शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वच्छतेचे पुढे पाठ मागे सपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 22:01 IST

घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात....

आरोग्य सुदृढ राहावे, साथीचे आजार उद्भवू नये यासाठी शासनाने ग्रामीण भागात विविध उपक्रम हाती घेतले. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना गावोगावी राबविण्यात आली. पण शासनाच्या योजनांची स्थिती म्हणजे पुढे पाठ, मागे सपाट अशी झाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लाखो  कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले. प्रशासनाने त्यांची दप्तरी तशी नोंद करून घेतली. १०० टक्के शौचालय बांधकाम झालेल्या काही गावांचा हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरवही झाला. गावस्तरावर होणाऱ्या निवडणुकांमध्ये यावर अनेकांनी मतेही मागितली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाने गाव कारभाऱ्यांना हाताशी धरून गावे कागदोपत्री नंदनवन केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा पुरवठा करण्यात आला. अनेक गावात हागणदारीमुक्त गाव म्हणून फलक लागले. मात्र, परिस्थिती उलट निर्माण झाली. पुन्हा सुरू झाले ये रे माझ्या मागल्या...ही बाब लक्षात आल्यावर पंचायत समितीने गुड मॉर्निंग पथक तयार करून भल्या पहाटे अनेकांची अडवणूक केली. लोटाबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. एवढे करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला नाही. गावात कोण आले अन् कोण गेले, याची यत्किंचितही तमा गावकारभाऱ्यांनाही राहिली नाही. केवळ पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर देखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुक्काम ठोकून शौचालय बांधकाम व त्याच्या वापरातून होणाऱ्या फायद्याचे महत्त्व गावकऱ्यांना उद्धृत केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला १२ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. लाभार्थ्यांची यादी घेऊन सरपंच, ग्रामसेवक दारोदारी फिरले. अनुदान मिळणार असल्याचे सांगूनही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठांचा रेटा असल्याने स्थानिक पातळीवर शौचालय उभारणीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. रेडिमेड शौचालय स्वस्तात मिळाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. स्वत: उत्पादकांनी घरपोच सेवा देत शौचालय उभारून दिले. लाभार्थ्यांनी वापरासाठी तयार असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढली अन् अनुदान पदरी पाडून घेतले. गाव हागणदारीमुक्त झाल्याचा आनंद अधिकाऱ्यांपर्यंत गाव कारभाऱ्यांनी पोहोचविला. अनेक ठिकाणी तर एका रात्रीतून शौचालय उभारण्याचे काम करण्यात आले. हागणदारीमुक्त मुक्त गावाच्या यादीत आपलेही गाव आले पाहिजे, यासाठी कारभाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून तात्पुरते पैसे लावून बांधकाम करून दिले. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता सोय झाल्याने गांभीर्य लाभार्थ्यांना आले नाही. घाईघाईत बांधून देण्यात आलेले शौचालय आता नावापुरते उरले आहेत. हीच परिस्थिती लातूर शहरातही आहे. पहाट झाली की लोक शिवाराकडे पळतात.... 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान