शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

शिवरायांच्या चित्र-शिल्परूपी इतिहासाची सोनेरी पानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 06:14 IST

‘बाप से बेटा सवाई’ असं शत्रूनंही ज्यांचं वर्णन केलं होतं, त्या छत्रपती संभाजी या तुफानाचा शोध इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रेंनी घेतला होता... अगदी युरोपापर्यंत, सुमारे २५ वर्षं. ‘गांधी’ हा एकच ध्यास सर रिचर्ड ॲटनबरोंनी घेतला होता... १८ वर्षं. त्याच तोडीचं काम एका चित्रकारानं सांप्रत काळात केलं आहे. 

सिद्धार्थ ताराबाई  मुख्य उपसंपादकराकोटीच्या जिद्दीतूनच ‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या!’ या ग्रंथाची गोष्ट घडली. म्हणजे प्रत्येक गोष्ट जशी एक ‘गोष्ट’ असते आणि त्या गोष्टीचीही एक विलक्षण गोष्ट असते आणि त्या गोष्टीतही अनेक उपगोष्टी दडलेल्या असतात, तशाच उपकथांच्या जोडकामातून याही ग्रंथाची गोष्ट आकारली आहे. या गोष्टीचे महानायक आहेत अर्थातच छत्रपती शिवराय आणि कर्तेकरविते आहेत सुहास बहुळकर- सुविख्यात चित्रकार.     बहुळकरांनी इतिहासाचं असं एक अजोड पान उत्खनलं आहे, ज्यावर कोरल्या आहेत दिग्गज, ख्यातकीर्त चित्रकार-शिल्पकारांच्या कथा. त्यांत व्यथाकथा तर आहेतच; पण साहसकथा नि अद्भुतिकाही आहेत. छ. शिवाजी महाराज या अलौकिक नावाशी जोडलेल्या. संभाजी राजांचा शोध घेता घेता युगप्रवर्तक छ. शिवाजी राजांचं अस्सल चित्र हुडकून काढणारे इतिहास संशोधक बेंद्रे, आलमगीरास त्याच्याच दरबारात आव्हान देणाऱ्या शिवरायांची मुद्रा रेखाटणारे ब्रिटिश चित्रकार आर्थर डेव्हिड मॅकॉर्मिक आणि एम.व्ही. धुरंदर, शासनमान्य शिवाजी चित्रकार कलायोगी जी. कांबळे, चित्र रेखाटण्यात मग्न असतान अर्धांगवायूने कोसळलेले ग. ना. जाधव, कुराणाच्या आयातांवर सुलेखनातून छत्रपती साकारणारे अब्दुल कादीर शेख, कुंचल्याचा कॅमेरा करून शिकारदृश्य रेखाटणारे आबालाल रहिमान, शिवछबीचं नाणं डिझाईन करून जपानची आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी २० वर्षीय रूपल सावंत, धरणफुटीचं आकाश कोसळल्यानंतरही पुन्हा शिवशिल्प घडवणारे बंडोपंत खेडकर, शिवपुतळ्याच्या कामाला गालबोट लागल्यानंतर हार न मानणारे आद्य स्मारक शिल्पकार गणपतराव म्हात्रे, मुंबईचे हृदय- शिवतीर्थावर शिवपुतळा घडवणारे महान शिल्पकार नारायण पाणसरे...  

पाणसऱ्यांची कथा ही शोकांतिकाच. राजकारण्यांच्या आततायीपणापायी घडलेली. म्हणूनच बहुळकर फटकारतात, ‘पाणसरेंसारख्या कलावंताच्या नशिबी कसे भोग येतात, हे त्यांचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील शिल्पकारांचं दुर्दैव. यामागं होती, शासकीय उदासीनता, अक्कल नसतानाही शहाणपणा शिकवण्याची मुजोरी आणि भ्रष्टाचार.’ शिल्पकार म्हात्रे आणि विनायक करमरकर यांच्या बाबतीत उद्भवलेल्या संघर्षाचं वर्णन, बहुळकर ‘दोन शिल्पकार आणि त्यांचे समर्थक यांच्यातलं तुंबळ युद्ध’, असं करतात. या प्रकरणाची नोंद, ‘म्हात्रेंच्या पीछेहाटीची आणि करमरकारांच्या भरभराटीचा प्रारंभ’, अशी झाली आहे. या ग्रंथातल्या एका सुखान्तिकेचाही उल्लेख करायला हवा. ती आपल्याला उत्कंठेच्या टकमक टोकावर उभं करते. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कोल्हापुरात अवघ्या २० दिवसांत साकारलेल्या महाराजांच्या पुतळ्याची गोष्ट म्हणजे बहुळकरांनी मूव्ही कॅमेऱ्यानं टिपलेला थरारपटच.  पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात बहुळकरांनी मुंबईजवळ अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाविषयी विस्तृत लिहलं आहे. असं स्मारक उभारण्यास ते ‘वेडेपणा’ का म्हणताहेत, ते समजून घ्यायला हवं.    

या पुस्तकाची निर्मितीकथा अडथळ्यांच्या कडे-कपारी पार करीत कशी सुफळ संपूर्ण झाली, त्याची स्वतंत्र गोष्टही बहुळकरांनी लिहायला हवी. या शोधयात्रेत भेटलेली माणसं, इतिहासाचं उत्खनन, दुर्मीळ छायाचित्रांची जमवाजमव आणि हे करताना आलेल्या अडचणी, नैराश्याचे क्षण हा या गोष्टीमागील गोष्टीचा ऐवज आहे.   दिग्गज कलावंतांच्या प्रतिभाविलासातून साकारलेल्या चित्रांची आणि शिल्पांची रेलचेल, त्यांच्यावरचं भाष्य आणि त्यांची ‘शो, डोन्ट टेल’ शैली हा या पुस्तकाचा यूएसपी. एक अतुलनीय कार्य पार पाडून त्यांनी वाचकांना प्रबुद्ध केलं आहेच, शिवाय नव्या कलावंतांसाठी अभ्यासाचं नवं, प्रशस्त दालनही खुलं केलं आहे... अनेक दरवाजे, खिडक्या आणि झरोके असलेलं! 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र