शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

ताशी हजार किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे! पुढचा काळ प्रचंड वेगवान असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 08:49 IST

जगातल्या पहिल्या रेल्वेचा वेग होता ताशी २४ किलोमीटर. हा वेग वाढत असून, तासाला हजार किलोमीटर वेगानं धावण्याचा दिवस फार लांब नाही.

- अच्युत गोडबोले - ख्यातनाम लेखक; सहलेखिका- आसावरी निफाडकर

२७ सप्टेंबर १८२५ रोजी इंग्लंडमध्ये डार्लिंगटन ते स्टॉकटन या दरम्यान जगातली पहिली रेल्वे धावली, तेव्हा तिचा वेग होता दरताशी साधारणपणे २४ कि. मी.! त्यानंतर १५ सप्टेंबर १८३० साली धावलेल्या रेल्वेचा वेग ताशी ५८ कि. मी. इतका वाढला !! आता आपण साधारणपणे दरताशी १३० कि. मी.पर्यंत मजल मारली आहे. यापुढचा काळ प्रचंड वेगवान असणार आहे.

नजीकच्या काळातच आपल्याला अतिशय वेगवान अशा रेल्वेसदृश्य आणि मोटारसदृश्य वाहनांमधून प्रवास करता येऊ शकेल. गंमत म्हणजे ही वाहनं चक्क इंजिनविरहित असतील. ही अत्याधुनिक प्रवासी वाहनं म्हणजे ‘मॅग्लेव्ह ट्रेन्स’ आणि ‘हायपरलूप’ ! वाहनांचा ‘वेग’ वाढविण्याचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही वाहनाचा वेग कमी होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे घर्षण; तसंच रस्त्यावरची गर्दी, इंजिनाची क्षमता वगैरे. त्यानंतर इतर बाकीचीही कारणं असतात. प्रवासी वाहनं धावत असताना चाकं आणि जमीन किंवा अगदी रूळ यांच्यामध्ये घर्षण होत असतं आणि वाहनांचा वेग मंदावतो. हे टाळता आलं तर वाहनांचा वेग वाढायला मदतही होईल आणि शिवाय या घर्षणातून निर्माण होणारा आवाजही टाळता येऊ शकेल, हे लक्षात आल्यावर यादृष्टीनं अनेक प्रकारचे प्रयत्न झाले.

१९६० सालच्या सुमारास ब्रूकहॅवन नॅशनल लॅबरोटरीमधल्या जेम्स पॉवेल आणि गोर्डन डॅनबे यांनी ही कल्पना मांडली. त्यांना त्याचं पेटंटही मिळालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेम्स पॉवेल याला ही कल्पना चक्क वाहतूककोंडीमध्ये आपल्या कारमध्ये बसल्या बसल्या सुचली होती. दररोज असं वाहतूककोंडीत अडकण्यापेक्षा जमीन आणि आकाश यांच्यामध्ये चालणारं एखादं वाहन हवं, असं त्याला वाटायला लागलं आणि त्यातूनच त्याला सुपरकंडक्टिव्ह ट्रेन्सची कल्पना सुचली. चुंबकाला अतिशय मोठ्या प्रमाणात थंड केलं की चुंबकाची ताकद दसपटीनं वाढते. चुंबकाच्या याच गुणाचा वापर करण्याचं पॉवेलच्या मनात आलं आणि त्यातूनच ‘मॅग्नेटिक लेटिव्हेशन ट्रेन्स’ म्हणजेच ‘मॅग्लेव्ह ट्रेन्स’चा जन्म झाला !

१९८४पासून अनेक देशांमध्ये ‘मॅग्लेव्ह ट्रेन्स’ धावायला लागल्या; पण त्याचं प्रमाण फारच कमी होतं आणि त्यांचा वेगही जास्त नव्हता. २००४ साली जपान आणि दक्षिण कोरिया इथे अशा प्रकारच्या ट्रेन्स धावायला लागल्या. अमेरिकेतही काही प्रमाणात ही सेवा सुरू झाली आहे. २००६ साली जर्मनीमध्ये ‘मॅग्लेव्ह ट्रेन्स’चा एक मोठा अपघात झाला. यात २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण मुख्य म्हणजे या अपघातात ‘मॅग्लेव्ह ट्रेन’चा काहीच दोष नव्हता. ही ट्रेन धावत होती त्या मार्गावर मध्ये एक सर्व्हिस व्हॅन चुकून राहिली होती आणि त्यालाच धडकून हा अपघात झाला. ट्रेनला वेळीच ही माहिती मिळाली असती, तर हा अपघात टळला असता. त्यावेळी ट्रेनचा वेग होता दरताशी १२७ किलोमीटर !

या ट्रेन्ससाठी खास प्रकारचे रुळ तयार केले जातात. या रुळालगत चुंबकीय कॉईल्स बसवल्या जातात. त्याला ‘गाईड वे’ असं म्हणतात. रेल्वेच्या रुळावर, रेल्वेच्या खाली आणि रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला चुंबकं बसवली जातात. या ट्रेन्सना गती देण्यासाठी ‘इलेक्ट्रोमॅग्नेट्स’ची मदत घेतली जाते. ट्रेनच्या खालच्या बाजूलाही मोठे चुंबक बसवले जातात. त्यामुळे या ट्रेन्स रुळाच्या ०.३९ ते ३.९३ इंच अधांतरी धावू शकतात. या ट्रेन्स तरंगायला लागल्यावर रुळावरच्या कॉईल्समध्ये वीज सोडली जाते. त्यामुळे रुळावर चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन ट्रेन्सना आपोआपच गती मिळते. अशा ट्रेन्स तब्बल दरताशी ५०० किलोमीटर या वेगानं धावू शकतात ! २०१५ साली जपानमधल्या ‘मॅग्लेव्ह ट्रेन’नं दरताशी ३५० किलोमीटर धावून विक्रम स्थापित केला. तरीही या ट्रेन्स पूर्ण सेवेत उतरायला अजून काही काळाचा अवधी लागणार आहे.

२०२१मध्ये चीननं आपल्या नव्या ‘मॅग्लेव्ह ट्रेन’चं उद्घाटन केलं. ही ट्रेन दरताशी ६०० किलोमीटर इतक्या वेगात धावू शकेल, असा त्यांनी दावा केलाय. असं झालं तर ही जगातली सगळ्यात वेगवान ट्रेन ठरेल. या ट्रेन्समुळे बीजिंग ते शांघाय हे १००० किलोमीटर्सचं अंतर फक्त अडीच तासात पार होऊ शकेल. हेच अंतर विमानानं कापायला ३ तास आणि इतर वेगवान ट्रेननं कापायला ५.५ तास लागतात !! आज या ट्रेन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारा खर्च खूप जास्त आहे. असं असलं, तरी या ट्रेन्स पुढच्या काळात प्रचंड लोकप्रिय होतील, यात शंका नाही. या ट्रेन्स संपूर्णत: विजेवर चालणाऱ्या असतील.

सौरऊर्जा वापरूनही वीज तयार करता येते. त्यामुळे या ट्रेन्समधून होणारं प्रदूषण अत्यल्प असेल. तसेच घर्षण नसल्यामुळे या ट्रेन्सचा वेग प्रचंड असेल. उद्याच्या जगात आपण चक्क दरताशी १००० कि. मी. या वेगानं अंधांतरी प्रवास करताना दिसू यात नवल वाटायला नको ! म्हणजे मुंबई ते पुणे हे अंतर चक्क ८-९ मिनिटांमध्ये ! हायपरलूपची कल्पना साधारण याच धर्तीवरची आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात...godbole.nifadkar@gmail.com

टॅग्स :railwayरेल्वे