शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

महात्माजींचे रामराज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:17 IST

संपूर्ण देशाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली. या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी दारिद्र्य, भ्रष्टाचार, निरक्षरता, जातीवाद, काळा पैसा, लिंगभेद, दुर्बल घटकांवर

एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपतीसंपूर्ण देशाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली. या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी दारिद्र्य, भ्रष्टाचार, निरक्षरता, जातीवाद, काळा पैसा, लिंगभेद, दुर्बल घटकांवर अत्याचार आणि अस्वच्छता यांच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही ही सर्व दुष्कृत्ये देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्याची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत आहेत. त्यांची रामराज्याची संकल्पना नीट समजून घ्यायला हवी आणि त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि नागरिकांनी झटायला हवे.‘‘माझ्या रामराज्यात राजापासून रंकापर्यंत सर्वांना समान हक्क असतील.’’ असे महात्माजी म्हणत. ‘‘काही लोक ऐश्वर्यात लोळत आहेत तर सामान्य जनतेला खायला पुरेसे अन्नही मिळत नाही अशा स्थितीत रामराज्य अस्तित्वात येऊ शकत नाही.’’ देशातील २२ टक्के जनता सध्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असताना सर्व सरकारांनी आणि खासगी संघटनांनी सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. दारिद्र्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना योग्य शिक्षण देण्याची गरज आहे. महात्माजी म्हणत, ‘‘माझ्या कल्पनेतील स्वराज्य हे गरीब माणसाचे स्वराज्य आहे. श्रीमंतांना ज्या सुखसोयी उपभोगता येतात, त्या सुखसोयी गरीब जनतेलासुद्धा उपभोगता आल्या पाहिजेत. याचा अर्थ त्यांनीही राजवाड्यात राहावे असा होत नाही. पण प्रत्येक व्यक्तीला सर्वसामान्य सुखसोयींचा लाभ झाला पाहिजे. तो होईल तेव्हाच संपूर्ण स्वराज्य लाभले असे मी म्हणेन.’’गांधीजी असेही म्हणत, ‘‘आपण सुसंस्कृत झाल्याशिवाय आपले स्वराज्य निरर्थक आहे. आपण नैतिकतेला जीवनात सर्वोच्च स्थान द्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या जीवनात प्रामाणिकपणा आणि उच्च नैतिक मूल्ये जोपासली पाहिजेत. पालकांनी आणि शिक्षकांनी बालवयापासूनच मुलांचा नैतिक पाया मजबूत केला पाहिजे. साक्षर होणे म्हणजे शिक्षण घेणे नव्हे. शिक्षणाने जीवनात जे जे चांगले आहे त्याच्याशी व्यक्ती जोडली गेली पाहिजे.’’अशा स्थितीत महात्मा गांधींना अभिवादन करणे म्हणजे त्यांचे विचार अमलात आणणे होय. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा जीवनातील स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, हे त्यांचे विचार त्यांची स्वच्छतेविषयीची दृष्टी दर्शवितात. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान ही जनतेची चळवळ होत आहे याचा मला आनंद होत आहे. महात्माजींची १५० वी जयंती जेव्हा आपण साजरी करू तेव्हा सारा भारत स्वच्छ झालेला असायला हवा. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाने निर्धार केला पाहिजे.आज वैज्ञानिक प्रगतीमुळे सारे जग जवळ येत असताना काही माणसे धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक धर्माचा उपयोग शांततामय सहजीवनासाठी व्हायला हवा. धार्मिक कट्टरवादाला जीवनात थारा देता कामा नये.महात्माजी म्हणत, ‘‘धर्मातील उच्च तत्त्वांचा पुरस्कार करण्यासाठी धर्माचा उपयोग व्हायला हवा. इतरांच्या विचारसरणीशी संघर्ष करण्यासाठी धर्माचा वापर होता कामा नये. खरा धर्म लोकांची सेवा करण्याची शिकवण देत असतो. सर्वांशी मैत्री करण्याची शिकवण माझ्या आईच्या कुशीतून मला मिळाली आहे.’’शांतता राखल्याशिवाय प्रगती आणि समृद्धी संपादन करणे शक्य होत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन सर्व माओवाद्यांना आणि नक्षलवादी चळवळीतील लोकांना माझे आवाहन आहे की त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवावीत आणि देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे.महात्माजी म्हणत, ‘‘मानवाच्या हातात अहिंसेची फार मोठी शक्ती आहे. विध्वंसासाठी वापरल्या जाणाºया सर्वात महान शस्त्रापेक्षाही अहिंसेची ताकद फार मोठी आहे.’’ त्यांचे हे विचारच देशाला शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतील, असा मला विश्वास वाटतो.

(editorial@lokmat.com)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी