शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महामंडळांचे हे पांढरे हत्ती पोसावेत तरी कशासाठी?

By यदू जोशी | Updated: January 3, 2020 05:52 IST

अलीकडे कॅगने दिलेल्या अहवालात तोट्यातील महामंडळे एक तर बंद करा किंवा त्यांच्याबाबत नव्याने काहीतरी विचार करा, अशी शिफारस केलेली आहे.

- यदु जोशी, वरिष्ठ सहायक संपादकसमाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणाचा व्यापक विचार करून महाराष्ट्र शासनाने विविध महामंडळे सुरू केली, पण त्यांच्या स्थापनेमागचा उद्देश मात्र वर्षानुवर्षे उलटूनही सफल होऊ शकलेला नाही. अलीकडे कॅगने दिलेल्या अहवालात तोट्यातील महामंडळे एक तर बंद करा किंवा त्यांच्याबाबत नव्याने काहीतरी विचार करा, अशी शिफारस केलेली आहे.ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जातींच्या लोकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळावा हा सामाजिक उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांचा मुख्य हेतू. मात्र, तो कधीही साध्य झाला नाही. उलट, ही महामंडळे भ्रष्टाचाराचा अड्डा बनली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचे घोटाळे हे त्याचे जळजळीत उदाहरण. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम आजही कारागृहात आहे. या घोटाळ्यात अनेकांना निलंबित व्हावे लागले, अनेक जण तुरुंगात गेले, आता प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. प्रश्न आहे तो हा की, राज्यातील नवे उद्धव ठाकरे सरकार या महामंडळांच्या पुनरुज्जीवनाचा काही प्रयत्न करणार आहे का? साठे महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अपंग महामंडळ, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, श्यामराव पेजे ओबीसी महामंडळ अशी महामंडळे ही पांढरा हत्ती बनली आहेत. त्यांच्यामार्फत वाटप करण्यात आलेल्या कर्जाची वसुली होत नाही. मुळात महामंडळांचे त्या-त्या काळातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ही कर्जे कार्यकर्ते, जवळची माणसे, नातेवाइकांना मनमानीपणे वाटली. कर्जे देतानाच ती परत करण्यासाठी नसतात असाच जणू परस्पर समझोता असायचा. त्यातून बरेच जण मालामाल झाले. मूठभर लोकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आणि अन्य सगळे वंचित राहिले. शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्जे माफ केली जातात, मग आमच्याकडे तर जमिनीचा साधा तुकडादेखील नाही, मग आम्ही कर्ज परत का करायचे, असा सवाल करीत लाभार्थींनी परतफेडीचे नाव घेणे सोडले. कोट्यवधींची कर्जे वाटली, ती व्याजासह तर सोडाच, पण मुद्दलही परत येण्याची शक्यता नाही. दुसरीकडे कर्मचाºयांच्या पगारावर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरूच आहे, अशा चक्रव्युहात महामंडळे अडकलेली आहेत.

मंत्रिपदांची संधी न मिळालेल्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा अड्डा, पराभूतांना स्थान देण्याचे ठिकाण वा आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांसाठीचे कुरण म्हणूनही या महामंडळांकडे वर्षानुवर्षे पाहण्यात आले. आपल्या सग्यासोयऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या. मंजूर पदांपेक्षा जादाची कर्मचारी भरती करण्यात आली. ही भरती करतानाचे दर ठरलेले होते. त्यानुसार सगळे काही बिनधोक सुरू राहिले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीबांच्या हितासाठी झालेल्या या महामंडळाच्या स्थापनेचा हेतूच पराभूत झाला. पुरोगामीत्वाशी घट्ट नाते सांगणारे आणि तसा चेहरा असलेले किमान आठ ते दहा मंत्री ठाकरे मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी या महामंडळांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे. ही ऊर्जितावस्था आणणे वाटते तितके सोपे नाही. आधी त्या ठिकाणचा भ्रष्टाचार निखंदून काढावा लागेल. भाईभतिजावादाला फाटा द्यावा लागेल. वर्षानुवर्षे एकाच महामंडळात ठाण मांडून बसलेल्या आणि गब्बर झालेल्या अधिकाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्याची हिंमत दाखवावी लागेल. बहुतेक महामंडळांमध्ये नवीन कर्जे वा अनुदान वाटप बंद करण्यात आले आहे. ते सुरू करून वंचितांना न्याय देण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली पाहिजे. आणखी एक उपाय करता येऊ शकेल. तो म्हणजे या सर्व महामंडळांचे एकच महामंडळ स्थापन करणे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तसा प्रयत्न झाला होता पण विशिष्ट हितसंबंध असलेल्यांनी तो हाणून पाडला.महामंडळे ही स्वायत्त असून त्यांच्या संचालक मंडळांनी घेतलेल्या निर्णयांना राज्य शासनाची मान्यता घेण्याची गरज नाही, असा नियमबाह्य उद्दामपणा अनेकदा करून परस्परच निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे महामंडळांवर शासनाचे काही नियंत्रणच नाही, अशी अवस्था निर्माण झाली. राज्य शासनाच्या तिजोरीतूनच या महामंडळांना वर्षानुवर्षे पैसा दिला जात असल्याने सरकारचे त्यावर नियंत्रण असलेच पाहिजे आणि ते धुडकावून लावणाºयांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती. पण, तसे न झाल्याने बेकायदा निर्णय घेणाºयांची हिंमत वाढत गेली. असे सगळे विदारक चित्र असताना महामंडळांचे पांढरे हत्ती पोसावेत की, कायमचे बंद करावेत यावर वादप्रवाद होऊ शकतात. पण, कोट्यवधी रुपये खर्चूनही वंचितांचे कल्याण झालेले नाही, हा निष्कर्ष समोर येणार असेल, तर दोष हा वंचितांचा नव्हता हेही सत्य स्वीकारावे लागेल आणि त्यादृष्टीने धाडसी पावले उचलावी लागतील. हे धाडस न दाखवता केवळ कुरण म्हणून या महामंडळांकडे वर्षानवुर्षे पाहण्यात आले. मागच्या पानावरून पुढच्या पानावर ही कुरणकथा नव्या सरकारमध्येही सुरू राहणार असेल तर पारदर्शक कारभार, समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका ही नव्या सरकारची बिरुदे केवळ मिरवण्यासाठी आहेत, हेच सिद्ध होईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCorruptionभ्रष्टाचार