शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

मग कसं... पंत म्हणतील तसं !

By सचिन जवळकोटे | Updated: July 28, 2019 08:52 IST

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

सोलापूर जिल्ह्यानं आजपावेतो अनेक गट बघितले. तट अनुभवले; मात्र मुंबईच्या मंत्रालयात बसून सोलापूरच्याराजकारणात नव्या गटाची केली जाणारी साखरपेरणी प्रथमच पाहिलेली. होय...इथल्या दोन्ही देशमुखांना पद्धतशीरपणे बाजूला सारून झपाट्यानं वाढत चाललाय नवा ‘हॉटलाईन’ गट. ‘कोल्हापूर’चे चंदूदादा अन् ‘नागपूर’चे देवेंद्रपंत यांच्याशीच थेट संवाद साधणारा ‘सोलापूर’चा गट. पक्षाचा तर सोडाच...घराचा उंबरठा ओलांडतानाही ‘मग कसं...पंत म्हणतील तसं !’ म्हणणारा नवा ‘इनकमिंग’ गट...

बबनदादा’ म्हणे कमळ......अन् ‘संजयमामा’ बाण !

एकेकाळी अवघ्या महाराष्टÑभर राज्य करणारे ‘धाकटे पुतणे बारामतीकर’ यांची राजकीय अवस्था भलतीच बिकट झालेली. काल ‘अजितदादा’ सोलापुरात आले तेव्हा त्यांना भेटायला तर सोडाच साधा फोनही केला नाही त्यांच्या दोन आमदारांनी. पार्टीच्या मुलाखती आहेत हे माहीत असूनही बार्शीचे ‘दिलीपराव’ गेले ‘तिरुपती-बालाजी’ला. बहुधा पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानं गरज भासली असावी ‘लक्ष्मीनारायण’च्या दर्शनाची; परंतु ‘बबनदादां’चं काय ? त्यांनी किमान आपल्या लाडक्या लेकराला तरी किमान पाठवायला हवं होतं ना ‘अजितदादां’कडं...

...यात अंदर की बात फक्त आम्हा पामरालाच ठावूक. गेल्या काही दिवसांपासून ‘निमगाव’चे ‘रणजितभैय्या’ बारामतीच्या ‘अजितदादां’ऐवजी अकलूजच्या ‘रणजितदादां’सोबतच अधिक संपर्कात. दोघांचीही भेट होत असते पुण्यात गुप्त ठिकाणी. दोघांचाही प्रतिस्पर्धी समान. अर्थात संजयमामा. त्यामुळं आर्थिक भानगडींपासून राजकीय घडामोडीपर्यंत रंगते दोघांमध्ये चर्चा. या ओळखीतूनच ‘रणजितदादां’चाही नकळतपणे ‘बबनदादां’ना थोडाफार सॉफ्टकॉर्नर. हाच धागा पकडून ‘बबनदादा अन् रणजितभैय्यां’नी भेट घेतली म्हणे थेट ‘विजयदादां’ची. ‘आम्हाला संजयमामांच्या राजकारणाशी नाही देणं-घेणं.  तुम्ही माढ्यात करा माझ्या मुलाला कमळाचा आमदार. मी जिल्ह्यात मानेन तुमचंच नेतृत्व’, असा भावनिक शब्दही गेला म्हणे अगतिक पित्याकडून... कारण ‘अकलूजकरां’चा विरोध मावळला तर ‘बबनदादां’च्या शिवारात ‘कमळ’ फुलायला रान मोकळं... अन् मुंबईच्या ‘देवेंद्रपंतां’नाही हवंय हेच. त्यांना हवेत अकलूजचे दादा अन् माढ्याचेही बबनदादा. आलं का लक्षात... मग कसं ? पंत म्हणतील तसं...

मात्र याचवेळी ‘संजयमामा’ पुन्हा ‘तानाजीरावां’च्या संपर्कात. करमाळ्याचे ‘नारायण’ उठसूठ ‘अकलूजकरां’च्या सान्निध्यात राहिल्यानं सावंत घराण्याचा पारा नेहमीच वाढलेला. ‘आपल्याला आमदार सेनेचा पाहिजे, मोहित्यांचा नको’ हे वाक्यही त्यांनी आतापर्यंत बºयाचवेळा खासगीत उच्चारलेलं. त्यामुळं यदाकदाचित शेवटच्या क्षणी करमाळ्यातला बाण ‘मामां’च्या हाती दिसला तर नको आश्चर्य वाटायला; कारण ‘अकलूजकरां’चा कट्टर दुश्मन आयताच आपल्या जाळ्यात सापडत असेल तर का नकोय सावंतांना ?...मात्र ‘संजयमामा’ हे कधीच कुणाचे कायमचे दुश्मन नसतात  (अन् मित्रही) हे सावंतांना समजायला लागेल बराच वेळ ! दरम्यान, चुकून-माकून ‘युती’ तुटली तर करमाळ्याची जागा जानकरांच्या पार्टीला सोडून तिथं ‘संजयमामां’ना उभं करण्यासही काही ‘कमळ’वाले नेते तयार. याचा अर्थ ‘मामां’चे हात एकाचवेळी तीन-चार डगरीवर. लगाव बत्ती...

नी बी इल्ला... ना बी इल्ला;घेऊन चालले ‘सिद्धूअण्णा’ यल्ला !

अक्कलकोटच्या राजकारणात ‘सिद्रामप्पां’एवढा मुरब्बी नेता नसावा कुणीच. त्यांनी आजपावेतो कैक चमत्कार घडविलेले; मात्र दुधनीच्या ‘सिद्धूअण्णां’नी केलेला यंदाचा अचाट प्रयोग अनेकांची झोप उडविणारा. मध्यंतरी ‘देवेंद्रपंतां’च्या स्वागतासाठी ‘सिद्रामप्पा अन् सचिनदादा’ विमानतळावर एकत्र जमलेले. आपली जुनी दुश्मनी विसरून नव्या दुश्मनाच्या आगमनावर चिंतीत झालेले. त्या ठिकाणीही ‘सिद्धूअण्णां’ना पाहून ‘सचिनदादां’ची सटकलेली. (फोटोतील देहबोलीच सांगते त्यांच्या मनातली खदखद). ‘तुम्हीही नाही...मीही नाही...आता आपली आमदारकी कशी काय त्यांना ?’ हा हतबल सवाल करणाºया ‘सचिनदादां’ना अक्कलकोटच्या राजकारणातले उन्हाळे-पावसाळे समजायला पहाव्या लागतील बºयाच निवडणुका. ‘सिद्धूअण्णां’ना पार्टीत घेण्यासाठी खुद्द ज्या गौडगाव महाराजांनीही पुढाकार घेतलाय, त्यांच्या इलेक्शनला याच वाड्यातून गेली होती पाच पेटींची गुरुदक्षिणाा, हे खूप कमी मंडळींना ठावूक. याचाच अर्थ, ‘सिद्धूअण्णां’च्या आगमनाची तयारी लोकसभेलाच झालेली. फक्त आता प्रवेशाचा मुहूर्त ठरायचाय. कदाचित ‘अण्णां’च्या कारखाना स्थळावर डिस्टिलरी प्रोजेक्ट सोहळ्यात होऊ शकतो पंतांच्या हस्तेच प्रवेश. मग कसं...पंत म्हणतील तसं !...लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत. )

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा