शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

‘जय महाराष्टÑ’ नाऱ्याने सूर जुळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:17 IST

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन भिन्न विचाराच्या पक्षांचे संयुक्त सरकार महाराष्टÑात स्थापन झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीउध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन भिन्न विचाराच्या पक्षांचे संयुक्त सरकार महाराष्टÑात स्थापन झाले आहे. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्ष हे राष्टÑीय पक्ष असले आणि अशा दर्जासाठी आवश्यक निकष पूर्ण करीत असले तरीही या दोन्ही पक्षांचे संपूर्ण लक्ष्य आणि प्रभावक्षेत्र हे महाराष्ट्र हेच राहिले आहे. काँग्रेसचे मात्र तसे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला, स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेला आणि दीर्घकाळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष सर्वात जुना राजकीय पक्ष आहे.शिवसेना ही संघटना म्हणून उदयास आली आणि राजकीय पक्ष असे त्याचे पुढे स्वरुप झाले. भारतीय राजकारणात एखाद्या संघटना आणि पक्षाच्या आयुष्यात इतकी वळणे बहुदा आली नसावी, जेवढी शिवसेनेच्या वाटचालीत आली. राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही संघटना शतकाकडे वाटचाल करीत आहे. एकचालकानुवर्ती असे तिचे स्वरुप आहे. पण ही संघटना प्रत्यक्षात राजकारणात आली नाही. संघाच्या मंडळींनीच पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप स्थापन केला. सेनेने मुंबई हे प्रभावक्षेत्र मानून कार्याला सुरुवात केली. कामगार चळवळीत साम्यवादी नेते आणि संघटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या काळात काँग्रेस सरकार आणि नेत्यांनी सेनेला मदत केल्याचे म्हटले जाते. वैचारिक वळणेदेखील झाली. दक्षिण, उत्तर भारतीयांना विरोध, मराठी बाणा, हिंदुत्व अशा भूमिका सेनेने घेतल्या. हिंदुत्व या समान धाग्यावर भाजपशी ३० वर्षे युती केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा तर विधानसभा निवडणुकीत सेनेला अधिक जागा असे समीकरण असायचे. महाराष्टÑात मोठा भाऊ शिवसेना तर भाजप लहान भाऊ होते. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती पहिल्यांदा महाराष्टÑात आली. मनोहर जोशी यांच्यासारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेच्या वेगळ्या कार्यपध्दतीचा पुन्हा एकदा परिचय करुन दिला. सुमारे चार वर्षे जोशी मुख्यमंत्री होते. नंतर पाऊण वर्षासाठी नारायण राणे यांना संधी देण्यात आली. जोशी आणि राणे मुख्यमंत्री असले तरी सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती होता. जे त्यांनी उघडपणे सांगितले होते. हा सेनेतील आणि इतर पक्षातील फरळ ठळकपणे लक्षात येतो. भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी या पक्षातही हायकमांड या नावाने रिमोट कंट्रोल असतोच, फक्त तो अदृष्य असतो, एवढेच.अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी पाडला. रा.स्व.संघ, विहिंप आणि भाजपचे कार्यकर्ते त्यात अग्रभागी होते. पुढे त्यांच्यावर खटलेदेखील दाखल झाले. परंतु, ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे आले नाही. कारसेवकांनी केलेली ती कृती आहे, असे सगळ्या उच्चपदस्थांनी म्हटले. तेव्हा एकटे बाळासाहेब ठाकरे असे नेता होते, की त्यांनी जाहीरपणे विधान केले की, हे कृत्य माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला अभिमान आहे. ही सेनेची कार्यपध्दती आहे.छगन भुजबळ यांनी सेना फोडून काँग्रेसला समर्थन दिल्यानंतर बाळासाहेब आणि शिवसैनिकांचा झालेला संताप, ठाकरे आणि पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा, राज ठाकरे यांच्या सेना त्यागानंतर उद्विग्न झालेले बाळासाहेब, ‘चिमण्यांनो, परत फिरा रे’ पासून ‘टाळी’पर्यंत शिवसैनिकांचे ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचे स्वप्न असे टप्पे सेनेत येत गेले. उध्दव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब असतानाच नेतृत्व आले. परंतु, त्यांच्याकडे बाळासाहेबांसारखा आक्रमकपणा आणि राज यांच्यासारखा आवेश नसल्याचे म्हटले जात असले, तरी उध्दव यांनी शिवसेनाप्रमुखांचा शेवटचा काळ, सेनेतील पडझड, नेत्यांमधील चढाओढ ही सर्व परिस्थिती अतीशय संयमाने हाताळली. २०१४ मध्ये भाजपने युती तोडली, तरीही त्वेषाने लढून आमदार निवडून आणले. भाजपने दुय्यम वागणूक दिली तरीही पाच वर्षे सरकार टिकवित असतानाच विरोधकाची भूमिका तेवढयाच प्रभावीपणे निभावली. खिशात राजीनामे घेऊन फिरतोय, या घोषणेची खिल्ली उडवली गेली तरी शिवसैनिक, सामान्य जनता आणि दोन्ही काँग्रेसला सेनेच्या याच परखड भूमिकेचे आकर्षक आणि विश्वास वाटला. बाळासाहेबांच्या कार्यपध्दतीची चुणूक पुन्हा एकदा उध्दव यांच्या काळात दिसून आली. ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे म्हणून आदित्यने निवडणूक लढविण्याचा निर्णय, बहुमत मिळाले असतानाही युती तोडून, रिमोट कंट्रोलऐवजी स्वत: नेतृत्वाची धुरा हाती घेणारे शिवसेना पक्षप्रमुख हे निर्णय सेनेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.मात्र राजकीय विरोध असूनही वैयक्तीक संबंध, कौटुंबिक सौहार्द लक्षात घेऊन शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली, हे विसरुन चालणार नाही. कर्नाटकात कमी संख्याबळ असलेल्या जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे कुमारस्वामी यांना काँग्रेसने यापूर्वी पाठिंबा दिला असल्याने महाराष्टÑात वेगळे काही केले नाही. भाजपला सत्तेपासून दूर राखणे हा एककलमी कार्यक्रम ठरवून तिन्ही पक्ष एकत्र आले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड नंतर अनपेक्षितपणे महाराष्टÑाची सत्ता हाती येण्याचा आनंद काँग्रेस नेतृत्वाला होणे स्वाभाविक आहे. ‘जय महाराष्टÑ’ या नाºयाने तिघांना र् ैएकसूत्रात गुंफून ठेवले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव