शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

आजचा अग्रलेख - गुन्हेगारीचे राजकीयीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 06:50 IST

मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

‘सत्या’ चित्रपटात माफिया टोळीचा गॉडफादर भाऊ ठाकूरदास जावळे महापालिका निवडणुकीत विजयी झालेला असतो. त्याच्या घरात विजयश्रीचा माहोल असतो. निवडणुकीत त्याच्या विजयात सिंहाचा वाटा असलेला मुंबईचा डॉन भिकू म्हात्रे हसत प्रवेश करतो. भाऊला आलिंगन देतो आणि खुर्चीत बसतो. लागलीच भाऊ बंदूक काढून भिकूला गोळी घालतो, असे दृश्य आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी दहिसरमधील मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नामे तथाकथित समाजसेवकाबरोबर फेसबुक लाइव्ह करताना असेच हसत होते. दोघे एकमेकांच्या खांद्यावर थोपटून बरोबर काम करण्याच्या आणाभाका घेत होते. संवाद संपताच अभिषेक हसत उठले आणि मॉरिस भाईने त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव केला. ‘सत्या’ चित्रपटातील पडद्यावरील क्रौर्य वास्तवात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आणि समाजमन हादरून गेले. अभिषेक यांचे शेकडो कार्यकर्ते बाहेर असल्याने गोळीबारानंतर ते आपली खांडोळी करतील, याची कल्पना असल्याने मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आठवडाभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणमधील शहरप्रमुखावर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला. द्वारली येथील जमिनीच्या वादातून दोन गायकवाड परस्परांच्या जिवावर उठल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे आ. गायकवाड यांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याची कबुली माध्यमांकडे दिली. दहिसरमध्ये मॉरिस भाई नामे समाजसेवक कोरोनाकाळात उदयाला आला. या मॉरिसवर बलात्कारापासून वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कॅसिनो व तत्सम व्यवसायातून त्याने माया गोळा केली, असे सांगितले जाते. त्यातून कोरोनाकाळात त्याने लोकांना अन्नधान्य वाटले. गुरुवारी त्याने अभिषेक यांना साडीवाटपाच्या कार्यक्रमाकरिता बोलावले होते. मॉरिस याच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटला होता. हीच गोष्ट अभिषेक यांना खटकली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. बलात्काराच्या आरोपात अभिषेक यांनी आपल्याला गुंतवले, अशी मॉरिसची भावना होती. गेले पाच महिने तुरुंगात असलेला मॉरिस अलीकडेच जामिनावर सुटला होता. अभिषेकचा सूड घ्यायचा, या भावनेने तो पेटला होता. मात्र, मॉरिसने मैत्रीचा हात अभिषेकपुढे केला. मॉरिसचे हे प्रेमाचे उमाळे पूतना मावशीचे प्रेम असल्याची कल्पना राजकारणातील उन्हाळे- पावसाळे पाहिलेल्या अभिषेक यांना व गेली किमान चार दशके दहिसरच्या शिवसेनेच्या राजकारणात असलेले अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर यांना आली नाही.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी नव्वदच्या दशकात ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या विषयावरून महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविरोधात रान उठवले होते. उल्हासनगरचे पप्पू कलानी व वसईचे भाई ठाकूर हे मुंडे यांच्या रडारवर होते. त्याच उल्हासनगरात भाजपचा आमदार गायकवाड पोलिस ठाण्यात मित्रपक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतो, हा दैवदुर्विलास नव्हे काय? गेल्या ३० वर्षांत परिस्थिती इतकी खराब झालीय की, आता गुन्हेगारीचे राजकीयीकरण झाले आहे. मुंडेंनी एल्गार केला तेव्हा राजकारणातून बळ प्राप्त करून गुन्हेगारी कृत्ये केली जात होती. आता राजकारणात उमेदवारी वाटताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ या गोंडस नावाखाली गुंडांना उमेदवारी दिली जाते. खंडणी, बलात्कार, हत्या, असे आरोप असलेली ही मंडळी पक्षात उजळ माथ्याने प्रवेश देऊन पवित्र केली जातात. निवडून आल्यावर ते आपला पसारा वाढवतात. सत्तेच्या वळचणीला राहून ते आपल्या जुन्या केसेस एकतर बंद करून घेतात किंवा साक्षीदारांना धमकावून सुटका करून घेतात. या गुंडांना पक्ष, वैचारिक बांधीलकी वगैरे गोष्टींचे सोयरसुतक नसते. सत्तेच्या जवळ राहून संरक्षण मिळवणे, एवढा एकच किमान समान कार्यक्रम सर्वपक्षीय गुंडांचा असतो.

मॉरिसला ठाकरेंच्या शिवसेनेने मोठे केले, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे, तर मॉरिस हा सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार होता, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यामधील तथ्य आता कदाचित बाहेर येणार नाही. एका शिवसेनेच्या दोन सेना, तर राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने निवडणुकीत उमेदवारांची वानवा जाणवणार असल्याने सगळेच पक्ष गल्लीबोळांतील गुंड शोधून काढून त्यांना उमेदवारी वाटण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर ‘ए गोली मार भेजे में... अरे, तू करेगा दुसरा भरेगा कल्लू’ हाच शोर कानावर पडणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर