शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:29 IST

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल का? वाघ असतो, अस्वल असतं आणि त्यांच्या रूपाने दबा धरून बसलेला मृत्यू!

राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर -

पूर्व विदर्भातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला की, निसर्गाच्या कुशीत राेजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता हे केवळ पान नाही, तर आदिवासींसाठी तो घराचा तांदूळ, औषधांचा खर्च, मुलांच्या भविष्यासाठी एक आशेचा किरण आहे. पण, या आशेच्या अन् राेजगाराच्या पानांवर आता वाघाच्या पंजाचे आणि अस्वलासह इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्याचे रक्तरंजित ठसे उमटू लागले आहेत. चंद्रपूरमध्ये एकाच वेळी तीन महिलांच्या नरडीचा घाेट घेणाऱ्या वाघाने या हंगामात आतापर्यंत आठ बळी घेतले. हे केवळ आकडे नाहीत, तर दररोज जिवाची बाजी लावून उपजीविकेसाठी जंगलात उतरलेल्या मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षातील मृत्यूची ही रेषा दिवसेंदिवस अधिक गडद हाेत असल्याने हे संकट उभे ठाकले आहे. 

तेंदूपाने संकलन हा हमखास हंगामी रोजगार आहे. मे महिनाभराच्या कालावधीत पूर्व विदर्भात लाखभर अधिक लोकांना यातून रोजगार मिळतो. तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना ७० पानांच्या शंभर पुड्यांमागे ८०० ते ९०० रुपये मजुरी मिळते. एक कुटुंब ५० ते ६० हजार रुपये कमाई करते.  तेंदूपाने संकलन हे दोन पद्धतीने केले जाते. पेसा (२००६) कायद्यान्वये ग्रामसभांना तेंदूपाने संकलन, लिलाव व विक्रीचा अधिकार आहे. बिगर पेसा क्षेत्रातील गावांमध्ये वनविभागाच्या देखरेखीखाली वनसमित्यांच्या मदतीने संकलन होते. २०२५ या वर्षासाठी वनक्षेत्रातून प्रतिगोणी ४ हजार २५० रुपये तर खासगी क्षेत्रातून ४ हजार ३०० रुपये प्रतिगोणी दर शासनाने जाहीर केला आहे. या आधारभूत किमतीच्या कमी दराने ठेकेदारांना तेंदूपाने विकत घेता येत नाहीत. यंदा प्रतिगोणी दरात ८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मात्र,  या दराबाबत शासनाचे धोरण निश्चित नाही, मजुरांचा विमाही काढला जात नाही. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात टाकून मजूर जंगलात वन्यप्राण्यांच्या दहशतीत तेंदूपाने संकलित करीत असतात. 

दक्षिणेकडील राज्यांत या पानांचा विड्या बनविण्यासाठी वापर केला जातो. राज्यातील ३५ टक्के तेंदू एकट्या गडचिरोलीच्या जंगलातून बाजारात जातो. मात्र, तेंदूपत्ता मिळणाऱ्या काेणत्याही जिल्ह्यात तेंदूपानांवर आधारित कुटीरोद्योग किंवा प्रक्रिया उद्योग नाही. मजुरांना शाश्वत मजुरीचे धोरणही नाही. त्यामुळे तेंदूमजुरांच्या नशिबी परवड कायम आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने साधारणत: दोन महिने चालणारा तेंदूपत्ता हंगाम यंदा लवकरच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी वाघाने १८ बळी घेतले असून, गेल्या तीन वर्षांत तेंदू हंगामातील बळींची संख्या २१ आहे.  पूर्व विदर्भात वाघ व मानव संघर्ष आता ऐरणीवर आला आहे. वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आहेत आणि मानव  पोटासाठी त्या अधिवासात शिरतो आहे. हाच संघर्षाचा धागा आहे. वाघांची संख्या वाढत असताना, संरक्षित जागा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे मानवाचे जीवन धाेक्यात आले आहे. 

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली व्यक्ती संध्याकाळी घरी परत येईल का, याची खात्री कुटुंबाला नसते. वाघ असतो, अस्वल असतं आणि सगळ्यात भयंकर असताे ताे म्हणजे दबा धरून बसलेला मृत्यू. तेंदूपत्ता संकलन थांबवणं शक्य नाही; पण, ते सुरक्षित करणं शक्य आहे. प्रश्न एवढाच की शासन, समाज आणि वनविभाग किती तत्पर आहे? जंगलात गेलेले मजूर परत आले पाहिजेत, त्यांच्या हातात तेंदूपत्त्यांची गाठोडी असावीत. या गाठोड्यांमध्ये ‘पानं’ असावीत; त्या गाठोड्यांतून मजुरांचे कलेवरच घरी येऊ नये.rajesh.shegokar@lokmat.com

टॅग्स :Vidarbhaविदर्भTigerवाघ