शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पाकिस्तानात जाण्याच्या स्वप्नापोटी चेंगराचेंगरीत आलेल्या मरणाची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 08:25 IST

त्या अफवेवर भरवसा ठेवून नांगरहार प्रांतासह जवळपासचे तीन हजार लोक जलालाबादला पोहोचले. साधारण सात महिने कोरोनामुळे पाकिस्तान दूतावास बंद होता. कुणालाही व्हिसा दिला जात नव्हता. त्यामुळे दूतावास कार्यालय उघडल्याबरोबर व्हिसासाठी माणसांची झुंबड उडाली.

पाकिस्तानला जायचं हे कुणाचं स्वप्न  असू शकतं का? बुधवारी रात्री अफगाणिस्तानच्या भयानक गारठ्यात तीन हजार माणसं हे स्वप्न  घेऊन जलालाबादला पोहोचले. तिथं मोठं फुटबॉल स्टेडियम आहे. त्याच्या जवळच पाकिस्तानी दूतावास आहे. नेमकी त्याच दिवशी अफवा पसरली होती की पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात (म्हणजे नेहमीपेक्षा जास्त) व्हिसा देण्यात येणार आहेत.

त्या अफवेवर भरवसा ठेवून नांगरहार प्रांतासह जवळपासचे तीन हजार लोक जलालाबादला पोहोचले. साधारण सात महिने कोरोनामुळे पाकिस्तान दूतावास बंद होता. कुणालाही व्हिसा दिला जात नव्हता. त्यामुळे दूतावास कार्यालय उघडल्याबरोबर व्हिसासाठी माणसांची झुंबड उडाली. गर्दी इतकी जास्त की शेवटी जवळच्या स्टेडियममध्ये लोकांना रांगा करा असं सांगण्यात आलं. व्हिसाचे अर्ज देण्यासाठी फक्त टोकन देण्यात येणार होते. ते टोकन घेण्यासाठी लोक रात्र रात्र जागत भल्यामोठ्या लांबलचक रांगांमध्ये उभे राहिले, त्यात स्त्रिया आणि वृद्धांची संख्या जास्त होती. 

मात्र सकाळ होता होता लोकांचा संयम सुटला. पाकिस्तानी दूतावासात गर्दी अशी काही उसळली की रेटारेटी झाली. आणि चेंगराचेंगरीत १५ लोकांचा बळी गेला. त्यात ११ महिला  आहेत. पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील राजदूत मन्सूर अहमद खान यांनी झाल्या घटनेबद्दल दु:ख तर व्यक्त केलंच मात्र अफगाण सरकारलाही चार शब्द सुनावले. ते म्हणतात, अफगाण सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी व्हिसा मागण्यासाठी येणाऱ्या माणसांसाठी अधिक उत्तम सुविधा द्यायला हव्यात!’ थोडक्यात घटनेची जबाबदारी  अफगाण अव्यवस्थेवर ढकलून पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी मोकळे झाले. हजारो माणसं धास्तावून आपापल्या घरी परत गेली. म्हातारी माणसं हिरमुसली, जायबंदीही झाली. व्हिसा तर मिळाला नाहीच; पण निराशा मात्र वाढली.

पण मुळात हे सारं का झालं? एवढ्या लोकांना कशासाठी पाकिस्तानला जायचं होतं? पाकिस्तानला जाणं हे आयुष्याचं इप्सित असू शकतं का? - या प्रश्नाचं उत्तर आहे, हतबलता. अनेक अफगाणी नागरिक दुर्धर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी पाकिस्तानात जातात कारण अफगणिस्तानात उपचारांची सोयच नाही. याशिवाय शिक्षण, कामधंदा यासाठीही पाकिस्तानचं दार ठोठावणारे हजारो आहोत. आपल्या भवतालची असुरक्षितता आणि दैन्य, तालिबानने पुन्हा डोकं वर काढणं या सगळ्या अवस्थेत आपल्या देशातल्या अस्थिर जगण्यापेक्षा अफगाणी माणसांना पाकिस्तान बरा असं वाटू लागलं आहे. ३० लाख अफगाण निर्वासित सध्या पाकिस्तानात राहतात. गेली १९ वर्षे अफगणिस्तान युद्धात होरपळला, त्यामुळे निर्वासितांचे लोंढे पाकिस्तानात आले. आता हे लोंढे आवरा, आपलीच अन्नान्न दशा असताना अफगाणिस्तानातून येणारे हे लोंढे कसे आणि का पोसायचे असा स्थानिकांचा सवाल आहे.

अर्थात, अमेरिका-तालिबान-अफगाण चर्चेत आपलं स्थान आणि महत्त्व टिकून राहावं, आर्थिक रसद सुरू रहावी म्हणून कुटनैतिक आघाडीवर तरी पाकिस्तानला अफगाणी लोकांसाठी आपले दरवाजे बंद करता येत नाहीत. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना व्हिसा द्यावाच लागतो. आणि अफगाणी माणसांचं दुर्दैव म्हणजे जगात फार थोडे देश त्यांना पटकन व्हिसा देतात, त्यापैकी पाकिस्तान हा त्यांचा हक्काचा सहारा आहे. इथल्यापेक्षा तिथे बरं असं म्हणत, लोक पाकिस्तानात जायला निघतात. तिथं गुराढोरांसारखे जगतात, पण देश सोडतात. मात्र देश सोडून जाण्याचा विचार करण्याच्या दारातच असं चेंगराचेंगरीत मरण आणि मरणांतिक यातना देणारी निराशा अफगाण लोकांच्या वाट्याला आली. आता अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात शांतिवार्ता सुरू आहे. पण म्हणून काही तालिबान हल्ले थांबले नाहीत, परवाच झालेल्या एका तालिबानी हल्ल्यात ३५ लोक मारले गेले. मृत्यूचा भयाण खेळ सुरूच आहे. अफगाणिस्तान नावाच्या देशाची ही अशी धुळधाण आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान