शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बचाव आंदोलन : काही घडले.. काही बिघडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:49 IST

चार दशकांनंतर नर्मदा बचाव आंदोलन पूर्वीसारखे प्रभावी राहिले नसले तरी, मेधा पाटकर यांची उमेद मात्र अजूनही दुर्दम्य आहे. त्यांचा लढा संपलेला नाही!

अभिलाष खांडेकर

रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’

जगभरात अण्वस्त्रसज्ज देश त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना भारतातल्या अनेक भागांतील गरीब आदिवासी, शेतकरी अजूनही जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. विकासाच्या नावाखाली राबवलेल्या भव्य प्रकल्पांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावे लागते आणि त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट आहे. नर्मदा बचाव आंदोलन हे स्वतंत्र भारतातील सर्वात प्रभावी जनआंदोलनांपैकी एक मानले जाते. या आंदोलनाने गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाविरुद्ध तब्बल ४० वर्षे शांततामय; पण सातत्यपूर्ण संघर्ष केला आहे. या महाकाय प्रकल्पामुळे अडीच लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आणि सुपीक जमीन उद्ध्वस्त झाली.

या खडतर चार दशकांत नर्मदा बचाव आंदोलनाने अनेक चढउतार अनुभवले. मुख्यत्वे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने आधी या भल्यामोठ्या धरणाच्या निर्मितीविरोधात आणि नंतर हजारो विस्थापितांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळण्यासाठी लढा दिला. आंदोलनाच्या पहिल्या २५-३० वर्षांत त्यांना समाजातील अनेक घटकांचा पाठिंबा मिळाला; पण कालांतराने सामाजिक नेते आणि पर्यावरणवाद्यांनी या आंदोलनातून  हळूहळू अंग काढून घेतलेले दिसते. मेधाताई मात्र आजही नर्मदा खोऱ्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि अशिक्षित आदिवासींसाठी लढत आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

या काळात सर्वोच्च न्यायालयातील अनेक खटले आणि निर्णय, आंदोलने, गुजरात-महाराष्ट्र-मध्य प्रदेशातील संघर्ष, जागतिक बँकेचा प्रवेश आणि बाहेर पडणं, ब्रॅडफोर्ड मॉर्सचा अहवाल, केंद्रीय सत्यशोधन समितीचा अहवाल, कॅगचे प्रतिकूल निष्कर्ष, धरणाची उंची ९० मीटरवरून १३७ मीटरपर्यंत वाढवण्याचा वाद, त्यानुसार वाढलेली बुडीत जमीन, प्रकल्प खर्चात झालेली भरमसाठ वाढ, प्रचंड पर्यावरणीय नुकसान, निर्वासितांच्या वेदना, बांधकामातील भ्रष्टाचार, अपूर्ण आणि त्रुटीयुक्त कालवे, नर्मदेचे पाणी कोका-कोला आणि इतर उद्योगांसाठी वळवणे, शासकीय अधिकारी आणि बुद्धिजीवींची उदासीनता.. हे सारे या ४० वर्षांत घडले.

कधीकाळी दुर्गा भागवत, बाबा आमटे, नाना पाटेकर, स्वामी अग्निवेश, अनुपम मिश्र,  प्रा. राज कचरू, भाजप नेते सत्य नारायण जटिया या आणि अनेक पर्यावरणप्रेमी, मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत यांनी नर्मदा आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला होता. मात्र, पुढे भाजप सरकारची कठोर भूमिका आणि इतर कारणांमुळे हा पाठिंबा आटत गेला. २०१७ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी धरणाचे उद्घाटन केले. मुख्यतः गुजरातच्या कोरड्या भागांना लाभ मिळावा म्हणून अनेक दशकांपूर्वी धरणाची योजना आखण्यात आली होती, प्रत्यक्षात काम १९८७ मध्ये सुरू झाले (तेव्हा खर्च ६,४०६ कोटी रुपये होता, आता तो ८०,००० कोटींपर्यंत पोहोचला आहे.) 

धरणाचे उद्घाटन झाल्यानंतर वाटले की, नर्मदा बचाव आंदोलनाची भूमिका आता संपली; पण तसे झाले नाही. मेधा पाटकर यांनी प्रभावित शेतकऱ्यांसह पुन्हा जोरदार आवाज उठवला आणि हे लक्षात आणून दिले की विशेषतः मध्य प्रदेशातील हजारो कुटुंबे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. फक्त विस्थापितांचीच नव्हे, तर स्वतः नर्मदेच्या संरक्षणाचीही वेळ आता आली आहे, कारण तिचे पाणी दूषित होत चालले आहे, ते पिण्यायोग्य राहिलेले नाही; याकडे मेधा पाटकर सातत्याने लक्ष वेधत आहेत. त्यांनी मोठ्या धरणांच्या उपयुक्ततेवर, खर्चावर आणि लाभांवर कायमच प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या कुटुंबांना आपली वडिलोपार्जित जमीन सोडावी लागली, त्यांना दुसऱ्या राज्यात कमी प्रतीच्या जमिनीवर वसवले गेले, त्यांच्या वेदना शब्दातीत आहेत. अश्रूंनी डोळे भरलेले; पण पर्याय नसलेले हजारो विस्थापित अजूनही संघर्ष करत आहेत; हे मेधा पाटकर सातत्याने यंत्रणेसमोर मांडताना दिसतात.

नर्मदा बचाव आंदोलनामुळे ५०,००० कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकले, ही मात्र मोठीच गोष्ट आहे. ४० वर्षांनंतर नर्मदा बचाव आंदोलन कदाचित पूर्वीसारखे प्रभावी राहिले नसले तरी, उमेद मात्र अजूनही दुर्दम्य आहे. पाटकर अजूनही आदिवासी, भूमिहीन आणि दुर्बल घटकांसाठी आवाज उठवत आहेत. आजच्या काळात हे कमी महत्त्वाचे नव्हे!

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकर