शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:24 IST

आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

चंद्रकांत दडस, उपसंपादक, मुंबईपेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतात सध्या अन्य इंधन पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात आहे. अलीकडेच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही लवकरच देशात इथेनॉलवर चालणारी वाहने धावण्याचे संकेत दिले आहेत. सध्या देशात १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरले जात असून, हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचे आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

इथेनॉल म्हणजे काय?इथेनॉल इंधन हे इथाइल अल्कोहोल आहे. उसाच्या रसापासून, मळीपासून व खराब झालेल्या साखरेपासून इथेनॉल तयार करण्यात येते. याशिवाय बगॅस, कचरा, गटारीचे पाणी, सर्व कुजणाऱ्या पदार्थांपासून इथेनॉलनिर्मिती करता येते.

पेट्रोलला पर्याय आहे का?वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉल पूर्णपणे वापरता येईल. मात्र, त्यासाठी इंजिनामध्ये काही बदल करावे लागतील. मात्र, सध्याच्या पेट्रोलमध्ये ते मिसळून त्याचा प्रभावी वापरही शक्य आहे. इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याने, इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते, परिणामी उत्सर्जन कमी होते.

पेट्रोल स्वस्त होईल का?इथेनॉलची किंमत जवळपास ६१ रुपये प्रतिलिटर आहे. सध्याच्या महागड्या पेट्रोलमध्ये ते मिसळल्याने किंमत कमी होऊ शकते. मात्र, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ग्राहक फक्त एक लिटर पेट्रोलसाठी पैसे देतो. इथेनॉलमिश्रित पेट्रोलची किंमत पेट्रोल आणि इतर घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पेट्रोल पंपावर स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल.

इंजिन बदलावे लागेल?२० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी वाहन कंपन्यांना वाहनांसाठी नवे इंजिन बसवावे लागेल. यामुळे वाहनांची किंमत वाढेल. अंदाजानुसार, चारचाकी वाहनांच्या किमती ३ हजार ते ५ हजार रुपयांनी तर दुचाकींच्या किमती १ हजार ते २ हजार रुपयांनी वाढू शकतात.

पाण्याच्या तक्रारीचे काय करायचे?अनेक वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याच्या तक्रारी केल्या आहेत. इथेनॉलमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते कोणतेही नुकसान करत नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोलियम डिलर्सना तेल कंपन्यांनी इंधनासाठी दर्जा तपासणीचे पालन करण्यास सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार?इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे साखर कारखान्यांनाही चांगला आर्थिक लाभ होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळणार आहेत. इंधन वापराचा नवा टप्पा ग्रीन हायड्रोजनचा आहे. यात प्रदूषणशून्य टक्के होते. ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारी तत्त्वावर त्याचा वापरही सुरू झाला आहे.

इथेनॉलचे वाहनासाठी तोटे काय? पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा-कार्यक्षम आहे. केवळ इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनाची इंधन कार्यक्षमता पेट्रोलच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी असते.ग्राहकांना इथेनॉल वापरताना गाडीच्या टाक्या अधिक वेळा भरावी लागतील त्याच्यासाठी खर्च वाढू शकतो.१९९२मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये करण्याचे धोरण देशात स्वीकारले गेले.१९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ५% इथेनॉलचा पेट्रोलमध्ये सक्तीने वापर सुरू केलाटीव्हीएस, बजाज या कंपन्यांकडून पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती

टॅग्स :Petrolपेट्रोल