शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सूत्रांनो... तुम्हाला बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा..!

By अतुल कुलकर्णी | Updated: August 7, 2022 06:45 IST

कुठलंही चॅनेल लावा किंवा कोणतीही बातमी वाचा, “सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार” असा उल्लेख त्यात असतो.

- अतुल कुलकर्णी

प्रिय सूत्रांनो, नमस्कार. 

गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आपलाच बोलबाला आहे. कुठेही समोर न येता, कोणालाही काहीही कळू न देता, आपण प्रत्येक गोपनीय गोष्ट ज्या पद्धतीने बाहेर लिक करता (मराठीत त्याला “बातमी फोडणे” म्हणतात) त्याला तोड नाही. एकाही चॅनेलला तुमच्याशिवाय बातम्या मिळत नाहीत. तुम्ही भेटला नाही तर, एकाही पत्रकाराला करमत नाही... आणि राजकारणांचे तर तुम्ही अत्यंत घनिष्ठ मित्रच आहात..! एका पक्षातल्या दोन नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही... तिथं तुमचं सगळ्याच नेत्यांशी कसं काय जुळतं...? हे आम्हाला कळत नाही...  तुम्हाला ही कला कशी साध्य झाली, यासाठी तुमच्या भेटीला यायचं ठरवलं तर, तुमचा पत्ताही मिळत नाही... तुम्ही राहता कुठे..? तुमचा धंदा काय..? तुमचं पोटपाणी कसं चालतं..? याचा शोध घेतला तर त्याचीही माहिती मिळत नाही...

कुठलंही चॅनेल लावा किंवा कोणतीही बातमी वाचा, “सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार” असा उल्लेख त्यात असतो. अनेक राजकारणी नेते खासगीत बोलताना “सूत्रांनी दिलेली माहिती” असे छापा, असं आवर्जून सांगतात... पण हे सूत्र म्हणजे नेमकं काय..? याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही... तुम्ही जर तुमची ओळख लवकर दिली नाही, तर हेच माध्यमकर्मी तुम्हाला बदनाम करून सोडतील... आम्हाला तुमच्याविषयी काळजी वाटते, म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आहे. दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे तुमच्याशी शेअर करायचे आहेत. तुमच्या प्रजातीविषयी जनमानसात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्या तुम्हाला वेळीच सांगून जागृत करायची इच्छा आहे, म्हणून हे पत्र लिहित आहे. त्यातील पहिलं उदाहरण अगदीच दोन-चार दिवसांपूर्वीचं ताजं ताजं आहे.

सगळीकडे बातमी आली की, “महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उद्या होणारा विस्तार लांबला - सूत्रांनी दिलेली माहिती...” मुळात असा शपथविधी कधी होणार आहे, याची अधिकृत माहिती कोणीही दिलेली नव्हती. वेगवेगळ्या सूत्रांनी वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या. अचानक मध्येच कुठले तरी सूत्र आले आणि त्याने उद्या होणारा विस्तार लांबला, असे जाहीर करून टाकले... यामुळे तुम्हा सूत्रांच्या क्रेडिटिबिलिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे... तुम्ही तातडीने तुमच्यातले कोणते सूत्र चुकीची माहिती देत आहेत, याचा शोध घ्या आणि त्यांचा बंदोबस्त करा... 

दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजपर्यंत तुमच्यातल्या सूत्रांनी दिलेली एकही माहिती खरी ठरलेली नाही, अशी तुमच्या प्रजातीची बदनामी होऊ लागली आहे. कधीतरी अमावास्या, पौर्णिमेला एखादी माहिती खरी ठरते. अशावेळी खऱ्या ठरणाऱ्या बातमीच्या सूत्रधाराला कधीच श्रेय मिळत नाही... कारण तुमच्याकडेदेखील खोटी माहिती पसरवणाऱ्या सूत्रांची संख्या जास्त झाल्याचे दिसते... अशामुळे खरी माहिती देणाऱ्या सूत्राला निष्कारण बदनामी सहन करावी लागत आहे, असं आमचं स्पष्ट मत झालं आहे..! तेव्हा तुम्ही जरा पुढे या आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या सूत्रांवर गुन्हे दाखल करा... आपल्याकडे सोशल मीडियातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा फायदा घ्या. तुमच्या संपूर्ण प्रजातीला वाचवण्याची हीच वेळ आहे. अन्यथा उद्या अशा खरी माहिती देणाऱ्या सूत्रांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

राजकारणी लोक, चॅनेलवाले तुम्हाला त्यांच्यासाठी, त्यांना हवे तसे वापरून घेतात...! जेव्हा सूत्रांनी, म्हणजेच तुम्ही दिलेली माहिती खरी ठरते, तेव्हा मात्र त्याचं श्रेय हे लोक तुम्हाला देत नाहीत...! त्यावेळी मात्र आम्हीच दिलेली माहिती कशी खरी ठरली, याचा डांगोरा पिटवून स्वतःची पाठ थोपटून घेतात...! त्याचं आम्हाला फार वाईट वाटतं. अनेकदा “मुकी बिच्चारी सूत्रं...” असं म्हणून आम्हाला तुमच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. पण आम्ही सहानुभूती दाखवण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या...जास्त काय लिहिणार..? तुम्ही सूत्र आहात... तुम्हाला आतमध्ये काय चालू आहे, त्याचा सुगावा आधी लागतो... त्यामुळे जे कोणी तुमची बदनामी करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा... तुमचं खरं रूप प्रकट करा, हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच...! स्वतःची काळजी घ्या..! - तुमचा काळजीवाहक , बाबूराव

टॅग्स :Mediaमाध्यमेMaharashtraमहाराष्ट्र