शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

तुकाराम मुंडेंच्या वादळी कारकिर्दीला गौरवाची किनार

By राजा माने | Published: January 17, 2018 2:57 AM

जिद्दीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर दृष्टी असलेला अधिकारी इतिहास घडवू शकतो. गाव कोणतेही असेल, कामाची जबाबदारी कोणतीही असेल असा अधिकारी आपल्या स्वत:च्या समाजोपयोगी शैलीची खास छाप ठेवतोच

जिद्दीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर दृष्टी असलेला अधिकारी इतिहास घडवू शकतो. गाव कोणतेही असेल, कामाची जबाबदारी कोणतीही असेल असा अधिकारी आपल्या स्वत:च्या समाजोपयोगी शैलीची खास छाप ठेवतोच, याची प्रचिती महाराष्टÑाला देणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कठोर शिस्त, त्या शिस्तीला साजेशी निर्णयपद्धती आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी, या बळावर मुंडे यांनी ज्या खात्यात काम केले ते खाते गाजविले! जालना असो वा सोलापूर, नवी मुंबई असो वा पुणे त्यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीचा धडाका सुरूच ठेवला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हाळ्याची व प्रतिष्ठेची योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जाते. याच योजनेचा पॅटर्न निर्माण करण्याचे काम मुंडे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना केले. जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम हे राज्याला दिशादर्शकच ठरावे असे होते. त्या कामाबद्दल राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘महात्मा फुले जलमित्र पुरस्कार’ देऊन महाराष्टÑ शासनाने त्यांचा गौरव केला. सध्या ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.२०१२-१३ साली सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे आणि पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते. ‘लोकमत’ने त्यावेळी ‘दुष्काळाशी लढा’ ही मोहीम हाती घेऊन गाळ काढण्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ जिल्ह्यात रोवली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी तर त्या चळवळीला पाठबळ दिलेच होते. शिवाय सर्व राजकीय पक्षाचे नेते, सहकारी साखर कारखाने आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदविला होता. तुकाराम मुंडे यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची विक्रमी संख्या, पीक पद्धती आणि उजनीच्या पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यातूनच पाण्याचा प्रत्येक थेंब शिवारात जिरला पाहिजे, हा विचार कालबद्ध नियोजन व कृतीने त्यांनी अमलात आणला. त्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्हा जलयुक्त शिवार अंमलबजावणीत राज्यात पहिला आला. ठिबक सिंचन योजनेतही दुसºया क्रमांकावर आला. जिल्हा टँकरमुक्त करताना त्यांनी गावागावातील नळ पाणीपुरवठा योजना आणि त्यांच्या स्थितीवर तंत्रशुद्ध पद्धतीने उपाय योजले. त्यामुळे जिथे पाणी तिथेच खर्च, हे सूत्र जिल्ह्याला उमजले.जलयुक्त शिवार योजना असो, पंढरीच्या आषाढीवारीचे दीर्घकालीन व्यवस्थापन असो, शेततळी असो, ठिबक सिंचन असो, सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या ‘श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रे’चे व्यवस्थापन असो वा जिल्ह्याचा बँकिंग पतपुरवठ्याचा १० हजार कोटी रुपयांचा आराखडा असो, त्यांनी टाकलेले प्रत्येक पाऊल क्रांतिकारी ठरले. ‘जिल्हा दंडाधिकारी’ या वैधानिकपदाच्या व्यापक अधिकाराचा चौफेर वापर जिल्हाधिकारी कसा करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. पंढरपूरच्या वारकºयांसाठी ६५ एकर क्षेत्रात स्वतंत्र तळ त्यांनी विकसित केला. त्यांचे आषाढीवारीचे व्यवस्थापन हा राज्यात कौतुकाचा विषय ठरला होता. अनेकांचे धाबे दणाणायला लावणारे कायद्याच्या चौकटीतील त्यांचे अनेक निर्णय वादाचे कारण ठरले. पण ते निर्णय लोकांच्या हिताचेच होते, हे वेळोवेळी सिद्ध झाले. आक्रमक कार्यशैलीने अनेक पॅटर्न निर्माण करणाºया मुंडेंचा शासनाने गौरव केला त्याबद्दल अभिनंदन! 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे