शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांत महागडे, सोनेरी, झगमगते आणि सर्वांत लोकप्रिय चुंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 04:56 IST

१९०७-०८ साली गुस्ताव क्लिमने दोन प्रेमिकांमधल्या नाजूक क्षणांचे सोनेरी चित्र रंगवले आणि खऱ्या अर्थाने तो क्षण सोन्याचा.. अजरामर केला.

शर्मिला फडके, ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका

सोन्याच्या दोन झगमगत्या प्रवाहांचा संगम झाल्यासारखी परस्परांमध्ये मिसळून गेलेली दोन शरीरे. हिरव्यागार गवतावर, रंगीत रानफुलांच्या गालीचावर विसावलेली... त्याच्या अंगावर भौमितिक आकृत्यांचे डिझाइन असलेला पोशाख, डोक्यावर नाजूक हिरव्या लतावेलींचे आच्छादन. त्याच्या कुशीत तिचे मस्तक विसावले आहे. तिचा पोशाख फुलाफुलांच्या सुंदर रंगीत डिझाइनचा. केसांतही फुले आहेत. प्रियकराच्या गळ्यात तिचे हात आहेत आणि डोळे सुखातिशयाने बंद झाले आहेत. 

त्याचा चेहरा तिच्या गालांचे चुंबन घ्यायला झुकल्याने दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावरचे शांत, विश्रांत भाव आणि सोनेरी रंगाचा मुबलक वापर, यामुळे चित्रातील शारीरजवळिकीला एक अभौतिक, अशारीर दैवी अनुभूतीचा स्पर्श लाभला आहे.

कला-इतिहासातील हे सर्वांत महागडे, झगमगते आणि सर्वांत लोकप्रिय चुंबन. सन १९०७-०८ साली ऑस्ट्रियन चित्रकार गुस्ताव क्लिमने दोन प्रेमिकांमधल्या या नाजूक क्षणांचे सोनेरी चित्र रंगवले आणि खऱ्या अर्थाने तो क्षण सोन्याचा... अजरामर, कालातीत केला. दोघांमधला हा क्षण किती अनमोल, दुर्मीळ आहे हे त्याला दाखवायचं आहे. पेंटिंगचा सहा फुटी उंची-रुंदीचा आकारही या परिणामात भर घालणारा. 

विशेष म्हणजे चित्राच्या भव्य, ऐश्वर्यमय झगमगाटातही त्या क्षणाची कोमलता, भावनोत्कटता हरपून गेलेली नाही. तिच्या चेहऱ्यावरची मृदुता, लाल ओठांची कमान, अलगद मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्या, त्याच्या गळ्याला वेढलेल्या हातांची नाजूक गुंफण... असे सर्व सूक्ष्म तपशील सोन्याच्या आभेमध्ये अजून जास्त खुलून दिसत आहेत. चित्रात क्लिम स्वत: आपल्या प्रेयसीसोबत आहे म्हणतात. त्याच्या दृष्टीने प्रेम असेच असायला हवे, स्वप्निल, झगमगते, टिकाऊ आणि तरीही तरल. प्रेम या संकल्पनेला असा सुवर्णस्पर्श बहाल करणारे क्लिमचे हे काही पहिलेच चित्र नव्हते. सपाट पृष्ठभागावर सोन्याच्या वर्खाने नाजूक, सजावटीसारखे देखणे आकार वापरून बिझेन्टाइन शैलीशी साधर्म्य असणारी लखलखती पोर्ट्रेट बनवण्याची त्याची खासियत होती.

क्लिमचे वडील सोन्याचे  पारंपरिक नक्षीकाम करणारे कारागीर असल्याने कलेत  सोन्याचा वापर त्याला नवीन नव्हता. मध्ययुगीन चर्चमधल्या बिझेन्टाईन मोझाक चित्रशैलीत सोन्याचा वापर होता. त्याने फक्त तो नव्या, आधुनिक शैलीत वापरला. क्लिमचा कला अभिव्यक्तीकडे पाहायचा काळाच्या पुढे असणारा, प्रयोगशील  दृष्टिकोन, आधुनिक सौंदर्यदृष्टी, कला-कारागिरीचा कुशल मेळ, गूढ प्रतीकात्मकतेची आवड हे सगळे या चित्रात दिसते. झगमगत्या सोनेरी, चंदेरी रंगाचा वापर, आयत, चौकोनांचे भौमितिक आकार आणि त्याला छेद देणारे लहरत्या लाटा आणि वर्तूळ यांचे डेकोरेटिव्ह पॅटर्न्स, तरल बाह्यकृती, नाजूक रेषा, सूक्ष्म तपशील हे क्लिमच्या चित्रांचे खास वैशिष्ट्य.

अर्थातच त्याची ही काळाच्या पुढे असणारी सौंदर्यदृष्टी कला समीक्षकांच्या टीकेचे लक्ष्य बनली. कला आणि प्रेम या दोन्हींच्या उदात्त पावित्र्याला छेद देणारे हे वैभवाचे प्रच्छन्न, बीभत्स आणि अश्लील प्रदर्शन आहे, असे म्हटले गेले. कलारसिकांना मात्र सातत्याने या सोनेरी चुंबनाने आकर्षित केले, मोहात पाडले. प्रेमिकांनी परस्परांना दिलेल्या अनेक भेटवस्तूंवर, अगदी चहाच्या कपापासून घरातील पडद्यावर ते पिढ्यान‌्पिढ्या विराजमान होत राहिले. प्रेमाचा सुवर्ण स्पर्श कालातीत असतो, याची जाणीव मनावर ठसवत राहिले. व्हिएन्नाच्या बेलवेडेर संग्रहालयात हे चित्र पाहायला मिळेल.    sharmilaphadke@gmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Klimt's Golden Kiss: Most Expensive, Glittering, and Beloved Ever

Web Summary : Gustav Klimt's 'The Kiss,' painted in 1907-08, captures a golden, timeless moment of love. The painting's opulent beauty and intimate details showcase Klimt's unique blend of art, craftsmanship, and symbolism. Despite criticism, its enduring appeal makes it a beloved masterpiece.
टॅग्स :artकला