शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:21 IST

विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल यासाठीची धडपड सुरू होईल. 

-एम. आर. लालू, मुक्त पत्रकार

भडकलेल्या युद्धांनी जगभरातील आनंदाचे क्षण झाकून टाकले आहेत. मग ते युक्रेन असो किंवा इस्रायल. युद्धांचे वेगवेगळ्या कारणांनी समर्थन होते तसाच धिक्कारही होतो. या विषयावर हतबल सुरात चर्चा होतात, राग व्यक्त होतो, कानउघाडणी केली जाते, दया दाखवली जाते, सहानुभाव व्यक्त होतो. काहीही झाले तरी युद्धाची भाषा थांबत नाही हा त्यातला सर्वात भयंकर भाग आहे. 

जेव्हा आकाशातून अग्निबाण बरसतात, जिवंत राहण्याची आशा मावळत चाललेल्यांच्या करुण किंकाळ्या भग्नावशेषांच्या ढिगाऱ्याखालून येत राहतात. रस्त्यांवर रक्तामांसाचा चिखल होतो आणि मृतदेहांची मोजदाद करावी, असेही कोणाला वाटत नाही. निराधार कुटुंबे आणि पोरकी झालेली मुले सीमा ओलांडून हजारोंच्या संख्येने आश्रयासाठी रांगा लावतात. युद्धभूमीवरचे आणि शेजारच्या देशांमधले चित्र कमालीचे बदलते. त्याचे दूरगामी परिणाम होणार असतात. चुकूनमाकून दिसणारी प्रगतीची हिरवळ चिरडली जाऊन तिचे वाळवंट होते आणि युद्धखोर जिंकण्यासाठी जी किंमत मोजतात तिला अंत राहत नाही. 

जागतिक युद्धापासून छोट्या- मोठ्या युद्धापर्यंत शत्रुत्व हे मानवी मनातच उपजलेले आहे. शेजाऱ्यापासून धोका असल्याचे भय त्याच्या मुळाशी आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेला या भयाने ग्रासले आहे. ती दूर करण्यासाठी करता येतील, असे उपाय निष्प्रभ ठरले आहेत. वेगवेगळ्या विचारप्रणालींनी भरलेले धार्मिक तत्त्वज्ञान श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असते. नवे प्रदेश पादाक्रांत करत सुटते. जिंकलेल्या भूप्रदेशावरील शहाणपण मारून टाकते. जेथे सर्व एकसारखे दिसेल, सर्वांची प्रार्थना, सगळ्यांचे पोशाख एक असतील, सर्वजण एकच घोषणा देतील आणि एकाच धार्मिक स्थळात जातील, असे जग या मंडळींना निर्माण करावयाचे आहे. वैविध्य हे पाखंड ठरवले गेले याकडे इतिहास लक्ष वेधतो आहे.    

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये उद्भवलेला संघर्ष मानवी क्रौर्य कसे दिसते याचा नमुना होय. हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडत आहेत. मुले आणि स्त्रिया दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवल्या जात आहेत; त्यांना ठार करण्याच्या धमक्या मिळत आहेत. मर्यादीत अशा भूमीवर भय आणि विलाप यानी आसमंत भरून गेला आहे. कित्येकांना घरेदारे सोडून परागंदा व्हावे लागले. इस्रायली आणि पॅलेस्टीनी यांच्या पदरात पडले ते फक्त कधीही न संपणारे दु:ख.    

हमासने इस्रायलवर अकस्मात हल्ला केला. त्यांच्या दुस्साहसामुळे दोन्ही बाजूला भयंकर जीवित आणि वित्तहानी झाली. खऱ्या अर्थाने आपण या पृथ्वीतलावर सुखासमाधानाने जगण्याची शेवटची संधी घालवून बसलो आहोत काय? या पृथ्वीतलावरचा कुशाग्र बुद्धीचा माणूस भीती आणि वेदनांनी भरलेले आयुष्य किती काळ जगणार आहे? इस्रायलच्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या सीमा मूठभर हमास अतिरेक्यांनी कशा ओलांडल्या याचा अभ्यास आता सखोलपणे केला जाईल; पण गोष्टी तेथे थांबणार नाहीत. जेथे युद्ध होते तेथे अनेक पिढ्यांच्या मनीमानसी वैरभाव ठाण मांडून बसतो. भय, सर्व काही गमावणे, बेघर होणे आणि त्याचबरोबर शौर्याच्या कथा ऐकता ऐकता पिढ्या माेठ्या होतात आणि बदला घेण्याची संधी मिळण्याची वाट पाहत राहतात. म्हणजे जग पुन्हापुन्हा रक्ताने न्हाऊन निघणार.  

आज जरी अनेकांमध्ये धुमसते वैरभाव रोखून धरले गेले असले तरी कुठे ना कुठे त्याचा स्फोट होतोच. नि:संशयपणे विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल, यासाठी धडपड करू लागेल.गोष्टी स्वाभाविक दिसू लागतील आणि जीवनाचा प्रवाह पुन्हा एकदा पुढे वाहू लागेल; परंतु, मानवी इतिहासाच्या पानांमधून पुन्हा एक प्रश्न समोर येईल की, आपण आपले हे जग निरामय, समतोल कधी करू शकू? मानवतेला खडबडून जागे करण्याची वेळ आता आली आहे. वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेतील मूल्यानुसार संघर्षविरहित सहजीवन सगळीकडे फुलवता येईल. आपल्याला एक सुखी आणि स्वस्थ जग मिळाले पाहिजे की नाही?    mrlalu30@gmail.com

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष