शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

प्रेमाचा झरा... डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:07 IST

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि सुमारे ७५ संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते रविवार, २२ जून रोजी पुण्यात होत आहे...

- सचिन ईटकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे) पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझा सबनीस सरांशी जवळून परिचय झाला. तत्पूर्वी माझ्या मराठवाड्यातील लेखक म्हणून मला त्यांच्याविषयी आपुलकीचे अनौपचारिक नाते होतेच!

गेल्या दहा वर्षांत त्यांच्याशी माझा ऋणानुबंध दिवसागणिक घट्ट होत गेला. जमीनदार कुटुंबात जन्मलेले सबनीस सर तरुणपणात वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेऊ लागले. शाहिरी करू लागले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्वतःची मानवतावादी भूमिका घासूनपुसून अधिक ठसठशीत केली. 

आदिवासी मुलांच्या अनेक कार्यशाळांमध्ये डफावर थाप देऊन त्यांनी केलेल्या आवाहनामुळे मनं पेटून उठत. मराठवाडा ही जन्मभूमी आणि खान्देशातील धुळे ही सबनीसांची कर्मभूमी होती. समीक्षक म्हणून त्यांनी वेगळी वाट चोखाळली. 

सन २०१६ पिंपरी-चिंचवड येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात  झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस यांची निवड झाली. सातत्याने वैचारिक लिखाण करणाऱ्या एका चळवळ्या समीक्षक व लेखकाला मराठी साहित्यविश्वाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ही खूप समाधानाची बाब आहे. योगायोग असा की मला त्या संमेलनाचा मुख्य समन्वयक म्हणून काम करण्याची संधी डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे मिळाली होती.

ते प्रखर विवेकवादी तसेच संवेदनशील समीक्षक, विचारवंत असून, स्वतंत्रपणे विचार मांडत आले आहेत. महापुरुषांच्या विचारांमध्ये जे जनकल्याणाचे आणि गरजेचे असेल त्याच विचारांना पुढे नेले पाहिजे, यावर ते भर देतात. 

कुठल्याही महापुरुषाच्या तत्त्वज्ञानाच्या ते आहारी जात नाहीत. आक्रमक शैलीमुळे त्यांच्याकडून एखादे विधान सुटते. त्याचा त्यांना बऱ्याचदा त्रासही सहन करावा लागला आहे. पण त्यांचे मन निर्मळ असल्यामुळे अशा अनेक बिकट प्रसंगांतून ते बाहेर पडले आहेत. 

सबनीसांनी तयार केलेला लेखकांचा आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांचा गोतावळा पाहिल्यावर थक्क व्हायला होते. उपेक्षित किंवा दुर्लक्षित वर्गातून आलेल्या शेकडो लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांची ऊर्जा वाढवली आहे. मी त्यांना प्रेमाने वाहणारा झरा असे म्हणेन.

साहित्य संमेलनाच्या त्यांच्या अध्यक्षपदाला जवळपास दहा वर्षे होत आली, पण ते अजूनही संमेलनाध्यक्षाइतकेच सतत कार्यमग्न आहेत. मध्यंतरी त्यांना जीवघेणा अपघात झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना होती. डॉ. सबनीस त्यातून बाहेर पडले. त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही मनोमन प्रार्थना. 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्यmarathiमराठीPuneपुणे