शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:28 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी भरदुपारी काळरात्र झाली. लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान विमानतळालगतच्या मेघानीनगर नावाच्या वस्तीत कोसळले.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी भरदुपारी काळरात्र झाली. लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान विमानतळालगतच्या मेघानीनगर नावाच्या वस्तीत कोसळले. याच वस्तीत दीडशे वर्षांहून जुने बी. जे. मेडिकल काॅलेजचा परिसर आहे. वैद्यक पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान आदळले आणि त्याने पेट घेतला. अपघाताची दृश्ये तसेच प्रशासनाकडून मिळणारी माहिती पाहता अपघातात कोणी वाचले असल्याची शक्यता कमी होती. वैमानिक व सहवैमानिकासह एअर इंडियाचे बारा कर्मचारी आणि २३० प्रवासी असे एकूण २४२ लोक अपघातावेळी विमानात होते. तेव्हा प्रवासी तसेच वसतिगृहाच्या मेसमध्ये दुपारच्या जेवणासाठी एकत्र जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांपैकी अनेकजण असे मिळून तीनशेहून अधिक जणांचा या अपघातात मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह पावणेदोनशेच्या आसपास भारतीय प्रवासी आणि काही ब्रिटिश नागरिकांना या अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अपघाताची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. देश शोकसागरात बुडाला आहे. प्रत्येक माणूस दु:खातिरेकाने स्तब्ध झाला आहे. जगभर दु:ख व्यक्त होत आहे.

भारत तसेच जगातील भयंकर विमान अपघातांपैकी हा एक आहे. एक प्रकारे एक मोठे संकट देशावर कोसळले आहे. आता विमानतळ प्राधिकरण, केंद्र व राज्य सरकारच्या तपास यंत्रणा या अपघाताची संभाव्य कारणे शोधत आहेत. त्यात इंजिनात बिघाड, काही तांत्रिक दोष, पक्ष्याची धडक वगैरे कारणांची चर्चा सुरू असली तरी घातपाताची शक्यतादेखील पूर्णपणे बाद ठरविता येत नाही. कारण, बोइंग ७८७ ड्रीमलायनर हे एक विशालकाय विमान आहे. अत्यंत सुरक्षित आणि विश्वासपात्र अशी या विमानाची ओळख आहे. इंजिनातील किरकोळ बिघाड किंवा तांत्रिक गडबडीतही हे विमान सुरक्षित राहते, असा दावा केला जातो. त्यामुळेच कित्येक हजार किलोमीटरच्या लांबच्या प्रवासासाठी सगळ्या महत्त्वाच्या विमान कंपन्या हे विमान वापरतात. २००९ च्या अखेरीस या वाइड-बाॅडी जेट एअरलायनर विमानाचे पहिले उड्डाण झाले आणि २०११च्या ऑक्टोबरपासून ते जगभर प्रवाशांच्या सेवेत आहे. सध्या या प्रकारची जवळपास बाराशे विमाने वापरली जात आहेत. पन्नास लाखांहून अधिक उड्डाणे आणि शंभर कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक असा बोइंग ७८७ ड्रीमलायनरचा लाैकिक आहे. अपघातग्रस्त विमानदेखील युरोप, अमेरिका, आशिया आदी खंडांमधील लांबच्या प्रवासासाठी वापरले जात होते, अशी बाब समोर आली आहे. तेव्हा, प्रथमदर्शनी हा अपघात विस्मयकारक आणि नानाविध शंकांना जन्म देणारा ठरतो. अहमदाबाद ते लंडन अशा थेट प्रवासासाठी जवळपास एक लाख लिटर इंधन विमानात भरलेले होते. परंतु, हे अत्यंत सुरक्षित विमान हवेत पूर्णपणे झेपावतच नाही. धावपट्टी सोडल्यानंतर सहाशे-सातशे फुटांवर असतानाच ते विमानतळालगतच्या वस्तीत कोसळते. त्याआधी वैमानिकाने संकटकाळात मदतीसाठी दिलेला ‘मेडे’ संदेश नियंत्रण कक्षाला मिळतो. त्याला प्रतिसाद देण्याच्या आधीच प्रचंड बाॅम्बस्फोटासारखा अग्निगोल हवेत उसळतो आणि क्षणात शेकडो प्रवासी त्यात होरपळून निघतात. हे सारे प्रचंड धक्कादायक आणि सखोल चाैकशीची, विविधांगी तपासाची गरज अधोरेखित करते. घातपातासह सर्व शक्यता तपासून घेण्याची गरज आहे.

अपघाताची कारणे शोधतानाच अशा भयंकर अपघातावेळी मदतकार्यासोबतच प्रशासन आणि माध्यमांनी कसे वागावे, यासंदर्भातही काही धडा अहमदाबादच्या अपघाताने आपल्याला शिकविला आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात घडला. मृत व जखमींची हलवाहलव, मदतकार्य आदींमध्ये सर्व यंत्रणा गुंतल्या असणार हे मान्य. परंतु, अपघाताचे स्वरूप पाहता कोणी वाचले असण्याची शक्यता दिसत नसतानाही मृत व जखमींचा आकडा कित्येक तास समोर न येणे चांगले नाही. अहमदाबाद हे उद्योग व व्यापाराचे प्रमुख शहर असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतात. अशावेळी अपघाताची योग्य माहिती दिली न गेल्याने प्रवाशांच्या नातेवाइकांचे जीव टांगणीला लागले होते. हे काही चांगल्या सुशासनाचे लक्षण नाही. त्यामुळेच अपघाताची दृश्ये आणि इतर तपशिलांची वर्णने करण्याशिवाय स्थानिक माध्यमांपुढे काही पर्याय उरत नाही. अखेर पाच-सहा तासांनंतर असोसिएटेड प्रेस ही विदेशी माध्यम संस्था मृतांचा आकडा व अन्य माहिती प्रसारित करते, हे संतापजनक आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात