शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते?

By गजानन जानभोर | Updated: October 10, 2017 00:35 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारक समितीशी संघाचा काहीच संबंध नाही, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी न्यायालयात सांगणे संघाच्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारक समितीशी संघाचा काहीच संबंध नाही, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी न्यायालयात सांगणे संघाच्या आजवरच्या प्रामाणिकपणाच्या लौकिकाला बट्टा लावणारे आहे. संपत्ती वाचविण्यासाठी किंवा आर्थिक लाभ उकळण्यासाठी राजकीय नेते किंवा उद्योगपती अशी चलाखी करीत असतात. त्यांच्या धंद्यातील ती भ्रष्ट अपरिहार्यता असते. पण संघाने केवळ फुटकळ लाभासाठी असे नीतीभ्रष्ट होणे निष्ठावंत संघ स्वयंसेवकांना अस्वस्थ करणारे आहे.संघाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया या चर्चित प्रकरणाचे निमित्त तसे किरकोळ. ‘नागपूरच्या रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समिती ही संघाच्या मालकीची नाही’, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र संघाने उच्च न्यायालयात अलीकडेच सादर केले. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात नागपूर महानगर पालिकेच्या निधीतून संरक्षक भिंत व अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेसंदर्भात संघाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ‘राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था नाही, त्यामुळे मनपाला त्या ठिकाणी कुठलीही विकासकामे करता येत नाहीत’, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. तर ज्या ठिकाणी ही कामे होणार आहेत, त्या डॉ. हेडगेवार स्मारक समितीशी आमचा काहीही संबंध नाही, हा संघाचा दावा आहे. संघाबद्दल कणव वाटायला लावणारी ही गोष्ट आहे. केवळ दीड कोटींच्या विकासकामांसाठी या ‘राष्ट्रभक्त’ संघटनेने केलेली ही कायदेशीर चलाखी आहे. तो या संघटनेचा सांस्कृतिक पराभव जसा आहे तसाच केवळ दीड दमडीसाठी लाखो स्वयंसेवकांना पूज्य असलेल्या हेडगेवारांशी आपले नाते नाकारण्याचा कृतघ्नपणाही आहे. या प्रकरणातील आणखी एक हास्यास्पद बाब अशी की, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान या प्रकरणात आम्हाला प्रतिवादी करा, असा अर्ज डॉ. हेडगेवार स्मारक समितीने उच्च न्यायालयात सादर केला आहे. स्मारक समिती नोंदणीकृत असल्याने स्वाभाविकच याचिका फेटाळली जाईल आणि दीड कोटींची विकास कामे रद्द होणार नाहीत, हा त्यामागील डाव आहे. दुसरीकडे हेडगेवारांशी असलेले नाते ‘कायदेशीर’ तुटले तरी चालेल, पण दीड कोटी जाऊ द्यायचे नाहीत, हा संघाचा अप्पलपोटेपणा आहे.या प्रकरणात वाद निर्माण होताच ‘आम्हाला तुमच्या पैशातून नकोत ही विकासकामे’, असे बाणेदारपणे संघाने मनपाला सुनावले असते तर या राष्टÑभक्त संघटनेची प्रतिमा एवढी काळवंडली नसती. रेशीमबागेत असलेले संघाचे स्मृती भवन आणि स्मृती मंदिर या दोन वास्तू सरकारी मदतीतून उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या बांधकामासाठी स्वयंसेवकांनी एकेक रुपया गोळा केला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सतत प्रवास करीत असतात. पण, सरकार पुरस्कृत कुठलेही आदरातिथ्य ते कटाक्षाने टाळतात. संघाबद्दल आदर वाढवणारी अशी असंख्य उदाहरणे समोर असताना केवळ दीड कोटींसाठीच एवढी लाचारी का? २००८ मध्ये संत गजानन महाराज जन्मशताब्दीनिमित्त सरकारने देऊ केलेले १० कोटी रुपये शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी झिडकारले होते. संघाची ही अगतिकता बघितल्यानंतर अशावेळी शिवशंकरभाऊंच्या निष्कलंक सेवेची प्रकर्षाने आठवण होते. gajanan.janbhor@lokmat.com

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ