शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मैदानात मेडलचा खेळ अन् बाहेर लैंगिक छळाचा 'गेम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 08:37 IST

अथक मेहनत घेऊन मैदानात मेडलसाठी जीवाचे रान करायचे आणि खेळात टिकून राहण्यासाठी लैंगिक छळ सहन करायचा असा 'गेम' अनेक वर्षांपासून सुरू आहे.

अथक मेहनत घेऊन मैदानात मेडलसाठी जीवाचे रान करायचे आणि खेळात टिकून राहण्यासाठी लैंगिक छळ सहन करायचा असा 'गेम' अनेक वर्षांपासून सुरू आहे.

देशातील पुरस्कार विजेते नामांकित पहिलवान तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी पहिलवानांचे लैंगिक शोषण केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. मागील १० वर्षांत फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, जिम्नॅस्टिक आदी खेळांशी संबंधित स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या तब्बल ४५ पदाधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत.

फुटबॉल कोचकडून लैंगिक शोषण१७ वर्षाखालील महिला फूटबॉल टीमसोबत युरोप दौऱ्यावर गेलेल्या एलेक्स एम्ब्रोस या कोचवर खेळाडूने लैंगिक छळाचा आरोप केला. फुटबॉल महासंघाने त्यांना बरखास्त केले होते.

सायकलिंग कोचने केला लैंगिक छळमहिला सायकलपटूने कोच आर. के. शर्मावर स्लोवेनिया दौयात हॉटेलवर एकाच रुममध्ये राहण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. नंतर शर्मा यांच्यासोबत सर्व करार रद्द केले.

बास्केटबॉल कोचकडून लैंगिक दुराचरण७ महिला अॅथलिट खेळाडूंना बास्केटबॉल कोच पी. नागराजन यांच्यावर अनेक वर्षांपासून लैंगिक दुराचरण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

क्रिकेट कोचकडून छेडनवी दिल्लीतील महिला क्रिकेटपटूने कोचवर छेडछाडीचा आरोप केला होता. याबाबत तिने खासदार गौतम गंभीर यांच्या मदतीने पोलिसात तक्रार केली होती.

जिम्नॅस्टिकमध्ये अभद्र टिप्पण्णीमहिला जिम्नॅस्टिकने कोच मनोज राणा व त्यांचे सहकारी चंदन पाठक यांनी प्रशिक्षण शिबिरात अभद्र टिप्पणी केल्याचा आरोप केला. पोलिसांनी मनोज राणा यांना अटक केली

बॉक्सिंग सचिव झाला गजाआडतामिळनाडू स्टेट अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव एम. के. करुणाकरन यांच्यावर महिला बॉक्सरने लैंगिक छळ, छेडछाडीचा आरोप केला. पोलिसांनी त्यांना गजांआड केले.

हॉकी कोचने केला लैंगिक छळहॉकी टीमची खेळाडू रंजिता देवी यांनी कोच महाराज किशन कौशिकवर लैंगिक छळाचा आरोप केला. नंतर कौशिक यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

क्रिकेट सचिवाचे कारनामेआंध्र किक्रेट असोसिएशनचे सचिव चामुंडेश्वरनाथ यांच्यावर टीममध्ये स्थान देण्यासाठी महिला खेळाडूवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना पदावरून हटविले होते.

सात वर्षांपूर्वी केरळची ज्युनिअर महिला अॅथलिट अपर्णा रामचंद्रन हिने कोचकडून झालेल्या लैंगिक छळामुळे त्रस्त होऊन स्पोर्ट्स अॅथॉरिटीच्या हॉस्टेलमध्येच आत्महत्या केली होती.