शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

सनदी अधिकाऱ्यांच्या पाठीच्या कण्याचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 9:54 AM

प्रशासनाचा कणा असलेले अधिकारी अटकेत जातात, न्यायालयाच्या संशयाचे कारण होतात, हे लक्षण ठीक नव्हे! तक्रार आल्यावरच जागे होते ते प्रशासन कसले?

महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी.गेल्या काही दिवसांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांशी निगडित तीन बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसृत झाल्या. त्यापैकी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या  गुन्हेगारी सहभागाबाबत  होत्या. तिसरी बातमी मंत्र्यांकडून प्रशासनावर येणाऱ्या दबावाची होती. अर्थात,  या घटना सत्य, असत्य किंवा अर्धसत्य आहेत, हे शेवटी संबंधित तपास यंत्रणा आणि न्यायालयाच्या सर्व उतरंडीतून जाऊन ठरेलच. शिवाय, सर्व प्रशासन असेच चालत असावे, असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. तसे असते तर ही व्यवस्था केव्हाच कोलमडून पडली असती. त्याचबरोबर सर्व काही आलबेल आहे  असेही नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत गैरप्रकारांचे प्रकरण राज्यात गाजले.  अनेकांना अटक झाली. प्रकरण घडले त्यावेळी शिक्षण विभागात उपसचिव पदावर कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यालाही पोलिसांनी  अटक केली.  शिक्षण परिषदेचे प्रमुख आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपी यांची अन्य प्रकरणातील चौकशी या आयएएस अधिकाऱ्यांकडे असल्याने त्यांनी त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रमुख आरोपीस भाग पाडले, असाही आरोप ठेवण्यात आला.  याचा अर्थ अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसणे, भ्रष्टाचाराला वाव राहील अशी पद्धत चालवून घेणे आणि प्रामाणिकपणापासून फारकत घेणे, याचा व्यवस्थेत शिरकाव झालेला आहे हे मान्य करावे लागेल. या घटनेत तक्रार झालीच नसती, तर हे प्रकरण बाहेर आलेही नसते. असे प्रकार होऊ नयेत म्हणून तशी प्रणाली विकसित करणे आणि कोणी गैरवर्तन करीत असेल, तर त्यास प्रतिबंध करणे, पोलीस चौकशीची वाट न पाहता संबंधितांवर कारवाई करणे, हे सचिवांकडून अपेक्षित असते. त्यामुळे हे अपवादात्मक प्रकरण न समजता सचिवांनी जागरूक राहून तशी प्रशासकीय संस्कृती जोपासली पाहिजे.दुसरी घटना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बांधकाम गैरप्रकाराबाबतची!  दोन आयएएस आयुक्तांनी सकृद्दर्शनी गुन्हेगारी कृत्य केल्याच्या एका तक्रारीवरून न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्येही तक्रारीवरूनच प्रकरण उद्भवले, त्यामुळे ज्यामध्ये तक्रारी झालेल्या नाहीत, ते सर्व नियमितच आहे, असा अर्थ अजिबात नव्हे. देशात बांधकाम परवानग्या, अनधिकृत बांधकामे इत्यादींमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी असतात. शिवाय या प्रकरणांतले निर्णय  प्रशासकीय पातळीवर होत असल्याने  त्यात लोकप्रतिनिधींचा थेट समावेश नसतो. मग गेल्या सात दशकांमध्ये बांधकामांबाबतची प्रणाली निकोप व भ्रष्टाचारविरहित करण्यास प्रशासकीय नेतृत्वास कोणी अडविले? पुणे येथे मी महापालिका आयुक्त असताना कोथरूड येथील वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या इमारतीचे रेकॉर्डवरील अस्तित्व नष्ट करून तो एफएसआय इतर इमारत बांधकामाकरिता वापरला गेला. त्या वेळेस संबंधित वास्तुविशारदावर कारवाई करू नये म्हणून राजकीय नेतृत्वापेक्षाही प्रशासकीय नेतृत्व जास्त आग्रही होते. निकोप व्यवस्था राबविण्याची शीर्ष जबाबदारी ज्या नगरविकास खात्याच्या सचिवांची असते, त्यांनी अशा अनियमिततांचा नियमित आढावा घेतला, तर परिस्थिती सुधारेल; पण हे होत नाही. प्रणालीत सुधारणा होण्याऐवजी क्लिष्टता वाढवून अधिकाऱ्यांना नियमांऐवजी “स्वयंअधिकार निर्णयां”चे अधिकार देऊन भ्रष्टाचारास कुरण मोकळे केले जाते.मंत्र्यांनी बदल्यांची यादी दिल्याने व मला त्याअंतर्गत काम करावे लागल्याने दबाव सहन करावा लागला, असे वक्तव्य अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या  अधिकाऱ्याने केल्याचे वाचले. लोकप्रतिनिधींनी चुकीची कामे सांगू नयेत, हे स्पष्ट आहे. पण, नियमबाह्य कामे होणार नाहीत, यावर ठाम राहण्याची वैधानिक जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यावरच असते. त्याकरिता ठाम भूमिका घेण्यासाठी राज्यघटनेत अधिकाऱ्यांना कवचकुंडले दिलेली आहेत. त्यामुळे दबाव हे कारण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटना आणि नियम इतके तकलादू नाहीत, की अनाठायी राजकीय दबावामुळे देशात अराजक माजेल. बहुतांश वेळा  प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावांवर  मात करून, चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घेतात. त्यामुळेच व्यवस्था चालू आहे. अर्थात, वर नमूद केलेली अपवादात्मक प्रकरणे अलीकडे वाढत चालल्याने प्रशासकीय वाटचाल विदीर्ण अवस्थेकडे होत असून, त्यास वेळीच आवर घालणे, ही प्रशासकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे.mahesh.alpha@gmail.com 

टॅग्स :GovernmentसरकारCourtन्यायालयPoliceपोलिस