शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दोन कोटी रुपये किलो : ‘म्याऊ म्याऊ’ महाराष्ट्रात कसे पसरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:12 IST

म्याऊ म्याऊ या नावाने तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले मेफेड्रोन (एमडी) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनू लागले आहे. या ऑक्टोपसचा सामना कसा करणार? : पूर्वार्ध

-रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकारराज्यभरात ठिकठिकाणी मेफेड्रोन या अमली पदार्थाचे कारखाने दिवसरात्र धूर सोडत असल्याच्या घटना एकामागोमाग उघडकीस येत असतानाच पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन मुली नशिल्या अवस्थेत आढळल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. परदेशातून तस्करीच्या मार्गाने येणारे ड्रग्ज चोरीछुपे सेवन केले जात असताना आता राज्यातच जागा मिळेल तिथे ड्रग्जचे कारखाने थाटले जाऊ लागल्याने त्याचे सेवन घराघरात होण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. गांजा, अफू अशा नैसर्गिक अमली पदार्थांसह चरस, हशिश, कोकेनची जागा आता एकापेक्षा एक सरस अशा रासायनिक अमली पदार्थांनी घेतली आहे. त्यातही मेफेड्रोन म्हणजेच एमडी हे ड्रग आजमितीस खपात सर्वाधिक आघाडीवर. 

सध्या युवावर्गात बेफाम क्रेझ आहे ती एमडीची. म्याऊ म्याऊ या नावाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले एमडी सध्या ऐरणीवर आले आहे. कधीकाळी भारत, चीनमध्ये रोपांसाठी कृत्रिम खत म्हणून वापरले जाणारे मेफेड्रोन हळूहळू नशेसाठी वापरले जाऊ लागले. २०१० सालच्या प्रारंभापर्यंत भारतात एनडीपीएस कायद्यानुसार प्रतिबंधित ड्रग्जच्या यादीत मेफेड्रोन समाविष्ट नव्हते. मात्र, देशभर नशेच्या वापरासाठी वाढलेले खपाचे आकडे पाहून सरकारची छाती दडपून गेली. मार्च २०१५मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने याचा प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत याचा समावेश केला तेव्हा मेफेड्रोनच्या विक्री आणि सेवनाला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. पण, घडले ते विपरीतच. मेफेड्रोन काळ्या यादीत गेले तरी प्रत्यक्षात त्याच्या विक्री आणि सेवनाचे प्रमाण दिवसागणिक वाढतच गेले. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, सांगली अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हजारो कोटींचे मेफेड्रोन पकडले गेले. म्हणजे त्यापेक्षा कैकपटींनी मेफेड्रोनचे सेवन केले गेले, अंदाजही घेता येणार नाही इतके त्याचे स्वरूप अक्राळविक्राळ आहे.     

स्फटिकासारखा दिसणारा हा पांढरा पदार्थ पावडर किंवा टॅब्लेट, कॅप्सुलच्या स्वरुपात मिळतो. पाणी, सिगारेट अथवा मद्यातून घेता येतो. तसेच  इंजेक्शनने टोचून आणि नाकाने हुंगता येतो. कोकेन आणि हेरॉईनपेक्षा अधिक नशा देणारे हे ड्रग्ज त्यांच्या तुलनेत स्वस्त. म्हणजे किती स्वस्त? - तर प्रतिग्रॅम वीस हजार रुपये. म्हणजे दोन कोटी रुपये किलो. कधीकाळी महानगरात सेलिब्रिटींच्या पार्ट्यामध्ये ड्रग्जचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, अशी ओरड होई. आता ड्रग मिळवण्यासाठी बड्या शहरांमधील पब वा डिस्को थेकमध्ये जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शहरांच्या सीमा ओलांडून एमडीसारखे रासायनिक ड्रग अगदी सर्वसामान्यांसाठी गावागावांतील पानपट्ट्यांवर पोहचले आहे. पानांच्या ठेल्यावर अगदी पान मसाल्यातही हे मिसळून दिले जाते. ठराविक  टपऱ्यांवऱ मिळणारा पानमसाला अधिक उत्साहित करणारा असतो, अशी तोंडी प्रसिद्धी होते आणि तेथील गर्दी कमालीची वाढते.

ड्रग्जची ही जीवघेणी लत बाळगण्याची कारणे काय?  ताणतणाव, स्पर्धेचे युग, ही तर नेहमीची कारणे. पण पीयर प्रेशर, दबावाला बळी पडणे, थ्रील, स्वतःमध्ये खोटा अहंगंड निर्माण करणे, अशीही अनेक कारणे याच्या सेवनामागे आहेत. याच्या सेवनाने शरीरात डोपामाईन संप्रेरक स्त्रवू लागते आणि मनाची एक भ्रामक अवस्था निर्माण होते आणि सर्व चिंतांचा तात्पुरता विसर पडतो. थकवा जाणवत नाही.  आपण अतिशय आनंदात असल्याचा भास होतो. ड्रग सेवनानंतर अर्धा ते पाऊण तासात सुरू होणारा हा प्रभाव तीन ते सहा तासांपर्यंत टिकून राहतो. 

मात्र, एकदा का नशा उतरली की, त्या ड्रग्जचे जीवघेणे दुष्परिणाम जाणवू लागतात. ज्या वेगाने व्यसनी मनुष्य भावनिकतेच्या हिंदोळ्यावर जातो तो तितक्याच वेगाने खालीही येतो. डोपामाइन स्त्रवणे बंद होताच त्या व्यक्तिचा स्वतःशीच झगडा सुरू होतो. त्याला आजूबाजूच्या चिंता अधिक तीव्रतेने जाणवू लागतात. फिल गुडची स्थिती नाहीशी होते. चिडचिड वाढते आणि मनस्थिती आणखीनच दुःखी होते. त्या विचित्र मन:स्थितीतून कसे बाहेर पडावे, हे त्याला समजत नाही. हा टप्पा कमालीचा त्रासदायक असतो आणि पुन्हा क्षणिक आनंदाची अनुभूती मिळावी, यासाठी पुन्हा ड्रग घेण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नसतो. इथेच ड्रगमाफियांचे कारस्थान यशस्वी होते. ड्रग्जसाठी आणखी एक कायमस्वरुपी ग्राहक तयार झालेला असतो.

उडता पंजाब चित्रपटातून तेथील ड्रग्जमाफियांच्या कारवाया आणि व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकण्यात आला. ते पाहून संवेदनशील मन व्यथित झाल्याशिवाय राहात नाही. पण, आता उडता महाराष्ट्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे.     ravirawool@gmail.com

टॅग्स :Drugsअमली पदार्थ