दिशाहीन आहे, असेच मानावे लागेल.सर्वात पहिली गोष्ट म्हणजे २०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था साधारण ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा मोदी सरकारने केलेला संकल्प. मोदी यांनी लोकसभेत केलेल्या पहिल्या भाषणातही याचा उल्लेख होता. हे उद्दिष्ट कितीही चांगले असले आणि ते गाठले जावे असे माझ्यासह अनेक भारतीयांना वाटत असले तरी यासाठी जी तयारी करावी लागेल ती या अर्थसंकल्पातून दिसत नाही. हे उद्दिष्ट कसे गाठणार, याची दिशा स्पष्ट होत नाही.दुसरे म्हणजे देशात सध्या प्रचंड वेगाने बेरोजगारी वाढत आहे. या गंभीर प्रश्नाचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही. भारतात आज साधारण ५ कोटी लोक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. कोणतेही कौशल्य नसलेले बेरोजगारही मोठ्या संख्येने आहेत. आपली एकूणच शिक्षणव्यवस्था रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी सक्षम कार्यक्रम या अर्थसंकल्पात दिला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.तिसरा प्रश्न देशातील शेतीसमोर सध्या निर्माण झालेल्या गंभीर समस्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्या थांबवण्यासाठी शेती क्षेत्राची एकूणच पुनर्रचना करण्यासाठी सरकार ठोस धोरण ठरवेल, अशी अपेक्षा होती. पण तीही पूर्ण झालेली नाही. शेतीचा विचार करता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो नियमित कर्जपुरवठा होण्याचा. देशात आधीची काँग्रेसप्रणित सरकारे असताना तसेच मोदी सरकार असतानाही शेतीला होणारा संस्थात्मक कर्जपुरवठा साधारणपणे १ लाख कोटींनी वाढवला जात असे. परंतु या वेळी शेतीला नेमका किती कर्जपुरवठा केला जाणार आहे, हे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीतून स्पष्ट होत नाही.अलीकडेच हाती आलेल्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, राष्ट्रीयीकृत व इतर सहकारी बँका आणि पतपेढ्या शेतकºयांना आवश्यक कर्जपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे गरजू शेतकºयांना अव्वाच्या सव्वा दराने खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. नंतर शेती बुडल्याने कर्जफेड करता आली नाही की त्याचा अंतिम परिणाम म्हणजे तो शेतकरी अविचाराने आत्महत्या करतो. हे थांबवण्यासाठी सरकारने समग्र धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. माल तसेच प्रवासी वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेच्या विकासावर अधिक खर्च करणे गरजेचे आहे. एक लाख कोटी खर्च करून श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याऐवजी मुंबईसारख्या शहरात जिथे दरदिवशी ८५ लाख लोक प्रवास करीत असतात ती उपनगरी रेल्वे अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019