शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकिस्तान... दुकाने बंद आणि बाजार सुने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 07:50 IST

मी एक सामान्य पाकिस्तानी नागरिक आहे. चहाऐवजी गरम पाणी प्यायला, मोटारीऐवजी पायी चालायला तयार आहे, फक्त माझी एक अट मान्य करा!

फकीर सय्यद एजाजउद्दीन, कला समीक्षक, ख्यातनाम लेखक, पाकिस्तान

मागच्या रविवारची लाहोरमधली सकाळ. बाजारात फेरफटका मारताना अचानकच माझ्या  लक्षात आले, की सुपर मार्केट, मिनी मार्केट,  बेकऱ्या अशी सगळी दुकाने बंद आहेत. कारण काय?- तर वीज वाचवण्यासाठी सरकारने तसा आदेश दिला होता. औषधांची दुकाने उघडी होती.  

- खरेदीसाठी गेलेला मी रिकाम्या हाताने  घरी परतलो आणि मला स्वतःलाच प्रश्न केला, देशाची ही अवस्था करून ठेवणारा कारभार गेल्या ७५ वर्षांत झाला... त्याला जबाबदार कोणीही असो, पण सामान्य जीवन जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट या देशात  का मिळत नाही? एखाद्या भिकाऱ्यासारखे आपण चीन आणि सौदी अरेबियाच्या दारात का उभे असतो? देशाबाहेर वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तान्यांकडून येणारा पैसा आणि कर्जावर आपला देश जेमतेम तग धरून आहे हे वास्तव आपण कधी स्वीकारणार? 

आयुब खान यांच्या हरितक्रांतीचे परिणाम आम्ही उपभोगले. झुल्फिकार अली भुत्तो यांचा इस्लामिक समाजवाद  सहन केला. जिया उल हक यांचा इस्लामिक पुनर्जीवनवाद झेलला. लोकशाहीवाद्यांनी देशभक्तीच्या नावाखाली या देशाचा खजिना लुटला. लोकसेवेचा जप करत धनदांडगे फुगत गेले.  अण्वस्त्रक्षमतेचा दाखला आम्ही सुमारे २५ वर्षांपूर्वी दिला. आम्ही जगातली दहावी मोठी सैन्य शक्ती आहोत... तरी हे असे का?

जनरल जाहिद अली अकबर खान यांच्या “जर्नी इन्टू हिस्टरी २०-२१” या पुस्तकात मला उत्तर सापडले. साहेब जालंदरी पठाणांच्या गोतावळ्यातले, स्थलांतरित पाकिस्तानी. सैन्यात त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. काराकोरम हमरस्त्याचे बांधकाम आणि देशाच्या अणुबॉम्बच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. सैनिकांसाठी घरे, मार्शल लॉ, सियाचीन संघर्ष, कलबाग धरण या संदर्भांतही जनरल साहेबांचे नाव घेतले जाते. देशाचा ऊर्जा प्रश्न सोडवण्याच्या कामातही वरिष्ठ स्तरावरून त्यांची मदत घेतली गेली. १९८७ मध्ये ते लष्कराचे उपप्रमुख झाले असते, परंतु जनरल असलम बेग यांनी मोडता घातला. पाकिस्तानच्या पाणी आणि ऊर्जा विकास प्राधिकरणात त्यांना हलवण्यात आले.  

आडमुठ्या संघटना आणि संस्थात्मक जडतेने प्राधिकरणाला घेरलेले होते. संस्था प्रोत्साहनांना सोकावली होती. या परिस्थितीत जनरल साहेबांनी कारभार हाती घेतला, आणि ऊर्जा वितरणातल्या गळतीचे प्रमाण ३० वरून १७ टक्क्यांवर आणून दाखवले. देयके थकवणाऱ्यांचे मन वळवून त्यांनी पैसे भरायला लावले. ज्यांनी भरले नाहीत त्यांची वीज तोडण्यात आली.

- अर्थातच जनरल साहेबांच्या या धडाकेबाज कामाच्या शैलीमुळे त्यांना शत्रूच जास्त निर्माण झाले. त्यात किमान दोन पंतप्रधान असे होते, की ज्यांनी त्यांना मुदतीपूर्वी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. प्राधिकरणाच्या नियमानुसार मात्र जनरल साहेबांना संरक्षण होते. जगभरातले कंत्राटदार, पुरवठादार यांनी त्यांना वेळोवेळी कशी लाच देऊ केली याची अनेक उदाहरणे जनरल साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहेत. संतमहात्म्यांप्रमाणे आपलाही तपोभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण आपण त्यांना थोपवले, असा दावा ते करतात.

नंतर मात्र जनरल साहेबांच्या  चेहेऱ्यावरचा हा नि:स्पृहतेचा बुरखा उतरवला गेला. कारण? - भ्रष्ट व्यवहारांचे आरोप! घोषित उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, असा आरोप एनएबीने केला. पर्ल कॉन्टिनेण्टलच्या शेजारी असलेले १७१, सरवर रोड हे रावळपिंडीचे निवासस्थान जनरल साहेबांनी गैरमार्गाने मिळवले, ही माहिती त्या आरोपामागे असावी.  पूर्वी केव्हातरी आयुब खान यांच्या मंत्रिमंडळात झुल्फिकार अली भुत्तो वाणिज्यमंत्री असताना बॉयलर चिकनची दोन औद्योगिक युनिट्स आणि स्वयंचलित भट्टी यासाठी त्यांनी ४० लाखांचे कर्ज घेतले होते. या कथानकाचा अखेरचा भाग मोठा खास आहे. खानसाहेबांना २०१६ मध्ये पाकिस्तानात परतणे भाग पाडण्यात आले. देशात परतल्यावर  एनएबीशी समझोता करून त्यांनी तब्बल १९.९ कोटींची लाच देऊन प्रकरणावर पडदा पाडून घेतला.

जनरल अकबर यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात आले, या एकूण पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या एका स्वाभिमानी, सामान्य नागरिकाला अजूनही निकृष्ट दर्जाचा पाकिस्तानी म्हणून का राहावे लागते? माझ्या खांद्यावर लष्करी गणवेशाची पट्टी नाही म्हणून? जनरल साहेब आणि त्यांच्यासारख्या इतरांना निवृत्तिवेतन मिळावे म्हणून मी भरलेल्या कराचे पैसे सरकार वापरते, पण मी देशासाठी केलेल्या इतक्या वर्षांच्या सेवेच्या बदल्यात मला मात्र सरकारकडून काहीच मिळत नाही, हे कसे? बाकी तर सोडाच, उद्या मी मेल्यावर माझ्या दफनासाठी जागा तरी मिळेल का, याचीही शाश्वती नाही. चहाच्याऐवजी गरम पाणी प्यायला मी तयार आहे. मोटारीऐवजी पायी जावे लागले तरीही चालायची माझी तयारी आहे.. पण मग प्रत्येक सरकारी, प्रत्येक लष्करी अधिकाऱ्यानेही तेच केले पाहिजे. या सगळ्यांना वेगळा न्याय आणि मला वेगळा; असे का? त्यांना भलेभक्कम सशस्त्र सुरक्षा कवच आणि सामान्य नागरिकांना रस्त्यावर फेकलेले, असे का? आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडून त्यांच्या जीवाला कसला धोका आलाय?- त्यांचा उद्धट अहंकार हाच तर त्यांचा खरा शत्रू आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान