शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अशीदेखील एक राज्यनिहाय बंदी

By admin | Updated: September 5, 2016 05:27 IST

एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे

एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे, याचा विचार करावा लागेल एका राज्यातील वकिलाने दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील स्थानिक वकिलाच्या मदतीशिवाय न्यायालयीन प्रकरणे चालविण्यास मनाई करणारे नियम घटनाबाह्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने वकिली व्यवसायात खदखद असलेल्या एका विषयावर पडदा पडण्याऐवजी नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.हा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नियमांच्या संदर्भात दिलेला असला तरी मुंबईसह देशातील बहुतेक सर्वच उच्च न्यायालयांचे नियमही अशाच प्रकारचे असल्याने त्यास देशव्यापी संदर्भ आहे. जमशेद अन्सारी वि. अलाहाबाद हायकोर्ट (सिव्हिल अपील क्र. ६१२०/१६) या प्रकरणात न्या. ए. के. सिक्री व न्या. एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने केलेल्या नियमांचे स्वरूप दुय्यम विधी (सबॉर्टिनेट लेजिस्लेशन) असे आहे. अशा दुय्यम विधींनी वकिलांना आणि पक्षकारांना कायद्याने व राज्यघटनेने बहाल केलेल्या हक्कांचा संकोच केला जाऊ शकतो का, असा मुद्दा होता. याचे उत्तर न्यायालयाने होकारार्थी दिले आहे. हा नियम परराज्यातील वकिलांना पूर्ण मज्जाव करणारा नव्हे तर न्यायालयीन कामाचे नियमन करणारा असल्याने तो मूलभूत अधिकारांवर घातले जाऊ शकणारे रास्त निर्बंध या वर्गात मोडतो, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. १९६१च्या अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्टच्या कलम ३० अन्वये कोणत्याही राज्य बार कौन्सिलकडून सनद घेतलेल्या वकिलास देशभरात कुठेही वकिली करण्याचा अधिकार आहे. शिवाय इतर कोणत्याही नागरिकाप्रमाणे वकिलासही राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१) अन्वये देशात कुठेही व्यवसाय करण्याचा मुलभूत हक्क आहे. शिवाय प्रत्येक पक्षकारास आपल्या पसंतीचा वकील करण्याचा हक्क राज्यघटनेच्या अनुच्छेद २२ (१) व दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ डी व ३०३ अन्वये आहे. अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्टच्या कलम ३४ अन्वये उच्च न्यायालयांना वकिली व्यवसायासाठी अटी व शर्ती ठरविण्याचा अधिकार आहे. हाच अधिकार वापरून उच्च न्यायालयांनी हे नियम केले आहेत. पण ते केवळ उच्च न्यायालयांना नव्हे तर त्या राज्यातील सर्व न्यायालयांना लागू होतात. यानुसार एका राज्यातील वकिलास दुसऱ्या राज्यात वकिली करण्यासाठी एखाद्या स्थानिक वकिलासोबतच वकीलपत्र दाखल करावे लागते. इतर कोणत्याही मुलभूत हक्काप्रमाणे व्यवसायाचा हक्कही अनिर्बंध नाही व व्यापक समाजहितासाठी त्यावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. न्यायदानाचे काम निर्वेधपणे व विनाविलंब पार पडणे हे नक्कीच समाजहिताचे आहे व त्याच हेतूने हा नियम केलेला असल्याने तो वैध आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिलांच्या हक्कांचे रक्षण करणे अपेक्षित आहे त्या कौन्सिलनेही या नियमाचे समर्थन केले आहे. पण हा निकाल चुकीचा आहे, असे मला वाटते. कारण एका हाताने दिलेला अधिकार दुसऱ्या हाताने काढून घेण्याचा हा प्रकार आहे. राज्यघटनेने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांवर ठराविक निकषांत बसणारे निर्बंध जरूर घातले जाऊ शकतात. पण हे निर्बंंध संसद किंवा राज्य विधिमंडळांनी रीतसर कायदा करून घालायला हवेत, हे राज्यघटनेचे बंधन आहे. उच्च न्यायालयाने केलेले नियम या निकषांत बसत नसल्याने ते कायदा किंवा राज्यघटनेहून वरचढ ठरू शकत नाहीत, या मुद्द्याला न्यायालयाने हवे तेवढे महत्व दिले नाही असे वाटते. शिवाय अ‍ॅडव्होकेट््स अ‍ॅक्ट लागू होण्यापूर्वी सन १९५३ मध्ये एका उच्च न्यायालयाने केलेला अशाच प्रकारचा नियम आपण स्वत:च अश्विनी कुमार घोष वि. अरविंद बोस या प्रकरणात अवैध ठरवून रद्द केला होता, याचाही सर्वोच्च न्यायालयास विसर पडलेला दिसतो. तूर्तास तरी हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने त्याचे पालन सर्वांना करावेच लागेल. पण संधी मिळेल तेव्हा त्याच्या फेरविचारासाठी प्रयत्न करावे लागतील. एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील ही राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे, याचाही विचार करावा लागेल.- अजित गोगटे