शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - ताठर भूमिका नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:55 IST

Farmer Protest : शेतीमालाला किमान आधारभूत भाव हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. तो कसा पदरात पाडून घेता येईल, शिवाय करार पद्धतीच्या शेतीमध्ये शेतजमिनीच्या मालकीला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असेल तर प्रस्तावाचा विचार करायला हरकत नव्हती.

दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या चौदा दिवसांपासून नव्या तीन कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने प्रथमच पाठविलेला लेखी प्रस्ताव फेटाळला आहे. शिवाय आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करून शेतीविषयीचे नवे तिन्ही कायदे रद्दच करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. वास्तविक केंद्र सरकारने घेतलेल्या ताठर भूमिकेवरून दोन पावले मागे जात लेखी प्रस्ताव शेतकरी संघटनांना पाठविला . त्यात किमान आधारभूत भावासह कायद्यातील सात मुद्द्यांवर दुरुस्ती करण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. या प्रस्तावावर शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा व्हायला हवी होती. शेतीमालाला किमान आधारभूत भाव हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. तो कसा पदरात पाडून घेता येईल, शिवाय करार पद्धतीच्या शेतीमध्ये शेतजमिनीच्या मालकीला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असेल तर प्रस्तावाचा विचार करायला हरकत नव्हती.कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करूनही किमान आधारभूत भावाचा प्रश्न सुटलेला नाही. त्याशिवाय बाजारपेठा विकसित करण्यासाठी खासगी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना या बाजारपेठांमध्ये उतरण्यास मुभा द्यायला हरकत नाही. त्यांच्या अनुभवातून नवीन दुरुस्त्या करता येऊ शकतात. करार पद्धतीची शेती आता स्वीकारण्यात आलीच आहे. उत्पादित मालाची खरेदी करण्याची हमी किंवा उत्पादित होणाऱ्या मालाचा पुरवठा करणारे करार इतक्याच मर्यादित अर्थाने करार शेतीची पद्धत राबविण्यास सरकार तयार आहे हे  असे या लेखी प्रस्तावातील आश्वासनावरून वाटते. यासाठी या प्रस्तावाचा विचार शेतकरी नेत्यांनी करायला हरकत नव्हती. जीवनावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायद्याचा दुरुपयोग करून शेतमालाचे भाव पाडण्याचे आणि शहरी ग्राहकाला खूश करण्याचे हत्यार म्हणून याचा वापर होणार नाही याची खात्री देता येत नाही. कांदा निर्यातबंदी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. सर्वच मालांच्या भावावर  परिणाम करणारी किंबहुना महागाई वाढीस मदत करणारी पेट्रोल-डिझेलची वाढती भाववाढ आपण सहन करतो आहोतच. भारत ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतकरी संघटनांनी अधिक ताठर भूमिका घेण्याची मानसिकता न ठेवता लेखी प्रस्ताव आल्यावर चर्चा करायला हवी. यापूर्वी चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. त्यात कोणताही लेखी प्रस्ताव किंवा आश्वासन देण्यात आले नव्हते. तरीसुद्धा चर्चा केली होती. वास्तविक शेतकऱ्यांचा रोष सरकारने आधी ओढवून घेतला आहे. त्यामुळे शेतकरीही संतापले आणि आंदोलन चिघळत गेल्याने अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली.  गेले दोन महिने शेतकरी आंदोलने करीत आहेत. त्याची नोंदच घेतली नाही. याउलट समाज माध्यमांतून भाजपसमर्थक भक्तांनी शेतकरी आंदोलनाची चेष्टा करण्यात वेळ घालविला. भारत बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सरकार दबावाखाली आले आहे. हीच चर्चा किंवा लेखी प्रस्ताव आधी दिला असता तर सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहते, असा संदेश गेला असता. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीनुसार विरोधकांना कमी लेखणे, त्यांच्यावर कारवाई करणे, धमकावणे, आदी प्रकार करण्यात आले. आता तर राजस्थानातील ग्रामीण भागाशी संबंध असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा चांगले यश भाजपला मिळताच शेतकरी आपल्याबरोबरच असल्याचा अर्थ काढण्यात येत आहे. अशा छोट्या-छोट्या निवडणुकांचा संदर्भ देत देशातील शेतकरी गेली चाळीस वर्षे किमान आधारभूत भावासाठी झगडतो आहे. त्यावर उपाय शोधण्याचा किंवा मार्ग काढण्याचा सकारात्मक प्रयत्न केला तर भाजप सरकारचे धोरण शतप्रतिशत देशाला पुढे घेऊन जाणारे आहे, असे मानले असते. प्रखर राष्ट्रवादाच्या बळावर एक-दोन वेळा सत्तेवर येता येईल, मात्र गरिबीविरुद्ध लढण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी आर्थिक आघाडीवर पुढे जाणारे धोरण स्वीकारावे लागणार आहे. प्रभावी नेतृत्वाने लोकभावनेचा योग्य वापर करीत लोकांना नव्याचा स्वीकार करायला भाग पाडणे, यातच खरे कसब आहे. केवळ स्वपक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी त्या नेतृत्वाच्या प्रभावाचा वापर झाला तर सत्ता मिळेल, पण देश बदलणार नाही, देशवासीय सुखी होणार नाही. याउलट शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने एक नवी दिशा देण्याची संधी आहे, ती दवडू नये. दोन्हीही बाजूने ताठर भूमिका घेतली जाऊ नये. सर्व शक्यता विचाराधीन आहेत, असे मानून पुढे जावे लागेल!

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार