शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:42 IST

कर्नाटकच्या राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा निर्दयी गैरवापर करून राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नेहमीसाठी कलंक लावला आहे.

- अ‍ॅड़ असीम सरोदेकर्नाटकच्या राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा निर्दयी गैरवापर करून राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नेहमीसाठी कलंक लावला आहे.कर्नाटकातील निवडणुकानंतर घडणाऱ्या घटनांकडे केवळ ‘राजकीय घडामोडी’ म्हणून बघणे अपूर्णपणाचे ठरेल. कारण लोकशाहीच्या प्रक्रिया, संविधानातील तरतुदींनाच वेठीस धरण्याचा अश्लाघ्य प्रकार सध्या घटनाक्रम म्हणून पुढे येतो आहे. राज्यपालांचे कार्य संविधानकेंद्री व पक्षातीत असावे याचा विसर पडलेले राज्यपाल वज्जुभाई वाला हे घटनात्मकपद धारण करूनसुद्धा भाजपाचे नेते आणि संघाचे कार्यकर्ते म्हणून वागत आहेत़ एक राजकीय पक्ष म्हणून भाजपा आणि कर्नाटकचे राज्यपाल संविधानासोबत खोडसाळ प्रकारचा खेळखंडोबा करीत आहेत़ जे संविधानाचा मान राखत नाहीत, घटनात्मक तरतुदींचा अपमान करतात किंवा कायदेशीरतेचे पालन करीत नाहीत त्यांचे देशावर प्रेम नाही किंवा ते देशभक्त नाहीत, असे म्हणण्याची पद्धत अजून तरी अस्तित्वात नाही़राजकीय कारणांसाठी रात्री सर्वोच्च न्यायालय उघडल्याची घटना प्रथमच देशात घडली आहे़ राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, हे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील ‘अधिकारांचे विभाजन’ हे तत्त्व पाळले़ घटनेनुसार न्यायव्यवस्था व कायदेमंडळ यांच्यात अधिकारांचे विभाजन झालेले आहे़ राज्यपाल व राष्ट्रपतींच्या काही निर्णयांमध्ये न्यायव्यवस्थेने ढवळाढवळ करू नये, हे तत्त्व आहे़ पण हे तत्त्व एकतर्फी पालन केल्याने इतरांना तत्त्वहीन वागण्याची परवानगी मिळू नये, यावर आता सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल. खरे तर सर्वोच्च न्यायालयाने त्याचवेळी येडियुरप्पांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची प्रत फॅक्सद्वारे कर्नाटक राज्यपाल कार्यालयातून मागवून घेतली असती तर बरीच स्पष्टता आली असती़ कोणताही निर्णय घेण्याची प्रक्रिया न्याय्य व न्यायिक आहे का? हा कायद्याचा प्रश्न ठरतोच़ येडियुरप्पांची देहबोली व चेहºयावरील निरुत्साह तसेच छोट्या छोट्या राजकीय विजयांचा जल्लोष करतानाही उपस्थित राहणाºया पंतप्रधान मोदी व अमित शहा यांची अनुपस्थिती यातून राज्यपालांसह भाजपाच्या नेत्यांमध्ये आपण गुन्हेगारी कृत्य केल्याची भावना (गिल्टी मार्इंड) प्रकर्षाने दिसते.गोव्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपाचे मुळीच बहुमत नसतानाही त्यांनी इतर पक्षांना हाताशी घेऊन सरकार स्थापन केले़ त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, काँगे्रसला अधिक जागा मिळूनही त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता व त्यामुळे राज्यपालांनी भाजपा व इतरांना संधी दिली. आता याच आधारे बघितले तर काँग्रेस व जनता दला(सेक्युलर)ने निवडणुकानंतर त्वरित एकत्रितपणे ११७ आमदारांसह सत्तास्थापनेचा दावा केला.भाजपाला केवळ १०४ आमदार असल्याने ते सत्ता स्थापन करण्यासाठीचे ११२ आमदारसंख्या गाठू शकणार नाहीत, हे स्पष्टपणे दिसत असताना राज्यपालांनी भाजपाला आमंत्रित करणे चुकीचे व आमदार खरेदीच्या भ्रष्टाचाराला निमंत्रण देणारे ठरते. या संपूर्ण प्रक्रियेबाबत व त्यामागील भ्रष्ट उद्देशांबाबत सर्वोच्च न्यायालय जरूर विचार करेल, असे दिसते़ लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू नये यासाठी आवश्यक ते अन्वयार्थ काढून संविधानातील काही त्रुटी, अस्पष्टता यांचा गैरवापर कुणीही करू नये, असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे़(ज्येष्ठ संविधान अभ्यासक)

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८